लोकसभा निवडणुकीचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत. काही मोजक्या ठिकाणी अद्याप मतमोजणीची शेवटची फेरी सुरू आहे. मात्र, देशात इंडिया आघाडी २२९ जागा तर एनडीएप्रणित भारतीय जनता पार्टी २९६ जागा मिळण्यी शक्यता आहे. यामध्ये थोडेफार बदल होण्याची शक्यता आहे. कारण काही ठिकाणचे निकाल येण्याचे बाकी आहे. आता केरळ राज्यातील एर्नाकुलमचा मतदारसंघही चांगलाच चर्चेत होता. या ठिकाणी अटीतटीची लढाई पाहायला मिळाली.

एर्नाकुलम मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार हिबी इडन मोठ्या मताधिक्याने वियजी झाले आहेत. ४ लाख ८२ हजार मतांनी हिबी इडन यांचा विजय झाला. त्यांनी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार केएस राधाकृष्णन यांचा पराभव केला आहे. केएस राधाकृष्णन यांना केवळ १ लाख ४४ हजार मते पडले आहेत. दरम्यान, केएस राधाकृष्णन यांच्यावर रिपोर्टनुसार जवळपास २११ गुन्हे दाखल आहेत.

ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
Ramesh Chennithala Nana Patole
Congress : बंडखोरांविरोधात काँग्रेस अ‍ॅक्शन मोडवर, मतदानाच्या १० दिवस आधी १६ जण निलंबित
Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
Mission on Oilseeds in Crisis due to gm soybeans
जीएम सोयाबीन विना तेलबिया मिशन संकटात
maharashtra assembly election 2024 uddhav thackeray hoarding
‘प्रकल्प रोखणारे सरकार’ला ठाकरे गटाचे फलकबाजीतून उत्तर
maha vikas aghadi releases manifesto for maharashtra assembly poll 2024
महिला, शेतकऱ्यांवर आश्वासनांची खैरात; मविआचा ‘महाराष्ट्रनामा’ जाहीर

लोकसभेची निवडणूक लढवलेल्या अनेक उमेदवारांपैकी काही उमेदवारांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये खूनाचा प्रयत्न, फौजदारी गुन्हे यासह आदी गंभीर गुन्हे काही उमेदवारांवर दाखल आहेत. केएस राधाकृष्णन यांच्यावरही तब्बल २११ गुन्हे दाखल आहेत. मात्र, तरीही भारतीय जनता पार्टीकडून एर्नाकुलम मतदारसंघातून त्यांना उमेदवारी मिळाली होती. पण त्यांना पराभवाला सामोर जावं लागलं आहे.

हेही वाचा : २४३ गुन्हे दाखल असलेल्या भाजपा उमेदवाराला जनतेने नाकारलं, काँग्रेसच्या दिग्गज नेत्याचा दमदार विजय

दरम्यान, केएस राधाकृष्णन हे भारतीय जनता पक्षाचे नेते असून त्यांच्यावर जवळपास २११ दाखल असलेले गुन्हे हे २०१८ मधील सबरीमाला आंदोलनाशी संबंधित आहेत. तर यातील बहुतांश प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत. त्याबरोबरच पक्षाशी संबधित आंदोलने केल्यानंतर काही गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, केएस राधाकृष्णन यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे.

केरळमधील ८८ गुन्हे दाखल असलेल्या नेत्याचा विजय

केरळच्या इडुक्की मतदारसंघातील डीन कुरियाकोस यांनी तब्बल ४ लाख ३२ हजार ३७२ मते मिळवत मोठा विजय मिळवला आहे. डीन कुरियाकोस यांच्या विरोधात इडुक्की मतदारसंघातून सीपीआय एम पक्षाचे जॉयस जॉर्ज निवडणुकीच्या मैदानात होते. मात्र, त्यांना २ लाख ९८ हजार मत पडली. मात्र, डीन कुरियाकोस यांनी त्यांचा तब्बल २ लाख मतांनी पराभव केला. डीन कुरियाकोस यांच्यावर ८८ गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी २३ अत्यंत गंभीर गुन्हे आहेत. डीन कुरियाकोस हे केरळमधील काँग्रेसचे नेते आहेत. ते युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेले आहेत. २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत केरळच्या इडुक्की लोकसभा मतदारसंघातून १ लाख ७१ हजार मतांनी ते विजयी झाले होते. यावेळीही ते निवडून आले आहेत.