Premium

Lok Sabha Election : २१ जागा मिळवत महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेच मोठा भाऊ, पाहा ४८ जागांची यादी

उद्धव ठाकरेंना २१ जागा मिळाल्या आहेत, सांगलीची जागा काँग्रेसने शिवसेनेला सोडली आहे.

MVA PC
महाविकास आघाडीच्या जागा ठरल्या

Loksabha Election : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीने त्यांच्या सगळ्या जागा जाहीर केल्या आहेत. माढा आणि उत्तर मुंबई हे दोन मतदारसंघ आणि अनुक्रमे राष्ट्रवादी आणि काँग्रेसला गेले आहेत. इथले उमेदवार जाहीर झालेले नाहीत. मात्र सगळ्या जागा जाहीर झाल्या आहेत. महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंची शिवसेनाच मोठा भाऊ ठरली आहे. कारण ४८ पैकी २१ जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला, १७ जागा काँग्रेसला तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला १० जागा मिळाल्या आहेत.

गुढीपाडव्याला जागावाटप जाहीर

गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीचं जागावाटपाचं घोंगडं भिजत पडलं होतं. अखेर सगळ्या जागा जाहीर झाल्या आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने १७ जागा जाहीर केल्याने आणि सांगलीची जागा घेतल्याने काँग्रेसने जाहीर नाराजी व्यक्त केली होती. मात्र आता मविआमध्ये ऑल इज वेल झाल्याचं आजच्या पत्रकार परिषदेतून दिसून येतं आहे.

Navneet Rana On Uddhav Thackeray :
Navneet Rana : प्रचार सभेत झालेल्या राड्यानंतर नवनीत राणांचा ठाकरे गटावर हल्लाबोल; म्हणाल्या, “उद्धव ठाकरे आता जनाब…”
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
maharashtra vidhan sabha election 2024 aditya thackeray milind deora sandeep deshpande worli assembly constituency
लक्षवेधी लढत : आदित्य ठाकरेंची कोंडी करण्याची खेळी
raj thackeray latest news
काँग्रेसबरोबर युती करण्यावरून राज ठाकरेंची पुन्हा उद्धव ठाकरेंवर सडकून टीका; म्हणाले, “मी, माझा स्वार्थ, माझी खुर्ची अन्…”
Sharad Pawar and Raj Thackeray meeting in Khadakwasla and Hadapsar Constituency
हडपसर, खडकवासला मतदारसंघात पवार ठाकरेंच्या तोफा धडाडणार, एकमेकांना काय उत्तर देणार !
Sanjay Raut Ajit Pawar Gautam Adani
Gautam Adani : “गौतम अदाणींनी मविआ सरकार पाडलं, अजित पवारांची कबुली”, उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीचा दाखला देत ठाकरेंच्या शिवसेनेचा टोला
maharashtra assembly election 2024 there is no election campaign tour of aditya thackeray in thane district
ठाणे जिल्ह्यात आदित्य ठाकरेंचा प्रचार दौराच नाही

२१-१७-१० चा महाविकास आघाडीचा फॉर्म्युला

मविआने २१-१७-१० जागांचा फॉर्म्युला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जाहीर केला आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सर्वाधिक २१ जागा, काँग्रेसला १७ जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला १० जागा देण्यात आल्या आहेत.

जळगाव, परभणी, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे, रायगड, मावळ, धाराशिव, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, बुलढाणा, हातकणंगले, छत्रपती संभाजीनगर, शिर्डी, सांगली, हिंगोली. यवतमाळ-वाशिम, मुंबई उत्तर प्रश्चिम, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण आणि मुंबई ईशान्य या जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मिळाल्या आहेत.

हे पण वाचा- काँग्रेसचं ‘एक पाऊल मागे’, सांगलीची जागा ठाकरे गटाला; विशाल पाटील अपक्ष निवडणूक लढवणार?

काँग्रेसला नंदुरबार, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली, चिमूर, चंद्रपूर, नांदेड, जालना, मुंबई उत्तर मध्य, मुंबई उत्तर, पुणे, लातूर, सोलापूर, रामटेक, कोल्हापूर या जागा मिळाल्या आहेत.

तर राष्ट्रवादी काँग्रेसला बारामती, शिरुर, सातारा, भिवंडी, दिंडोरी, माढा, रावेर, अहमदनगर दक्षिण, बीड या दहा जागा देण्यात आल्या आहेत.

कुठल्या जागेवर मविआचे कोण उमेदवार?

१) गोवाल पाडवी, नंदुरबार
२) काँग्रेस उमेदवार जाहीर नाही, धुळे
३) करण पवार, जळगाव
४) रवींद्र पाटील, रावेर
५) नरेंद्र खेडकर, बुलढाणा
६) अभय पाटील, अकोला
७) बळवंत वानखेडे, अमरावती
८) अमर काळे, वर्धा
९) रश्मी बर्वे, रामटेक
१०) विकास ठाकरे, नागपूर
११) डॉ. प्रशांत पडोळे, भंडारा-गोंदिया
१२) नामदेव किरसान, गडचिरोली-चिमूर
१३) प्रतिभा धानोरकर, चंद्रपूर
१४) संजय देशमुख, यवतमाळ
१५) नागेश पाटील, हिंगोली
१६) वसंतराव चव्हाण, नांदेड
१७) संजय जाधव, परभणी
१८) काँग्रेस उमेदवार घोषणा नाही, जालना
१९) चंद्रकांत खैरे, छत्रपती संभाजीनगर
२०) भास्करराव भगरे, दिंडोरी
२१) राजाभाई वाजे, नाशिक
२२) भारती कामडी, पालघर
२३) सुरेश म्हात्रे, भिवंडी
२४) वैशाली दरेकर, कल्याण
२५) राजन विचारे, ठाणे
२६) काँग्रेस उमेदवार जाहीर नाही, मुंबई उत्तर
२७) अमोल किर्तीकर, मुंबई उत्तर पश्चिम
२८) संजय दिना पाटील, मुंबई ईशान्य
२९) काँग्रेस उमेदवार जाहीर नाही, मुंबई उत्तर मध्य
३०) अनिल देसाई, मुंबई दक्षिण मध्य
३१) अरविंद सावंत, दक्षिण मुंबई
३२) अनंत गीते, रायगड
३३) संजोग वाघेरे पाटील, मावळ
३४) रविंद्र धंगेकर, पुणे
३५) सुप्रिया सुळे, बारामती
३६) अमोल कोल्हे, शिरुर
३७) निलेश लंके, अहमदनगर
३८) भाऊसाहेब वाघचौरे, शिर्डी
३९) बजरंग सोनावणे, बीड
४०) ओमराजे निंबाळकर, धाराशिव
४१) शिवाजीराव काळगे, लातूर
४२) प्रणिती शिंदे, सोलापूर
४३) राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार जाहीर नाही, माढा
४४) चंद्रहार पाटील, सांगली
४५) शशिकांत पाटील, सातारा
४६) विनायक राऊत, रत्नागिरी-सिंधुदुर्ग
४७) शाहू महाराज छत्रपती, कोल्हापूर
४८) सत्यजीत पाटील, हातकणंगले

अशी ४८ जणांची यादी आहे. माढा, धुळे आणि मुंबईतले दोन उमेदवार अद्याप जाहीर झालेले नाहीत. ते लवकरच जाहीर केले जातील अशी अपेक्षा आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Lok sabha election 2024 48 candidates mva list shiv sena uddhav thackeray got 21 seats scj

First published on: 09-04-2024 at 15:07 IST

संबंधित बातम्या