भाजपाने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची आठवी यादी जाहीर केली आहे. या यादीत पंजाबची सहा तर ओदिशाची तीन नावं आहेत. गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघातून सनी देओलचा पत्ता कापण्यात आला आहे. त्याऐवजी दिनेश सिंह बब्बू यांना तिकिट देण्यात आलं आहे. तर अमृतसरच्या जागेवर तरणजीत सिंह संधू यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पटियालातून परनीत कौर यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आलं आहे. परनीत कौर या कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पत्नी आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कुणाकुणाला तिकिट?

भाजपाने फरिदकोटच्या जागेवर हंसराज हंस यांना उमेदवारी दिली आहे. हंसराज हंस सध्याच्या घडीला उत्तर पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. लुधियानातून रवनीत सिंह बिट्टू, जालंधरहून सुशील कुमार रिंकू यांना उमेदवारी दिली आहे. ओदिशातल्या तीन जागा जाहीर झाल्या आहेत. रबिंद्र नारायण बेहरा, सुकांत कुमार पाणिग्रही आणि भर्तृहरी महताब यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आलं आहे.

सनी देओलने व्यक्त केली होती लोकसभा न लढवण्याची इच्छा

अभिनेता सनी देओलला २०१९ मध्ये भाजपाने गुरुदासपूरमधून तिकिट दिलं होतं. भाजपाच्या तिकिटावर सनी देओल निवडूनही आला. काही महिन्यांपूर्वी सनी देओलने जी आश्वासनं २०१९ च्या प्रचारात दिली होती ती पूर्ण केली नाहीत असा आरोप त्याच्यावर झाला होता. दरम्यान गदर २ सिनेमा हिट झाल्यानंतर आपण लोकसभा लढवण्यास इच्छुक नाही असं त्याने म्हटलं होतं. आता भाजपाच्या आठव्या यादीत सनी देओलचा पत्ता कापण्यात आला आहे.

हे पण वाचा- ईशा देओल भेटल्यावर ‘अशी’ होती सावत्र आईची प्रतिक्रिया; आजारी काकांसाठी अभिनेत्री गेली होती सनी देओलच्या घरी

आठव्या यादीत बंडखोरांना तिकिट

भाजपाने आपमधून बंडखोरी करुन भाजपात आलेल्या सुशील कुमार रिंकू आणि काँग्रेस बंडखोर रवनीत सिंह बिट्टू तसं परनीत कौर यांना तिकिटं दिली आहेत. पंजाबचे माजी मुख्यमंत्री बेअंत सिंग यांचे नातू रवनीत बिट्टू यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत कमळ हाती घेतलं होतं. रवनीत बिट्टू लुधियानातून खासदार आहेत. राहुल गांधींचे निकटवर्तीय अशी त्यांची ओळख होती. २६ मार्चला त्यांनी भाजपात प्रवेश केला आणि आता त्यांना तिकिट देण्यात आलं आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lok sabha election 2024 bjp list released sunny deol ticket canceled aap rinku and amarinder singh wife preneet kaur get ticket scj
Show comments