India General Election 2024 Full Schedule Announcement Updates: लोकसभा निवडणुकीचं बिगुल आज वाजणार आहे. दुपारी तीन वाजता देशातल्या सर्वात मोठ्या राजकीय उत्सवाचा प्रारंभ कधी होणार? राजीव कुमार यांनी निवडणूक कार्यक्रमाची माहिती दिली आहे. या माहितीत त्यांनी नवमतदार किती आहेत? वृद्ध मतदार किती आहेत? तरुण मतदार किती आहेत? महिला आणि पुरुष मतदार किती आहेत? याची सविस्तर माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिसरी टर्मही आमचीच असल्याचा दावा केला आहे. तर राहुल गांधी आणि इंडिया आघाडीने तिसऱ्यावेळी मोदी पंतप्रधान होणार नाहीत असं म्हटलं आहे. निवडणूक आयोग आता किती टप्प्यांमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर करतात आणि निकालाची तारीख काय असेल ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Live Updates

Lok Sabha Election 2024 Dates Live | लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार! जाहीर होणार लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवाचा कार्यक्रम

18:01 (IST) 16 Mar 2024
लोकसभा निवडणुकीबरोबर राज्यात विधानसभेच्या एका जागेसाठी होणार पोटनिवडणूक, वाचा सविस्तर…

अकोला : रिक्त झालेल्या अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा बिगुल लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसोबतच वाजला आहे. महाराष्ट्रातील एकमेव पोटनिवडणूक अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात होणार आहे.

सविस्तर वाचा...

16:38 (IST) 16 Mar 2024
Loksabha Elections 2024 : महाराष्ट्रात मतदान कधी आणि कुठे ?️

️पहिला टप्पा - १९ एप्रिल - रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर</p>

️दुसरा टप्पा - २६ एप्रिल - बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ - वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी

तिसरा टप्पा - ७ मे - रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले

️चौथा टप्पा - १३ मे - नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड

पाचवा टप्पा - २० मे - धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ

मतमोजणी - ४ जून

16:09 (IST) 16 Mar 2024
निवडणुकीत साड्या, पैेसे, मद्य यांचं वाटप केल्यास कारवाई-राजीव कुमार

निवडणुकीत दोन वेळा मतदान करणाऱ्यांवर कठोरातील कठोर कारवाई करण्याचा मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिला आहे.  निवडणुकीत कोणत्याही प्रकारे पैशाचा गैरवापर होऊ देणार नाही. मनी आणि मसल पॉवरला निवडणुकीत थारा राहणार नाही. दारू आणि साड्या वाटपावर आमची करडी नजर राहणार असून असा प्रकार करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

16:01 (IST) 16 Mar 2024
१९ एप्रिल ते १ जून सात टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक, ४ जून रोजी निकाल-राजीव कुमार

५४३ जागांवर लोकसभा निवडणूक पार पडणार आहे. पहिला टप्पा १९ एप्रिल रोजी, दुसरा टप्पा २६ एप्रिलला, तिसरा टप्पा ७ मे रोजी, चौथा टप्पा १३ मे रोजी, पाचवा टप्पा २० मे रोजी सहावा टप्पा २५ मे रोजी तर सातवा आणि अखेरचा टप्पा १ जून रोजी पार पडणार आहे. ४ जून रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे अशी माहिती आयुक्त राजीव कुमार यांनी दिली आहे.

15:54 (IST) 16 Mar 2024
लोकसभा निवडणूक सात टप्प्यामध्ये पार पडणार-राजीव कुमार

लोकसभा निवडणूक सात टप्प्यांमध्ये पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात २१ राज्यांमध्ये निवडणूक पार पडणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात यामध्ये आणखी राज्यं जोडली जाणार.

15:48 (IST) 16 Mar 2024
महत्त्वाच्या राज्यांमधल्या पोटनिवडणुका लोकसभेबरोबरच होणार-राजीव कुमार

महत्त्वाच्या राज्यांमध्ये पोटनिवडणुका होणं बाकी आहे. बिहार, गुजरात, हरयाणा, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, कर्नाटक, तामिळनाडू, झारखंड या ठिकाणी होणाऱ्या पोटनिवडणुका आत्ता जाहीर करणार आहोत.

