India Lok Sabha Election 2024 Phase 1 Voting Live Updates, 19 April : लोकसभा निवडणुकीला आज (शुक्रवार, १९ एप्रिल) सुरुवात झाली आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात देशातील १९ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण १०२ लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान चालू आहे. छत्तीसगडमधल्या बस्तरसारख्या नक्षली भागासह काही संवेदनशील मतदारसंघांमध्येदेखील आज मतदान होत असल्यामुळे चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १६.६३ कोटी मतदार १.८७ लाख मतदान केंद्रांवर जाऊन त्यांचा मतदानाचा हक्क बजावतील. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, केंद्रीय मत्री नितीन गडकरी, दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतला सुपरस्टार रजनीकांत, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही वेळापूर्वी मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात एकूण १,६२५ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. यामध्ये १३४ महिला आणि १,४९१ पुरूष उमेदवार आहेत. पहिल्या टप्प्यात आठ केंद्रीय मंत्री, दोन माजी मुख्यमंत्री, एक माजी राज्यपाल निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. पहिल्या टप्प्यात ज्या मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे त्या १०२ जागांपैकी ४५ जागा एनडीएने आणि ४१ यूपीए आणि इतर पक्षांनी जिंकल्या होत्या.

Congress List for delhi assembly Election
Delhi Election : आता दिल्ली विधानसभेची धूम! काँग्रेसने जाहीर केली २१ उमेदवारांची यादी, अरविंद केजरीवालांसमोर तगडा उमेदवार!
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Rahul Gandhi And Arvind Kejriwal.
Delhi Election 2025 : काँग्रेसला हवी ‘आप’ची साथ, ‘हात’ मिळवण्यास केजरीवालांचा नकार
भाजपाला नवीन वर्षात मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष; कशी पार पडणार निवडणुकीची प्रक्रिया? जाणून घ्या... (फोटो सौजन्य पीटीआय)
BJP President Election : भाजपाला नवीन वर्षात मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष; कशी पार पडणार निवडणुकीची प्रक्रिया? जाणून घ्या…
Ravindra Waikar And Amol Kirtikar
Ravindra Waikar : रवींद्र वायकरांची खासदारकी जाणार की राहणार? मुंबई उच्च न्यायालयाने राखून ठेवला निर्णय
Mahavikas Aghadi News
विरोधी पक्षनेते पदावरून महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच?
Sudhir Mungantiwar On Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? महत्त्वाची माहिती समोर
Independent MLA Sharad Sonawane.
MLA Sharad Sonawane : अपक्ष आमदाराची महायुतीकडे मंत्रिपदाची मागणी, विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसत झळकावला फलक

पहिल्या टप्प्यात, उत्तर प्रदेश, मध्‍य प्रदेश, राजस्थान, तमिळनाडू, आसाम, बिहार, उत्तराखंड, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, मणिपूर, छत्तीसगड, जम्मू-कश्मीर, अरुणाचल प्रदेश, मेघालय, त्रिपुरा, मिझोरम, लक्षद्वीप, पाँडेचेरी, सिक्किम, नगालँडमध्ये मतदान होणार आहे. अंदमान आणि निकोबार बेटांवरही आज मतदान होत आहे. नागपूर, रामटेकसह विदर्भातील पाच मतदारसंघांमध्ये आज मतदान होत आहे.

हे ही वाचा >> नागपूरमध्ये पहिल्या टप्प्याचं मतदान सुरू, तर ८० किमीवर मोदींची सभा

पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर आठ केंद्रीय मंत्री, दोन माजी मुख्यमंत्री आणि एका माजी राज्यपालांचं भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद होणार आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, किरण रीजिजू, सर्वानंद सोनेवाल, संजीव बालियान, जितेंद्र सिंह, भूपेंद्र यादव, अर्जुन राम मेघवाल आणि राज्यमंत्री एल. मुरुगन यांचा समावेश आहे. तेलंगणाच्या राज्यपालपदाचा राजीनामा देणाऱ्या तमिलिसै सौंदरराजनदेखील लोकसभेच्या मैदानात उतरल्या आहेत.

Story img Loader