India Lok Sabha Election 2024 Phase 1 Voting Live Updates, 19 April : जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या ‘उत्सवा’ला आज, शुक्रवारी सुरुवात होत आहे. लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यात देशातील १९ राज्ये व २ केंद्रशासित प्रदेशांमधील १०२ लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होईल. बस्तर आदी नक्षली भागासह संवेदनशील मतदारसंघांमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात १६.६३ कोटी मतदार १.८७ लाख मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावू शकतील. सर्व मतदान केंद्रांवर चोख व्यवस्था करण्यात आली असून १८ लाख कर्मचारी मतदानप्रक्रियेचा कारभार सांभाळतील. तसंच, लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या पाच मतदारसंघातही आज मतदान होईल.

महाराष्ट्रातही आज मतदान

पूर्व विदर्भात नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा-गोंदिया या पाच मतदारसंघाचा समावेश होतो. पूर्व विदर्भ हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. २०१९ च्या निवडणुकीत पाच पैकी चार जागा भाजप-सेना युतीने तर एका जागा काँग्रेसने जिंकली होती. २०२४ मध्ये चित्र वेगळे आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे वनमंत्री सुधीर मुनंगटीवार हे रिणांगणात आहेत. पाचही ठिकाणी थेट लढत असून जेव्हा -जेव्हा थेट लढत होते त्याचा फटका सत्ताधाऱ्यांना बसतो असा आजवरचा अनुभव आहे.

विदर्भातील पाच मतदारसंघात कोणाविरोधात कोण?

  • नागपूर मतदारसंघ
    महायुतीचे नितीन गडकरी विरुद्ध महाविकास आघाडीचे विकास ठाकरे
  • रामटेक मतदारसंघ
    महायुतीचे राजू पारवे विरुद्ध महाविकास आघाडीचे शामकुमार बर्वे
  • चंद्रपूर-वणी-आर्णी मतदारसंघ
    महायुतीचे सुधीर मुनगंटीवार विरुद्ध महाविकास आघाडीचे प्रतिमा धानोरकर
  • भंडारा-गोंदिया मतदारसंघ
    महायुतीचे सुनील मेंढे विरुद्ध महाविकास आघाडीचे डॉ.प्रशांत पडोळे
  • गडचिरोली-चिमूर मतदारसंघ
    महायुतीचे अशोक नेते विरुद्ध महाविकास आघाडचे नामदेव किरसान

नक्षलग्रस्त भागात ३ वाजेपर्यंतच मतदान

मतदानाची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ६ अशी आहे. मात्र, गडचिरोली-चिमूर मतदारसंघातील आमगाव, आरमोरी, गडचिरोली आणि अहेरी ही चार विधानसभा क्षेत्रे नक्षलग्रस्त आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने तेथे सकाळी ७ वाजता मतदान सुरू होईल आणि दुपारी ३ वाजता संपेल. ब्रह्मपुरी आणि चिमूर या दोन विधानसभा क्षेत्रांत मात्र सायंकाळी ६ पर्यंत मतदान होईल.

मतदारांसाठी सुविधा

  • १०२ मतदार केंद्रांमध्ये १४. १४ लाखांहून अधिक नोंदणीकृत ८५ वर्षांहून अधिक वयोगटातील मतदार आहेत तसेच, १३.८९ लाख अपंग मतदार असून त्यांना त्यांच्या घरी मतदान करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.
  • या मतदारांनी मतदान केंद्रांवर येण्याचा निर्णय घेतला तर त्यांच्यासाठी वाहतुकीची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदानयंत्रांवर ब्रेल चिन्हेही असतील. स्वयंसेवक सर्व सुविधा पुरवल्या जातील. अपंग मतदारांनी  ECI Saksham अ‍ॅपद्वारे व्हीलचेअर सुविधेसाठी नोंदणी करता येईल.
  • वृद्ध आणि अपंग व्यक्तींसह प्रत्येक मतदार सुलभतेने मतदान करू शकतील. त्यासाठी पाणी, आडोसा, शौचालय, रॅम्प, स्वयंसेवक, व्हीलचेअर आणि वीज यांसारख्या किमान सुविधा उपलब्ध आहेत.
  • ५ हजारांहून अधिक मतदान केंद्रांचे व्यवस्थापन अगदी सुरक्षा कर्मचाऱ्यांसह महिलांद्वारे केले जाईल. १ हजारहून अधिक मतदान केंद्रांचे अपंग व्यक्ती व्यवस्थापन करतील.
  • सर्व नोंदणीकृत मतदारांना मतदार माहितीपत्रिका (स्लिप) देण्यात आल्या आहेत. त्याचा मतदान केंद्रावर मतदानासाठी उपयुक्त ठरतील.  https://electoralsearch.eci.gov.in/ या लिंकद्वारे मतदार त्यांचे मतदान केंद्र तपशील आणि मतदानाच्या तारखेची शहानिशा करता येऊ शकेल.
Live Updates

Lok Sabha Polls 2024 Phase One Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया आज पार पडणार. देशभरातील घडामोडी जाणून घ्या.

07:20 (IST) 19 Apr 2024
७ हेलिकॉप्टर, १५ हजारांहून अधिक जवान, गडचिरोलीत युद्ध क्षेत्राचा भास व्हावा…..

