India Lok Sabha Election 2024 Phase 1 Voting Live Updates, 19 April : जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या ‘उत्सवा’ला आज, शुक्रवारी सुरुवात होत आहे. लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यात देशातील १९ राज्ये व २ केंद्रशासित प्रदेशांमधील १०२ लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होईल. बस्तर आदी नक्षली भागासह संवेदनशील मतदारसंघांमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात १६.६३ कोटी मतदार १.८७ लाख मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावू शकतील. सर्व मतदान केंद्रांवर चोख व्यवस्था करण्यात आली असून १८ लाख कर्मचारी मतदानप्रक्रियेचा कारभार सांभाळतील. तसंच, लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या पाच मतदारसंघातही आज मतदान होईल.

महाराष्ट्रातही आज मतदान

पूर्व विदर्भात नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा-गोंदिया या पाच मतदारसंघाचा समावेश होतो. पूर्व विदर्भ हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. २०१९ च्या निवडणुकीत पाच पैकी चार जागा भाजप-सेना युतीने तर एका जागा काँग्रेसने जिंकली होती. २०२४ मध्ये चित्र वेगळे आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे वनमंत्री सुधीर मुनंगटीवार हे रिणांगणात आहेत. पाचही ठिकाणी थेट लढत असून जेव्हा -जेव्हा थेट लढत होते त्याचा फटका सत्ताधाऱ्यांना बसतो असा आजवरचा अनुभव आहे.

विदर्भातील पाच मतदारसंघात कोणाविरोधात कोण?

  • नागपूर मतदारसंघ
    महायुतीचे नितीन गडकरी विरुद्ध महाविकास आघाडीचे विकास ठाकरे
  • रामटेक मतदारसंघ
    महायुतीचे राजू पारवे विरुद्ध महाविकास आघाडीचे शामकुमार बर्वे
  • चंद्रपूर-वणी-आर्णी मतदारसंघ
    महायुतीचे सुधीर मुनगंटीवार विरुद्ध महाविकास आघाडीचे प्रतिमा धानोरकर
  • भंडारा-गोंदिया मतदारसंघ
    महायुतीचे सुनील मेंढे विरुद्ध महाविकास आघाडीचे डॉ.प्रशांत पडोळे
  • गडचिरोली-चिमूर मतदारसंघ
    महायुतीचे अशोक नेते विरुद्ध महाविकास आघाडचे नामदेव किरसान

नक्षलग्रस्त भागात ३ वाजेपर्यंतच मतदान

मतदानाची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ६ अशी आहे. मात्र, गडचिरोली-चिमूर मतदारसंघातील आमगाव, आरमोरी, गडचिरोली आणि अहेरी ही चार विधानसभा क्षेत्रे नक्षलग्रस्त आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने तेथे सकाळी ७ वाजता मतदान सुरू होईल आणि दुपारी ३ वाजता संपेल. ब्रह्मपुरी आणि चिमूर या दोन विधानसभा क्षेत्रांत मात्र सायंकाळी ६ पर्यंत मतदान होईल.

मतदारांसाठी सुविधा

  • १०२ मतदार केंद्रांमध्ये १४. १४ लाखांहून अधिक नोंदणीकृत ८५ वर्षांहून अधिक वयोगटातील मतदार आहेत तसेच, १३.८९ लाख अपंग मतदार असून त्यांना त्यांच्या घरी मतदान करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.
  • या मतदारांनी मतदान केंद्रांवर येण्याचा निर्णय घेतला तर त्यांच्यासाठी वाहतुकीची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदानयंत्रांवर ब्रेल चिन्हेही असतील. स्वयंसेवक सर्व सुविधा पुरवल्या जातील. अपंग मतदारांनी  ECI Saksham अ‍ॅपद्वारे व्हीलचेअर सुविधेसाठी नोंदणी करता येईल.
  • वृद्ध आणि अपंग व्यक्तींसह प्रत्येक मतदार सुलभतेने मतदान करू शकतील. त्यासाठी पाणी, आडोसा, शौचालय, रॅम्प, स्वयंसेवक, व्हीलचेअर आणि वीज यांसारख्या किमान सुविधा उपलब्ध आहेत.
  • ५ हजारांहून अधिक मतदान केंद्रांचे व्यवस्थापन अगदी सुरक्षा कर्मचाऱ्यांसह महिलांद्वारे केले जाईल. १ हजारहून अधिक मतदान केंद्रांचे अपंग व्यक्ती व्यवस्थापन करतील.
  • सर्व नोंदणीकृत मतदारांना मतदार माहितीपत्रिका (स्लिप) देण्यात आल्या आहेत. त्याचा मतदान केंद्रावर मतदानासाठी उपयुक्त ठरतील.  https://electoralsearch.eci.gov.in/ या लिंकद्वारे मतदार त्यांचे मतदान केंद्र तपशील आणि मतदानाच्या तारखेची शहानिशा करता येऊ शकेल.
Live Updates

