Maharashtra Assembly Election 2024 : “…म्हणून महाराष्ट्रातील निवडणुका महत्त्वाच्या”, निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच काँग्रेसची भाजपावर टीका

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : २० नोव्हेंबर मतदान होणार असून २२ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर अनेकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Date| Maharashtra Assembly Election 2024
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची टीका (फोटो – संग्रहित छायाचित्र)

ECI on Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Dates : राज्यात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं असून निवडणूक कार्यक्रम आज निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार २० नोव्हेंबर मतदान होणार असून २२ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर अनेकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही प्रतिक्रिया दिली असून निवडणुकीत संविधानाचा मुद्दा उपस्थित करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

विजय वडेट्टीवार म्हणाले, राज्यपाल नियुक्त आमदारांना शपथविधी दिला जातो. ही कोणती नैतिकता? कायदा झुगारून काम सुरू आहे. महायुतीने महाराष्ट्रात निवडणुका जिंकल्या पुन्हा संविधानाला हात घालण्याचा प्रयत्न केला जाईल. लोकसभेत आम्ही त्यांना थांबवलं. महाराष्ट्रात महाविकास आघाडी जिंकली तर मोदींचे दोन बैसाखी गळून पडतील आणि त्यांना संविधान बदलण्याचा आणि लोकशाहीत हात घालण्याची हिंमत राहणार नाही.”

हेही वाचा >> Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, ९ कोटी मतदार ठरवणार महाराष्ट्राचं भवितव्य!

निवडणुकीत संविधानाचा मुद्दा मांडणार

“कदाचित उद्या नरेंद्र मोदींच्या खूर्चीला झटके बसतील. खूर्ची डळमळीत होईल, म्हणून संविधानाचं रक्षण होणं गरजेचं आहे. आम्ही देशाच्या रक्षणासाठी महाराष्ट्राच्या निवडणुकीत संविधान हा मुद्दा आणणार आहोत. देशाचं संविधान वाचवण्यासाठी महाराष्ट्रातील निवडणुका महत्त्वाच्या आहेत, असंही वडेट्टीवार म्हणाले.

महाराष्ट्रात कधी होणार निवडणूक?

महाराष्ट्रात एका टप्प्यात निवडणूक घेतली जाणार आहे. २० नोव्हेंबरला एका टप्प्यात निवडणूक घेतली जाणार आहेत. तर २३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ही माहिती दिली आहे

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Leader of opposition comments on maharashtra assembly elections 2024 sgk

First published on: 15-10-2024 at 16:31 IST
Show comments