India Lok Sabha Election 2024 Phase 3 Voting Updates, 07 May : देशात यंदा लोकसभा निवडणूक एकूण सात टप्प्यांत होत आहे. यापैकी १९ एप्रिलला पहिला टप्पा आणि २६ एप्रिलला दुसरा टप्पा पार पडला आहे. आज (मंगळवार, ७ मे) लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. यामध्ये इंडिया आघाडी आणि भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीत चुरस निर्माण झाली आहे. तिसऱ्या टप्प्यात देशातील १० राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशामधील एकूण ९३ जागांसाठी मतदान होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ११ लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या टप्प्यात मतदान होणाऱ्या महाराष्ट्रातील काही मतदारसंघाकडे अवध्या देशाचे लक्ष लागलं आहे. यात बारामती, कोल्हापूर, सांगलीसह इतर काही मतदारसंघांचा समावेश आहे.
Lok Sabha Polls 2024 Phase Three Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील एकूण ११ मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे
सांगली : अपक्ष उमेदवाराच्या नावाने अनाधिकृत उमेदवार प्रतिनिधी नियुक्त करण्यात आल्याच्या कारणावरून साखराळे (ता. वाळवा) येथे मतदानावेळी महायुतीचे खा. धैर्यशीन माने समर्थक आणि महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील सरूडकर समर्थकांच्यात जोरदार हाणामारी झाली. पोलीसांनी हस्तक्षेप करत पुढील अनर्थ टाळला असला तरी तणाव निर्माण झाला होता.
पुणे : बारामती लोकसभा मतदार संघातून सकाळी कमी प्रमाणात मतदान झाले असताना दुपारी १.३० वाजेपर्यंत २७.५५ टक्के मतदान झाले आहे. विशेषतः भोर विधानसभा मतदार संघात सर्वाधिक ३३.४१ टक्के, तर त्यापाठोपाठ बारामती विधानसभा मतदासंघात ३२.११ टक्के मतदान झाले आहे.
बारामती : केवळ राज्याचेच नव्हे तर देशाचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीमध्ये मतदानाचा पवित्र हक्क बजाविण्यासाठी साहिल बोराटे हा युवक थेट लंडनहून मंगळवारी बारामतीमध्ये पोहोचला. मतदान केल्यानंतर मंगळवारी रात्रीच तो लंडनला परतणार आहे.
लातूर- ४४.४८ टक्के
सांगली- ४१.३० टक्के
बारामती- ३४.९६ टक्के
हातकणंगले- ४९.९४ टक्के
कोल्हापूर- ५१.५१ टक्के
माढा- ३९.११ टक्के
उस्मानाबाद- ४०.९२ टक्के
रायगड- ४१.४३ टक्के
रत्नागिरी–सिंधुदूर्ग- ४४.७३ टक्के
सातारा- ४३.८३ टक्के
सोलापूर- ३९.५४ टक्के
काही दिवसांपूर्वी काँग्रेसचा पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलेल्या राधिका खेरा यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. तसेच प्रसिद्ध अभिनेते शेखर सुमन यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी भाजपा नेते विनोद तावडे उपस्थित होते.
भाजपाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी शहा नामक व्यक्ती पैसे वाटत असल्याचे घटनास्थळावरून सांगण्यात आले.
जिल्ह्यात उष्णतेचा पारा ४१ डिग्रीच्या पुढे गेला असून सकाळी आठ वाजल्यापासूनच उन्हाचे चटके जाणवत आहेत.
माढा लोकसभेचे भाजपा उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मतदानाचा हक्क बजावला.
आसाम – 27.34%
बिहार – 24.41%
छत्तीसग – 29.90%
दादरा आणि नगर हवेली, दिव आणि दमन – 24.69%
गोवा – 30.94%
गुजरात – 24.35%
कर्नाटक – 24.48%
मध्ये प्रदेश – 30.21%
महाराष्ट्र – 18.18%
उत्तर प्रदेश – 26.12%
पश्चिम बंगाल – 32.82%.
माढा लोकसभेचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला.
विधानसभेच्या सातारा मतदारसंघ क्षेत्रात सर्वाधिक २०.६९ टक्के तर वाई विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात सर्वात कमी १७.६४ टक्के मतदान झाले आहे. तप्त उष्म्याचा मतदानावर परिणाम होत आहे. बहुतांश मतदान केंद्रावर शुकशुकाट जाणवत आहे. काही मतदान केंद्रावर रांग दिसत आहेत.
रायगड – 14.84%
माढा – 15.27%
सोलापूर – 16.17%
सातारा – 18.85%
सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १८.१८ टक्के मतदान झाले.
लातूर – २०.७४
सांगली – १६.६१
बारामती – १४.६४
हातकणंगले – २०.७४
कोल्हापूर -२३.७७
माढा – १५ .११
उस्मानाबाद -१७.०६
रायगड – १७.१८
रत्नागिरी -सिंधुदूर्ग-२१.१९
सातारा -१८.९४
सोलापूर -१५.६९
पुणे : राज्यासह संपूर्ण देशभराचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघासाठी आज (७ मे) मतदान होत आहे. सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. सध्या उन्हाचा तडाखा बसत असल्याने सकाळपासूनच मतदार हे मतदानासाठी बाहेर पडल्याचे दिसून आले. सुरुवातीच्या दोन तासात ५.७७ टक्के मतदान झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
सकाळी ११ वाजेपर्यंत या मतदारसंघात १४.६४ टक्के मतदान झाले. आतापर्यंत सर्वाधिक १८.६३ टक्के मतदान बारामती विधानसभा मतदारसंघात झाले आहे. त्या खालोखाल इंदापूर विधानसभा मतदारसंघात १४.६८ टक्के मतदान झाले आहे. पुरंदर विधानसभा मतदारसंघात १४.८ टक्के, खडकवासला विधानसभा मतदारसंघात १४ टक्के, भोर १३.८ टक्के, तर दौंडमध्ये १२ टक्के मतदान झाले आहे.