Lok Sabha Polls 2024 Phase One Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया आज पार पडणार. देशभरातील घडामोडी जाणून घ्या.

18:33 (IST) 19 Apr 2024
Bhandara Lok Sabha Election 2024 Live : वय वर्षे १०६, तरुणांना लाजवेल अशी इच्छाशक्ती; मतदान केंद्रांवर जाऊन केल मतदान

भंडारा : भंडारा शहरात आज सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली. यावेळी १०६ वर्षांच्या यमुनाबाई सीताराम कुंभारे या आजीबाईंनी देखील उत्साहाने मतदानाचा हक्क बजावला. विशेष म्हणजे, मतदान केंद्रांवर जाऊन त्यांनी मतदान केले. तरुणांनाही लाजवेल अशा त्यांच्या इच्छाशक्तीचे सगळेजण कौतुक करत होते.

सविस्तर वाचा…

18:27 (IST) 19 Apr 2024
Lok Sabha Election 2024 Live : पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदान

18:26 (IST) 19 Apr 2024
Lok Sabha Election 2024 Live : राज्यात ५४.८५ टक्के मतदान, नक्षलग्रस्त भागात सर्वाधिक नागरिकांनी बजावला हक्क

18:13 (IST) 19 Apr 2024
Gondia Lok Sabha Election 2024 Live : आधी लगीन लोकशाहीचे! -वरात काढण्याआधी नवरदेवाने बजावला मतदानाचा हक्क

लोकसभेच्या भंडारा गोंदिया मतदार संघात दुपारी ३ वाजतापर्यंत ४५.८८ टक्के मतदान झाले. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी या गावातील गणेश धनिराम कुंभरे (२९) या नवरदेवाने आपली लग्नाची वरात काढण्याआधी मतदानाचा हक्क बजावला. आधी लगीन लोकशाहीच्या महोत्सवाचे म्हणत आपला मतदानाचा हक्क बजावला.

17:58 (IST) 19 Apr 2024
Lok Sabha Election 2024 Live : राज्यात पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत ४४.१२ टक्के मतदान

17:14 (IST) 19 Apr 2024
पुण्यातील अहमनगर रोडवरील शॉपिंग मॉलमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या सहा गाड्या रवाना

17:01 (IST) 19 Apr 2024
Nagpur Lok Sabha Election 2024 Live : “नागपूरमध्ये नितीन गडकरी आणि भाजपाचा लोगो असलेल्या चिठ्ठ्या”, काँग्रेसचा आरोप

15:52 (IST) 19 Apr 2024
“मातोश्रीचा घरगडी पुन्हा बरळला…”, भाजपाची संजय राऊतांवर टीका

14:31 (IST) 19 Apr 2024
Nagpur Lok Sabha Election 2024 Live : नागपूर : मतदान केंद्रावर सापाने प्रवेश केला अन…

नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला सकाळी सात वाजता सुरुवात झाली. उन्हाचा तडाखा असल्याने लोकांची मतदानासाठी लगबग देखील सुरू झाली.मात्र थोडा वेळ होत नाही तोच अचानक एका मतदान केंद्रावर सापाने प्रवेश केला आणि एकच गोंधळ उडाला.

सविस्तर वाचा…

14:25 (IST) 19 Apr 2024
Gadchiroli Lok Sabha Election 2024 Live : १०२ वर्षीय वृद्ध महिलेने केलं मतदान

14:02 (IST) 19 Apr 2024

13:36 (IST) 19 Apr 2024
गृहमंत्री अमित शाह यांनी उमेदवारी अर्ज भरला

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज (१९ एप्रिल) पार पडत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज गांधीनगरमधून आपला उमेदवारी अर्ज भरला आहे.

