Premium

“थोडं गरम व्हायला लागलं की राहुल गांधी…”, देवेंद्र फडणवीसांचा टोला

2024 Lok Sabha Election Phase 2 Voting लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात १२०० हून अधिक उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएममध्ये कैद होणार आहे.

election second phase news
लोकसभा निवडणूक २०२४ दुसरा' टप्पा अपडेट्स

India Lok Sabha Election 2024 Phase 2 Voting Updates, 26 April : जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा उत्सव म्हणजेच भारताची लोकसभा निवडणूक सुरू झाली आहे. आज (शुक्रवार, २६ एप्रिल) देशभरातील १३ राज्यातील ८८ लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. एकूण १२०६ उमेदवारांचं भवितव्य आज ईव्हीएममध्ये कैद होणार. आज ८९ मतदारसंघांमध्ये मतदान होणार होतं. मात्र मध्य प्रदेशच्या बेतूल मतदारसंघातील बसपाच्या उमेदवाराचं निधन झाल्यामुळे याठिकाणची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. महाराष्ट्रातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या मतदारसंघांमध्ये मतदानाला सुरुवात झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Lok Sabha Polls 2024 Phase Two Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात

11:31 (IST) 26 Apr 2024
सलमान खान गोळीबार प्रकरण: पंजाबमधून अटक आरोपींना घेऊन पथक मुंबईत दाखल, आज न्यायालयापुढे हजर करणार

सलमानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या विकी साहब गुप्ता आणि सागर श्रीजोगेंद्र पाल यांना गुन्हे शाखेने यापूर्वी अटक केली होती.

सविस्तर वाचा…

11:30 (IST) 26 Apr 2024
मुंबई: बेशिस्त रिक्षा चालकांविरोधात वाहतूक पोलिसांची विशेष मोहीम, २ हजार १८९ दंडात्मक कारवाया

बेशिस्त रिक्षा चालकांविरोधात वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबवली असून १४ दिवसांमध्ये ५२ हजार १८९ दंडात्मक कारवाया करण्यात आल्या.

सविस्तर वाचा…

11:30 (IST) 26 Apr 2024
ठाण्याची हवा समाधानकारक, हवेचा गुणवत्ता निर्देशांक ६५ ते ८५ च्या आत

गेल्यावर्षी दिवाळीच्या काही दिवस आधी मुंबई, ठाणे तसेच आसपासच्या शहरातील हवेच्या गुणवत्तेचा स्तर खालावला होता.

सविस्तर वाचा…

11:29 (IST) 26 Apr 2024
मालाड दुर्घटनेप्रकरणी पर्यवेक्षकाला अटक

इमारतीच्या आवारातील ४० फूट खोल शौचालयाच्या टाकीत बुधवारी चार कामगार पडले. हे कामगार सफाईच्या कामासाठी आत उतरले होते.

सविस्तर वाचा…

11:29 (IST) 26 Apr 2024
ठाणे: टेम्पोच्या धडकेत तरूणाचा मृत्यू

मितेश नागडा असे मृताचे नाव असून याप्रकरणी टेम्पो चालकाविरोधात कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा…

11:28 (IST) 26 Apr 2024
‘अटल सेतू’ला वाहनचालकांचा थंडा प्रतिसाद

अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूवरून गेल्या तीन महिन्यांत २१ लाख ९२ हजार ४६६ वाहने धावली आहेत.

सविस्तर वाचा…

11:28 (IST) 26 Apr 2024
राज्यात हिवताप रुग्णांच्या मृत्यूमध्ये घट

राज्य सरकार हिवतापाच्या साथीला प्रतिबंध करण्यासाठी विशेष मोहीम राबवीत आहे.

सविस्तर वाचा…

11:27 (IST) 26 Apr 2024
न्यायमूर्ती गौतम पटेल सेवानिवृत्त, औपचारिक प्रथेला फाटा देत अन्य न्यायमूर्तींकडून अनोख्या पद्धतीने निरोप

न्यायालयीन वर्तुळात प्रसिद्ध असलेले न्यायमूर्ती गौतम पटेल हे मुंबई उच्च न्यायालयातील ११ वर्षांच्या सेवाकार्यकाळानंतर गुरुवारी निवृत्त झाले.