15:44 (IST) 16 Mar 2024
आरोपांचा आणि भाषेचा स्तर घसरतो आहे, स्टार कँपनेर्सनाही नोटीस-राजीव कुमार

आरोपांचा, भाषेचा घसरता स्तर पाहता याची गंभीर दखल घेण्यात आली असून स्टार कँपेनर्सना देखील नोटीस देण्यात येणार आहे. त्यामुळे स्टार प्रचारकांनी प्रचार करताना योग्य ती काळजी घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

15:32 (IST) 16 Mar 2024
पैसे वाटप सुरु असल्यास १०० मिनिटांत पथक पोहचणार-राजीव कुमार

कुठे पैसा वाटप सुरू असेल , कुठे गैरप्रकार सुरू असतील तर फक्त एक फोटो काढून सी विजील ॲप वर टाका, तुमच्या मोबाईलचे अक्षांश, रेखांश वरून लोकेशन ट्रॅक करून १०० मिनिटात आमची टीम तिथे पोचतील, असं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितलं.

15:30 (IST) 16 Mar 2024
मनी, मसल पॉवर, अफवा रोखण्याचं आमच्यासमोर मोठं आव्हान

आमच्यासमोर निवडणुकीची तयारी करताना एकूण चार आव्हानं होती. यामध्ये मसल पॉवर, मनी पॉवर, अफवा रोखण्याचं सगळ्यात मोठं आव्हान आमच्यासमोर होतं. त्यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना योग्य पद्धतीच्या सूचना दिल्या आहेत, असं राजीव कुमार यांनी स्पष्ट केलं आहे.

15:28 (IST) 16 Mar 2024
निवडणूक आयोगाच्या संकेत स्थळावर मतदारांना हवी असणारी सगळी माहिती-राजीव कुमार

निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर मतदारांसाठी योग्य ती माहिती पुरवण्यात आली आहे. त्यामुळे आता मतदान केंद्र शोधणं देखील सोपं होणार आहे. त्याचप्रमाणे नो युवर कँडीडेट या अॅपवरुन तुमच्या भागातील उमेदवाराविषयी सगळी माहिती मिळणार आहे असंही राजीव कुमार यांनी सांगितलं आहे. हिंसाचार रोखण्यासाठीही आम्ही योग्य ती पावलं उचलली आहेत. कुठल्याही प्रकारे हिंसा होऊ नये यासाठी आम्ही सज्ज आहोत.

15:25 (IST) 16 Mar 2024
लोकसभा निवडणूक ही आमच्यासाठी ऐतिहासिक संधी-राजीव कुमार

ही निवडणूक म्हणजे आमच्यासाठी ऐतिहासिक संधी. देशातील निवडणूक म्हणजे एक सण असतो, जगाचं लक्ष या निवडणुकीकडे आहे. १६ जूनला १७ व्या लोकसभेची मुदत संपत आहे. प्रत्येक मतदान म्हणजे आमची चाचणी असते. स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका होतील. - मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार

15:22 (IST) 16 Mar 2024
८५ पेक्षा जास्त वय असलेल्यांना १२ डी या अर्जामार्फत मतदान करता येणार-राजीव कुमार

८५ वर्षापेक्षा जास्त असेल, दिव्यांगांमध्ये ज्यांची श्रेणी ४० टक्क्यांपेक्षा जास्त असेल आणि त्यांनी फॉर्म १२ डी च्या माध्यामातून नोंदणी केली तर घरी जाऊन त्यांचे मतदान घेतले जाईल असं राजीव कुमार यांनी स्पष्ट केलं आहे.

15:21 (IST) 16 Mar 2024
१०० हून जास्त वय असलेले भारतात २ लाख मतदार -राजीव कुमार

२ लाख मतदार भारतात असे आहेत ज्यांचं वय १०० हून जास्त आहेत. आमच्याकडे असलेल्या यादीत १८ हजार तृतीय पंथीय आहेत. अशीही माहिती राजीव कुमार यांनी दिली आहे. ज्येष्ठ नागरिक जेव्हा मतदानासाठी येतील तेव्हा तिथे व्हिल चेअरची आणि अटेंडंटची व्यवस्था असेल. आम्ही अशा नागरिकांची मतं घरी जाऊनही घ्यायला तयार आहोत. मात्र जर या नागरिकांना मतदान केंद्रावर यायचं असेल तर त्यासाठीही आम्ही तयारी केली आहे.