13:33 (IST) 19 Apr 2024
Gadchiroli Lok Sabha Election 2024 Live : ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड, सिरोंचातील मतदान केंद्रावर गोंधळ; अहेरीवरून हेलिकॉप्टरने अर्ध्या तासात…

गडचिरोली : मतदान सुरू असताना तीन ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने तेलंगणा सीमेवर शेवटच्या टोकावरील सिरोंचातील मतदान केंद्रात गोंधळ उडाला होता. अखेर अहेरीवरुन तातडीने हेलिकॉप्टरने नवीन तीन ईव्हीएम पोहोचविण्यात आल्याने प्रक्रिया सुरळीत सुरु झाली.

सविस्तर वाचा…

13:30 (IST) 19 Apr 2024
Lok Sabha Election 2024 Phase 1 Live : मणिपूरमध्ये मतदान केंद्रावर गोळीबार, बचावासाठी मतदारांची धावाधाव

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात शुक्रवारी मणिपूरमधील अंतर्गत मणिपूर आणि बाह्य मणिपूर या दोन मतदारसंघात मतदान होत आहे. मतदानादरम्यान, शुक्रवारी मणिपूरमधील मोइरांग विभागातील थामनपोकपी येथील एका मतदान केंद्राजवळ एका गटाने अनेक गोळीबार केला. मात्र, कोणतीही जीवितहानी झाली नाही. गोळीबारामुळे मतदानासाठी रांगा लावलेल्या मतदारांमध्ये घबराट पसरली. व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये गोळीबाराच्या आवाजात लोक मतदान केंद्राबाहेर पळताना दिसत आहेत. टाईम्स नाऊच्या वृत्तानुसार, इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील कंपू येथे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे नष्ट करण्यात आली आहे. सूत्रांनी पुढे सांगितलं की हल्लेखोरांनी मतदान केंद्रात फक्त भारतीय जनता पक्षाच्या एजंटची मागणी केली.

13:08 (IST) 19 Apr 2024
Gondia Lok Sabha Election 2024 Live : खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क; मतदान केंद्रावरील अव्यवस्था पाहून…

गोंदिया : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष व राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी कुटुंबीयांसह गोंदिया येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. प्रफुल्ल पटेल हे काल बारामती मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी उपस्थित होते.

सविस्तर वाचा…

12:31 (IST) 19 Apr 2024
Chandrapur Lok Sabha Election 2024 Live : आधी मतदान मग लग्न… बोहल्यावर चढण्याआधी नवरदेवाने बजावला मतदानाचा हक्क; चंद्रपूर लोकसभा मतदार संघात ११ वाजतापर्यंत…

चंद्रपूर : लोकसभेच्या चंद्रपूर – वणी – आर्णी मतदार संघात सकाळी ११ वाजतापर्यंत १८.९४ टक्के मतदान झाले. गणेश बाळकृष्ण पाटील या नवरदेवाने बोहल्यावर चढण्याआधी मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्यात २११८ मतदान केंद्रावर सकाळी सात वाजतापासून मतदान प्रक्रिया सुरू झाली.

सविस्तर वाचा…

12:29 (IST) 19 Apr 2024
Nagpur Lok Sabha Election 2024 Live : जगातील सर्वात कमी उंचीच्या महिलेचे नागपुरात मतदान

नागपूर : जगातील सर्वात कमी उंचीची महिला म्हणून गिनीज बुक ऑफ इंडियात नोंद असलेल्या नागपूरच्या ज्योती आमगे हिने आज मतदान केले. यावेळी ती लाल कलरच्या फ्रॉकमध्ये होती आणि शाई लावलेले बोट उंचावून तिने मतदान केल्याचे सांगितले.

सविस्तर वाचा…

12:28 (IST) 19 Apr 2024
Nagpur Lok Sabha Election 2024 Live : नागपूर : ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड,’येथे’ मतदानाला एक तास उशिरा सुरुवात

नागपूर : दक्षिण नागपुरात जयमाता प्रा. शाळा, दिघोरी येथे बूथ क्रमांक ४६ मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन मध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे या मतदान केंद्रावर १ तास १० मिनिट उशिरा मतदान सुरू झाले. त्यामुळे मतदान केंद्रावर सकाळी गर्दी झाली होती. 