पुणे : दौंड तालुक्यातील कुसेगाव येथे ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याने सव्वा तास मतदान केंद्र बंद होते. ३१ नागरिकांनी मतदानाचा हक्क बजाविल्यानंतर सव्वा सातच्या सुमारास यंत्र बंद पडले. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिलांसह मतदारांना त्रास सहन करावा लागला. सव्वा नऊच्या तांत्रिक बिघाड दूर केल्यानंतर मतदान पुन्हा सुरळीत सुरू झाले.
इंटरनॅशनल इलेक्शन व्हिझिटर्स प्रोग्राम आंतर्गत हे प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात दाखल झाले आहेत.
लातूर – ७.९१
सांगली – ५.८१
बारामती – ५.७७
हातकणंगले – ७.५५
कोल्हापूर -८.०४
माढा -४.९९
उस्मानाबाद -५.७९
रायगड -६.८४
रत्नागिरी -सिंधुदूर्ग-८.१७
सातारा -७.००
सोलापूर -५.९२
सोलापूर : सोलापूर आणि माढा मतदारसंघात सकाळी सात वाजता मतदान प्रक्रियेस सुरूवात झाली. पहिल्या दोन तासात सोलापुरात ५.९७ टक्के तर माढ्यात ५.१५ टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हा निवडणूक यंत्रणेकडून प्राप्त झाली. यंदाच्या उन्हाळ्यात तापमानाचा पारा ४४ अंशांच्या पुढे गेल्यामुळे उष्म्याचा असह्य त्रास टाळण्यासाठी सकाळी मतदान करण्याकडे मतदारांचा कल दिसून येत असून मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्याचे दिसून आले. तथापि, दुसरीकडे मतदान केंद्रांमध्ये मतयंत्र बिघडून बंद पडण्याचे प्रकारही घडत आहेत.
मतदान केंद्रांवर मोबाईल यंत्र घेऊन येण्यास पोलीस मज्जाव करून मतदारांना परत पाठवत आहेत. त्यामुळे किरकोळ वाद, शाब्दिक बाचाबाची होताना दिसून आली. जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मतदानाच्या आदल्या दिवशी पत्रकार परिषदेत बोलताना, मतदान केंद्रांवर मतदारांना मोबाईल वापरता येणार नाही. मोबाईल सायलेंट मोडवर किंवा बंद करून ठेवून घेऊन जाण्यास हरकत नाही, असे स्पष्ट केले होते. प्रत्यक्षात मतदान केंद्रांवर मोबाईल घेऊन येणा-या मतदारांना परत पाठविले जात होते. त्यामुळे वाद होत होते.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगडचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी रोहा तालुक्यातील दुरटोली या मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.
शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांनी अलिबाग तालुक्यातील शेजारी मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला
सांगली – 5.81%
माढा – 5.15%
सोलापूर – 5.97%
रायगड – 6.84%
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी मतदानाचा हक्क बजावला.
आसाम – 10.12%
बिहार – 10.03%
छत्तीसगड – 13.24%
दादरा आणि नगर हवेली, दमन आणि दिव -10.13%
गोवा – 12.35%
गुजरात – 9.87%
कर्नाटक – 9.45%
मध्य प्रदेश – 14.22%
महाराष्ट्र – 6.64%
उत्तर प्रदेश – 11.63%
पश्चिम बंगाल – 14.60%.
ज्येष्ठ नेते शरद पवार व बारामती लोकसभेच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी बारामतीत माळेगाव येथे मतदान केले.
– रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघांमध्ये सकाळी सात वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात
– रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बजावला मतदानाचा हक्क
– रत्नागिरीतील पाली येथील मतदान केंद्रावर जाऊन केलं मतदान
बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलिया देशमुख या दोघांनी मुंबईवरून लातूरला जाऊन मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर रितेशने मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं. रितेश म्हणाला ऊन थोडं जास्त आहे, मात्र सर्वांनी एक दिवस देशासाठी काढावा आणि ऊनाकडे दुर्लक्ष करून मतदान करावं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमध्ये मतदानाचा हक्क बजावला आहे. तसेच यावेळी पंतप्रधान मोदींनी जनतेला मतदान करण्याच आवाहन केले.
आमदार रोहित पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मतदान केले.
राज्यातील ‘या’ ११ मतदारसंघात मतदान
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यांत महाराष्ट्रातील कोल्हापूर, लातूर, बारामती, माढा, हातकणंगले, रायगड, धाराशिव (उस्मानाबाद), रत्नागिरी-सिंधुदुर्ग, सोलापूर, सांगली आणि सातारा या ११ मतदारसंघात ७ मे रोजी मतदान होत आहे. बारामती, कोल्हापूर, सांगलीकडे राज्याचे लक्ष असणार आहे. कारण मागील काही दिवसांपासून हे मतदारसंघ जास्त चर्चेत राहिले आहेत. या ११ लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमधील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.