15:18 (IST) 16 Mar 2024
तरुणाई ही आपल्या लोकशाहीची सर्वात मोठी शक्ती-राजीव कुमार

देशभरातले नागरिक तर मतदान करतीलच.. पण तरुण हे आपल्या लोकशाहीची सर्वात मोठी शक्ती आहेत. मोठ्या प्रमाणावर ते मतदान करतील आणि आपले जणू राजदूत बनतील यात मला काहीही शंका वाटत नाही. असं राजीव कुमार यांनी म्हटलं आहे. मतदान केंद्रावर सगळ्या सोयी सुविधा असतील असंही राजीव कुमार यांनी स्पष्ट केलं आहे.

15:16 (IST) 16 Mar 2024
देशातल्या १२ राज्यांमध्ये महिला मतदारांची संख्या वाढली-राजीव कुमार

देशातल्या १२ राज्यांमध्ये महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांच्या तुलनेत वाढली आहे. त्यांच्या मतांचाही निवडणुकीवर मोठा परिणाम होणार आहे यात काहीही शंका नाही असंही मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी म्हटलं आहे.

15:13 (IST) 16 Mar 2024
तरुण मतदार हे भारताच्या लोकशाहीची ताकद

भारतात यंदा ९६ कोटी ८० लाख मतदार आहेत. १९ कोटी ७४ लाख तरुण मतदार आहेत. या तरुणांच्या मतांचा खूप मोठा वाटा या निवडणुकीत असणार आहे. ८२ लाख मतदार असे आहेत जे आमचे प्राऊड मतदार आहेत अशीही घोषणा राजीव कुमार यांनी केली आहे.

15:09 (IST) 16 Mar 2024
देशात यावर्षी ९७ कोटी मतदार-राजीव कुमार यांची माहिती

भारतात यावर्षी ९७ कोटी मतदार आहेत. सगळ्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर आम्ही आता निवडणूक आयोग म्हणून लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करतो आहोत. मागच्या वर्षभरात ११ निवडणुका झाल्या आहेत. या निवडणुका राज्यांच्या होत्या. त्या शांततेत पार पडल्या याचं आम्हाला समाधान आहे. आता लोकसभा निवडणूकही तशीच पार पडावी हा आमचा प्रयत्न आहे.

15:07 (IST) 16 Mar 2024
लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे निवडणूक-राजीव कुमार

भारतात लोकशाही हा सर्वात मोठा उत्सव आहे. भारताच्या या उत्सवाकडे संपूर्ण जगाचं लक्ष असतं असं राजीव कुमार यांनी म्हटलं आहे. थोड्याच वेळात ते वेळापत्रक जाहीर करणार आहेत.

13:26 (IST) 16 Mar 2024
राहुल गांधींची यात्रा आज मुंबईत येणार

राहुल गांधी हे मुंबईत आज येत आहेत. काही वेळापूर्वीच त्यांची यात्रा ठाण्यात होती. तिथे त्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.

13:08 (IST) 16 Mar 2024
पहिल्या दिवशी एकपाळ्याच्या दारात, दुसऱ्या दिवशी तिकीट आली घरात; खासदार म्हणतात, “हा मारोती पावतोच मला…”

वर्धा : एखाद्या इच्छापूर्तीसाठी आपली श्रद्धा असलेल्या देवास पूजण्याची भारतीय परंपरा नवी नाही. राजकारणी तर ही परंपरा हमखास पाळत असल्याचे आजूबाजूला दिसून येते. त्यात भाजप नेते सर्वात आघाडीवर असल्याचे हमखास दिसते.

सविस्तर वाचा...

Lok Sabha Nivadnuk 2024 Schedule in Marathi

लोकसभा निवडणूक २०२४ पूर्ण वेळापत्रक

लोकसभा निवडणुकीचं बिगुल आज वाजणार आहे. दुपारी तीन वाजता देशातल्या सर्वात मोठ्या राजकीय उत्सवाचा प्रारंभ कधी होणार? निवडणूक किती टप्प्य्यांत होणार हेदेखील कळणार आहे. त्यामुळे आज होणाऱ्या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. देशभरात निवडणुकीचा उत्साह दिसून येतो आहे.

Story img Loader