सविस्तर वाचा…

11:17 (IST) 26 Apr 2024
बुलढाणा : पहिल्या टप्प्यात फक्त ६.६१ टक्केच मतदान

बुलढाणा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज, शुक्रवारी( दि २६) मतदानास  संथगतीने प्रारंभ झाला. आज सकाळी ७ ते ९ दरम्यानच्या पहिल्या टप्प्यात जेमतेम ६.६१ टक्के मतदानाची नोंद झाली. सविस्तर वाचा

11:00 (IST) 26 Apr 2024
दुपारी ऊन वाढायच्या आधी मतदान करा : अशोक चव्हाण

राज्यासह देशभरात तापमान वाढलंय. दुपारी तापमान खूप वाढत जातंय. त्यामुळे दुपारआधीच मतदान करा. मुड ऑफ दी नेशन आहे की आज मतदान करायचं आहे. सायंकाळपर्यंत गर्दी वाढण्याची शक्यता आहे. नांदेड हे माझं गाव आहे. त्यामुळे लोकांच्या बरोबर मी राहिलो आहे – अशोक चव्हाण</p>

10:51 (IST) 26 Apr 2024
वर्धा : मतदान केंद्रावर नवरदेव, उमेदवार, महिला मतदार; सकाळच्या पहिल्या टप्प्यात उत्साह, जिल्हाधिकाऱ्यांनी बजावला मतदानाचा हक्क

वर्धा लोकसभा मतदारसंघात आज मतदान सूरू झाले आहे. सकाळच्या पहिल्याच टप्प्यात उत्साह दिसून यवत आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी जिल्हा परिषद इमारतीत असलेल्या केंद्रावर मत टाकले. या नंतर विविध केंद्राचा आढावा घेणे सूरू करणार असल्याचे ते म्हणाले. सविस्तर वाचा…

10:50 (IST) 26 Apr 2024
वाशीम : नवरदेवाने बोलल्यावर चढण्याआधी बजावला मतदानाचा हक्क

यवतमाळ वाशीम लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आज होत आहे. येथील मडके परीवारातील लग्नाची तारीख काही महिन्याआधीच काढण्यात आली होती. सविस्तर वाचा…

09:46 (IST) 26 Apr 2024
“अमरावतीत कोणतंही अघोरी कृत्य घडू शकतं”, ईव्हीएम बंद पडल्यामुळे संजय राऊतांचा संशय; म्हणाले, “अचानक सायंकाळी…”

विदर्भातील पाचपैकी वर्धा, यवतमाळ-वाशीममध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत होत असून अकोला, अमरावती आणि बुलढाणा या मतदारसंघात तिरंगी लढत आहे. येथे तिसऱ्या उमेदवाराकडून होणारे मतविभाजन निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान, मतदानाला सुरुवात होताच वर्ध्यात इव्हीएम मशिन नादुरुस्त झाले आहे. यामुळे मतदारांचा खोळंबा झाला आहे. यावरून ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी टीका केली. त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला.

सविस्तर वृत्त वाचा

09:39 (IST) 26 Apr 2024
सकाळी ९ वाजेपर्यंत महाराष्ट्रात ७.४५ टक्के मतदानाची नोंद

सकाळी ९ वाजेपर्यंत महाराष्ट्रात ७.४५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

यवतमाळ वाशिम – ७.२३ टक्के

वर्धा- ७.१८ टक्के

अकोला – ७.१७ टक्के

अमरा – ६.३६ टक्के

नांदेड – ७.७३ टक्के

पभणी – ९.७२ टक्के

09:10 (IST) 26 Apr 2024
वर्ध्यात मतदार चक्क माकड घेऊन मतदान केंद्रावर; म्हणाला, “माझ्याशिवाय…”

वर्ध्यातील एक मतदार चक्क माकड घेऊन मतदान केंद्रावर दाखल झाल्याचं आज सकाळी पाहायला मिळालं. मतदान केंद्रावर हे माकड लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलं होतं. या माकडाचं नाव बजरंग असं असून त्याला घेऊन येणारे वीरू (मतदार) म्हणाले आमचा बजरंग माझ्याशिवाय राहतच नाही. त्यामुळे मला त्याला इथे आणावं लागलं.