युद्ध क्षेत्राचा भास व्हावा अशी स्थिती सद्या गडचिरोलीच्या अतिसंवेदनशील भागात दिसून येत आहे. नक्षल्यांच्या सावटाखाली पार पडत असलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासनाने विशेष तयारी केली असून अतिसंवेदनशील भागात मतदान यंत्र आणि कर्मचारी नेण्यासाठी वायुसेनेच्या ७ हेलिकॉप्टरची मदत घेतली जात आहे. नक्षल कारवायांवर अंकुश ठेवण्यासाठी विविध दलातील तब्बल १५ हजारांहून अधिक पोलीस जवान तैनात करण्यात आले आहेत.

सविस्तर वृत्त वाचा

07:14 (IST) 19 Apr 2024
पूर्व विदर्भात पाचही मतदारसंघांमध्ये चुरशीच्या लढती

भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या पूर्व विदर्भातील लोकसभेच्या पाच जागांसाठी शुक्रवारी मतदान होत असून सर्व ठिकाणी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी, अशी थेट लढत आहे. यात भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

सविस्तर बातमी वाचा

06:56 (IST) 19 Apr 2024
नागपुरात मतदानाची तयारी सुरू, महाराष्ट्रातील पाच मतदारसंघात आज मतदान

नागपुरातील मतदान केंद्र क्रमांक ५६ धंतोली येथे मतदानाची तयारी सुरू आहे. 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील महाराष्ट्रातील ५ मतदारसंघात आज सकाळी 7:00 वाजता मतदान सुरू होईल.

06:52 (IST) 19 Apr 2024
मतदार ओळखपत्र नसलं तरी करा मतदान! लोकसभा निवडणुक २०२४ च्या आधी ‘ही’ माहिती वाचाच

तुम्हीही यंदा मतदान करण्यासाठी पात्र असाल तर या उत्सवाचा भाग होण्यासाठी सज्ज व्हा. तुम्हाला माहीतच असेल की मतदान करण्यासाठी मतदार ओळखपत्र म्हणजेच इलेक्टर फोटो आयडेंटिटी कार्ड (EPIC) आवश्यक असते. पण भारतीय निवडणूक आयोगाच्या (ECI) मार्गदर्शक तत्त्वांनुसार, तुमच्याकडे तुमचे प्रत्यक्ष मतदार ओळखपत्र नसले तरीही तुम्ही मतदान करू शकता, ते कसं हे आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.

सविस्तर लेखाची लिंक

06:43 (IST) 19 Apr 2024
Loksabha Election 2024 : निवडणूक आयोगानं काय केलीय तयारी, किती मतदार करणार मतदान; जाणून घ्या मतदानाचा पहिला टप्पा कसा असणार?

१९ एप्रिल रोजी देशात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात होणार असून, पहिल्या टप्प्यात २१ राज्यात एकूण १०२ जागांसाठी मतदान पार पडणार आहे. याबरोबरच अरुणाचल आणि सिक्कीमच्या ९२ विधानसभा मतदारसंघांसाठीही मतदान होणार आहे. या सर्व लोकसभा आणि विधानसभा जागांसाठीचा निवडणूक प्रचार बुधवारी सायंकाळी संपला आहे.

सविस्तर वृत्त वाचा

06:39 (IST) 19 Apr 2024
लेख : आजच्या मतदानाची टक्केवारी सांगणार देशाचा मूड..

निवडणुका हा लोकशाहीचा उत्सव.. भारतासारख्या जगातील सगळ्यात मोठी लोकशाही असणाऱ्या देशात तर तो धूमधडाक्यात साजरा होतो. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशामधल्या  १०२ मतदारसंघांत आज मतदानाचा पहिला टप्पा पार पडत आहे.

सविस्तर लेख वाचा

06:37 (IST) 19 Apr 2024
Election 2024: राजकीय पक्षांसाठी काम करणारे पगारी कार्यकर्ते

१२ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता १६ ते २५ वर्षे वयोगटातील तरुणांचा एक गट त्यांच्या मोटरसायकलवरून अमरावतीतील राजकमल चौकात आला. जिल्हा काँग्रेसचे कार्यालय बंद होते म्हणून एका तरुणाने फोनवर एक नंबर डायल केला. त्याला काही वेळ वाट पाहण्यास सांगण्यात आले. द्वितीय वर्षाचा पदवीधर असलेला विद्यार्थी आपल्या मित्रांना म्हणाला, “त्यांना उशीर होईल. आपण भाजपाच्या कार्यालयात जाऊ या.” तरुण सकाळी सकाळी राजकीय कार्यालयात येण्याचे आणि या पक्ष कार्यालयातून त्या पक्ष कार्यालयात जाण्याचे कारणही काही आगळे-वेगळेच आहे. तरुणांनी ‘टेलिग्राफ’ला सांगितले की, त्यांना राजकीय पक्षांच्या प्रचारासाठी नोकरी मिळाली आहे.

सविस्तर लेख वाचा

06:36 (IST) 19 Apr 2024
विदर्भात ५ जागांसाठी आज मतदान; नक्षलग्रस्त, संवेदनशील भागांत चोख सुरक्षा व्यवस्था

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या पाच मतदारसंघात आज, शुक्रवारी मतदान होत आहे.

सविस्तर वृत्त वाचा

06:35 (IST) 19 Apr 2024
पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान; १९ राज्यांमधील १०२ मतदारसंघ सज्ज

पहिल्या टप्प्यात १३४ महिलांसह १,६२५ उमेदवार रिंगणात आहेत. निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी गेली दोन वर्षे केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रचंड मेहनत घेतली आहे. मतदारांना मतदानावेळी कोणताही त्रास न होऊ नये याची दक्षता घेण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त वाचा

लोकसभा निवडणूक लाईव्ह अपडेट्स

Lok Sabha Polls 2024 Phase One Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया आज पार पडणार. देशभरातील घडामोडी जाणून घ्या.