देशातील ११ राज्यांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात मतदान होत आहे. या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुस्लीम आरक्षणावरून एनडीए आणि इंडी आघाडीत मोठा वाद सुरू झाला आहे. अशातच बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी मुस्लीम आरक्षणाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. यादव म्हणाले, मुसलमानांनादेखील संपूर्ण आरक्षण मिळायला हवं. या निवडणुकीत लोकांची मतं आमच्या बाजूने वळत आहेत. त्यामुळे भाजपावाले घाबरले आहेत. त्यांना संविधान नष्ट करायचं आहे. परंतु, जनतेने त्यांचा डाव ओळखला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुस्लीम आरक्षणावर लालू यादव म्हणाले, त्यांना संपूर्ण आरक्षण मिळायला हवं. सध्या देशभरात मोठ्या प्रमाणात मतदान होत आहे. हे मतदान आमच्या पारड्यात होत असल्यामुळे भाजपा गोंधळली आहे. त्यामुळे ते लोकांची माथी भडकावण्याचा प्रयत्न करत आहेत. मतदानासाठी मोठमोठ्या रांगा लागत आहेत. हे मतदान आमच्या बाजूने होत आहे. त्यामुळेच भाजपावाले घाबरले आहेत. संविधानातील आरक्षणाचं प्रावधान भाजपावाल्यांना नष्ट करायचं आहेच, त्याचबरोबर त्यांना संविधान नष्ट करायचं आहे. मात्र आपली जनता हुशार आहे. त्यांनी भाजपाचा डाव ओळखला आहे.

लालू प्रसाद यादव यांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांना एनडीएने प्रत्युत्तर दिलं आहे. लोकजनशक्ती पार्टीचे नेते चिराग पासवान यांनीदेखील मुस्लीम आरक्षणावर भाष्य केलं आहे. पासवान म्हणाले, मोदी मुद्द्याचं बोलत नाहीत. परंतु, विरोधी पक्षदेखील मुद्द्याचं बोलताना दिसत नाहीत. ते सातत्याने बोलतायत की भाजपावाले संविधान नष्ट करतील, हिंदू-मुस्लीम आरक्षण संपवतील. मुळात असं एनडीएकडून कोणी बोललेलच नाही. आरक्षण संपेल, संविधान नष्ट होईल किंवा लोकशाही धोक्यात आहे असं आमच्यापैकी कोणी बोललेलं नाही. ज्या लोकांनी देशावर आणीबाणी लादून देशातील लोकशाहीची हत्या केली त्या लोकांनी लोकशाहीच्या गप्पा मारू नये. लोकशाही संपवणारे आज लोकशाहीसाठी गळे काढतायत. खरंतर लोकांना घाबरवून त्यांची मतं मिळवण्याचा प्रयत्न चालू आहे. २०१५ मध्येदेखील या लोकांनी अशाच पद्धतीने आरक्षण संपेल असं म्हणत वातावरण तापवलं होतं. मात्र मागील दोन्ही निवडणुका एकतरफी झाल्या. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे प्रमुख होणार आहे.

हे ही वाचा >> “मला सुनेत्रा पवारांची दया येते, त्यांच्या पतीराजाने…”, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, “एका गृहिणीला…”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी तेलंगणामधील एका प्रचारसभेला संबोधित करताना काँग्रेसवर टीका केली होती. तसेच ते म्हणाले होते, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारे वेगवेगळ्या राज्यांमध्ये धर्माच्या आधारावर आरक्षण देत आहेत. हे लोक अनूसुचित जाती, अनूसुचित जमाती, इतर मागासवर्गीय (ओबीसी) आणि इतर वंचित घटकांचं आरक्षण कमी करून मुसलमानांना देत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेससह इंडी आघाडीला मतदान करू नका.