08:11 (IST) 26 Apr 2024
नांदेडमध्ये अशोक चव्हाणांची कसोटी

नांदेड मतदारसंघात भाजपचे खासदार प्रतापराव चिखलीकर आणि काँग्रेसचे वसंत चव्हाण यांच्यात लढत होणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने नांदेडमधील राजकीय समीकरणे बदलली. अशोक चव्हाण यांच्या पक्षांतरानंतरही काँग्रेस संघटना बळकट असल्याचा दावा करण्यात येत आहे. यामुळेच नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांची खरी कसोटी आहे.

08:10 (IST) 26 Apr 2024
वर्ध्यात थेट लढत

वर्ध्यात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत आहे. भाजपतर्फे रामदास तडस तर महाविकास आघाडीतर्फे अमर काळे रिंगणात आहेत. तडस यांच्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेऊन वातावरण निर्मितीचा प्रयत्न केला. अमर काळे यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या इतरही नेत्यांनी प्रचारसभा घेतल्या. तेली विरुद्ध कुणबी अशी जातीय किनार या लढतीला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासाठी ही जागा प्रतिष्ठेची आहे. काँग्रेसकडे असलेला हा मतदारसंघ पवार यांनी यावेळी राष्ट्रवादीकडे घेतला आहे.

08:10 (IST) 26 Apr 2024
बुलढाण्यात शिवसेना विरुद्ध शिवसेना

वरकरणी युतीविरुद्ध आघाडी अशी वाटणारी बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील लढत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या उमेदवारीमुळे तिरंगी झाली आहे. त्यामुळे महायुती विरोधातील मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे. महायुतीकडून शिवसेनेचे (शिंदे गट) विद्यमान खासदार प्रतापराव जाधव, शिवसेना ठाकरे गटातर्फे नरेंद्र खेडेकर तर शेतकरी नेते रविकांत तुपकर अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. जाधव व खेडेकर हे एकसंध शिवसेनेतील कट्टर सैनिक. त्यामुळे येथे शिवसेना विरुद्ध शिवसेना अशीच लढत होत असून त्याला ‘गद्दार’ विरुद्ध ‘खुद्दार’ अशी किनार आहे. या लढतीत रविकांत तुपकर किती मते घेतात यावरच जय-पराजयाचे गणित ठरणार आहे.

आठही मतदारसंघांत चुरशीच्या लढती; दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान

राज्यात दुसऱ्या टप्प्यात आज आठ मतदारसंघांमध्ये होणाऱ्या निवडणुकीत चुरशीच्या लढती होणार आहेत. प्रकाश आंबेडकर, नवनीत राणा, प्रतापराव जाधव, संजय जाधव, प्रतापराव चिखलीकर आदी उमेदवारांचं भवितव्य ठरणार आहे. विदर्भातील पाचपैकी वर्धा, यवतमाळ-वाशीममध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत होत असून अकोला, अमरावती आणि बुलढाणा या मतदारसंघात तिरंगी लढत आहे. येथे तिसऱ्या उमेदवाराकडून होणारे मतविभाजन निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजप, काँग्रेस आणि प्रहार जनशक्ती पक्षात तिरंगी लढत होत आहे. एकूण ३७ उमेदवार रिंगणात असून बहुसंख्य कुणबी-मराठा मतदारांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पािठब्यावर अपक्ष निवडून आलेल्या नवनीत राणा यावेळी भाजपच्या उमेदवार आहेत. काँग्रेसतर्फे बळवंत वानखेडे तर बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्तीचे दिनेश बुब रिंगणात आहेत. विशेष म्हणजे, बच्चू कडू महायुतीत असूनही त्यांनी राणांविरुद्ध उमेदवार दिला असून राणांचा पराभव हेच आपले ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Web Title: Lok sabha election 2024 phase 2 live updates maharashtra buldhana akola amravati wardha yavatmal washim hingoli voting updates asc

First published on: 26-04-2024 at 08:05 IST