सविस्तर वाचा…

12:03 (IST) 19 Apr 2024
Nagpur Lok Sabha Election 2024 Live : नागपूर : पत्त्यावरून गोंधळ! कोणत्या हैदराबाद हाउसमध्ये मतदान कराव? मतदात्यांचा अधिकाऱ्यांना…

नागपूर: नागपूर लोकसभा मतदार संघातील हैदराबाद हाऊस या मतदार केंद्रात शुक्रवारी सकाळी मतदारांचा पत्त्याबद्दल गोंधळ उडाला. त्यामुळे मतदारांनी निवडणूक अधिकाऱ्यांना आम्ही कोणत्या हैदराबाद मध्ये मतदान करावे, हे कसं समजणार असा प्रश्न उपस्थित केला

सविस्तर वाचा…

11:22 (IST) 19 Apr 2024
शरद पवार यांच्या उपस्थितीत सुप्रिया सुळे यांनी फोडला प्रचाराचा नारळ

सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांच्या उपस्थित फोडला प्रचाराचा नारळ आहे. बारामतीमधील कन्हेरी मारुती मंदिरात फोडला नारळ. १९६७ पासून पवार कुटुंबीयांची ही परंपरा आहे.

11:21 (IST) 19 Apr 2024
देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीसांना नागपुरात केलं मतदान

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक बजावला मतदाना हक्क

10:36 (IST) 19 Apr 2024
योगगुरू रामदेव बाबांनी बजावला मतदानाचा हक्क

10:17 (IST) 19 Apr 2024
नागपूरमध्ये पहिल्या टप्प्याचं मतदान सुरू, तर ८० किमीवर मोदींची सभा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. आज पहिल्या टप्प्यात नागपूरमध्ये मतदान होत असताना तिथून पुढे ८० किमी अंतरावर असलेल्या वर्धा येथे मोदी येत आहेत. पूर्व विदर्भातील नागपूरसह पाच मतदारसंघात पहिल्याच टप्प्यांत आज मतदान होत आहे. वर्धा जिल्ह्यातील तळेगाव येथे दुपारी ही सभा आहे. तेथून मोदी नागपूरला येणार असून येथे त्यांचा मुक्काम आहे. तर वर्धेसह उर्वरित पाच मतदारसंघात २६ एप्रिलला मतदान आहे.

10:09 (IST) 19 Apr 2024
“आम्ही इथं जोडीने…”, बाळू धानोरकरांच्या आठवणीत प्रतिभा धानोरकर भावूक

चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा मतदारसंघात महायुतीचे सुधीर मुनगंटीवार यांच्यासमोर महाविकास आघाडीच्या प्रतिभा धानोरकर यांचं आव्हान असणार आहे. आज पहिल्या टप्प्यातील लोकसभा मतदानला सुरुवात झाल्यानंतर प्रतिभा धानोरकरांनी आपलं मतदान केलं. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना त्यांच्या डोळ्यांत बाळू धानोरकर यांच्या आठवणीने अश्रू तरळले.

सविस्तर वृत्त वाचा

09:33 (IST) 19 Apr 2024
“चांगल्या मताधिक्क्याने मी निवडणूक जिंकेन”, नितीन गडकरी यांचा विश्वास

आपण आज लोकशाहीचा उत्सव साजरा करत आहोत. मला १०१ टक्के खात्री आहे की मी चांगल्या मताधिक्क्याने जिंके – नितीन गडकरी</p>

09:26 (IST) 19 Apr 2024
सद्गगुरू जग्गी वासुदेव यांनी बजावला मतदानाचा हक्क

09:18 (IST) 19 Apr 2024

09:16 (IST) 19 Apr 2024
जगातील सर्वांत उंचीने लहान असलेल्या महिलेने केले नागपुरात मतदान

मी माझ्या संपूर्ण कुटुंबाबरोबर आज मतदान केलं आहे. आज तुम्हीही सर्वांनी मतदान करावं. हे आपलं कर्तव्य आहे. हा आपला हक्क आहे- ज्योती आमगे

08:17 (IST) 19 Apr 2024
अभिनेता रजनीकांत यांनी बजावला मतदानाचा हक्क

07:33 (IST) 19 Apr 2024
देशभर मतदानाला सुरुवात, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मराठीतून खास आवाहन

देशभर मतदानाला सुरुवात झाली असून मतदारांना प्रोत्साहन देण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहा भाषांमधून आवाहन केलं आहे.

लोकसभा निवडणूक लाईव्ह अपडेट्स

Lok Sabha Polls 2024 Phase One Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया आज पार पडणार. देशभरातील घडामोडी जाणून घ्या.