India Lok Sabha Election 2024 Phase 5 Voting Live Updates, 20 May: महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांच्या सर्व टप्प्यांमध्ये सर्वाधिक १३ मतदारसंघांमध्ये पाचव्या म्हणजेच आजच्या टप्प्यात मतदान होत आहे. कल्याण, ठाणे आणि मुंबईतल्या सर्व सहा मतदारसंघांसह भिवंडी, नाशिक, दिंडोरी, धुळे, पालघर या मतदारसंघांमध्येही महाविकास आघाडी व महायुतीचे उमेदवार आमने-सामने आले आहेत. यात अनेक दिग्गज नेत्यांचाही समावेश आहे. त्यामुळे पाचव्या टप्प्यातील मतदारसंघ व तेथील मतदान यावर राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता आहे. या टप्प्यात दोन कोटी ४६ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून ते २६४ उमेदवारांचे भवितव्य निश्चित करतील. त्याशिवाय, राष्ट्रीय पातळीवरही तब्बल ८ राज्यांमधील ४९ जागांवर आज मतदान होत आहे. यात अनेक महत्त्वाच्या मतदारसंघांचा समावेश आहे.
Lok Sabha Polls 2024 Phase Five Live Updates: लोकसभा निवडणूक पाचवा टप्पा लाईव्ह अपडेट्स
निवडणूक आयोगानं केलं जाहीर...
ऐश्वर्या रायनं मुंबईत बजावला मतदानाचा अधिकार
प्रत्येक भारतीयानं मत द्यायला हवं. कारण हीच आपल्या देशातली खरी लोकशाही आहे.
मुंबईतील काही मतदान केंद्रांवर संथगतीने मतदान सुरू असून हा संपूर्ण प्रकार जाणीवपूर्वक सुरू आहे, असा आरोप ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. तसेच निवडणूक आयोग केवळ भाजपाची चाकरी करत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
अभिनेता रणबीर कपूरने मुंबईत मतदानाचा हक्क बजावला. पांढरे शर्ट व निळ्या डेनिममध्ये रणबीर डॅशिंग दिसत होता.
https://www.instagram.com/reel/C7L7NLqp3FB/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
अभिनेत्री व सैफ अली खानची लेक सारा अली खान हिनेदेखील मतदान केलं.
https://www.instagram.com/reel/C7L9wBgpgUl/?utm_source=ig_web_copy_link
शाहरुख खान, त्याची पत्नी गौरी, मुलगा आर्यन व मुलगी सुहाना या सर्वांनी मतदान केलं. यावेळी शाहरुखचा धाकटा लेक अबराम त्यांच्याबरोबर होता.
https://www.instagram.com/reel/C7L8DXAJgL6/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने मतदान केलं.
https://www.instagram.com/reel/C7MBeqnJgu1/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
अभिनेता शाहरुख खानने आज मुंबईतील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्याची पत्नी गौरी खान, मुलगी सुहाना आणि मुलगा आर्यनदेखील उपस्थित होते. त्यांनीही मतदानाचा हक्क बजावला. यावेळी मुंबईकरांनी मोठ्या संख्येने घराबाहेर पडून मतदान करावे, असे आवाहनही त्याने केले.
सदाबहार अभिनेत्री रेखा यांनी मुंबईत मतदान केलं.
https://www.instagram.com/reel/C7L1zXOrhHZ/?utm_source=ig_web_copy_link
महाराष्ट्रात दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ३८.७७ टक्के मतदान झालं असून मतदारसंघनिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे...
भिवंडी- 37.06 टक्के
धुळे- 39.97 टक्के
दिंडोरी- 45.95 टक्के
कल्याण - 32.43 टक्के
मुंबई उत्तर - 39.33 टक्के
मुंबई उत्तर मध्य - 37.66 टक्के
मुंबई उत्तर पूर्व - 39.15 टक्के
मुंबई उत्तर पश्चिम - 39.91 टक्के
मुंबई दक्षिण - 36.64 टक्के
मुंबई दक्षिण मध्य- 38.77 टक्के
नाशिक - 39.41 टक्के
पालघर- 42.48 टक्के
ठाणे - 36.07 टक्के
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यात २० मे रोजी सकाळी मतदानाला सुरुवात झाली. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर या भागात मतदान सुरू झाले. मात्र निवडणूक आयोगाकडून मतदार ओळखपत्र न मिळाल्याने अनेक नवमतदारांचा हिरमोड झाला. परंतु पोस्टमन सोमवारी सकाळी मतदार ओळखपत्र घेऊन घरी पोहोचल्यामुळे बहुसंख्य नवमतदारांना सोमवारी मतदानाचा हक्क बजावता आला.
भाईंदर : मिरा भाईंदर शहरातून मतदानाला चांगला प्रतिसाद मिळाला. दुपारी १ पर्यत २८ टक्के मतदानाची नोंद झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिरा भाईंदर शहराला भेट दिली. यावेळी त्यांनी गाडीतून कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
मतदान केंद्रांवरील गोंधळावरून आदित्य ठाकरेंची टीका, व्यवस्था नीट लावण्याची केली मागणी
राज ठाकरेंनी सहकुटुंब मतदानाचा अधिकार बजावला!
मतदान केंद्रावर यंत्राच्या समोर हार लावल्यामुळे आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन झाल्याचा मुद्दा उपस्थित करत नाशिकमधी अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, आपण असं कोणतंही उल्लंघन केलं नसल्याचं शांतिगिरी महाराज म्हणाले आहेत. "मशीनसमोरच्या कव्हरवर भारतमातेचं चित्र होतं. तिथे आमचा भाव म्हणून आम्ही हार चढवला फक्त. पूजा वगैरे केली नाही. फक्त ठेवून दिला. आमचे वकील कायदेशीर बाबींमध्ये लक्ष घालत आहेत. हे आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन आहे याची आम्हाला कल्पना नव्हती. आमची भावना स्पष्ट आहे. जळी-स्थळी-काष्टी-पाषाणी सर्वत्र भगवंत आहेत हा आमचा विश्वास आहे", असं ते म्हणाले.
मुंबई आणि ठाण्यातील काही मतदारसंघांमध्ये ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. ठाण्यातील नौपाड्यात नरेश म्हस्केंनी या प्रकारावर संताप व्यक्त केला. तर मुंबईत ठाकरे गटाचे नेते आदेश बांदेकर यांनीही या परिस्थितीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
राज्यातल्या १३ मतदारसंघांमध्ये पाचव्या टप्प्यात २७.७८ टक्के मतदान झालं आहे.
मतदारसंघनिहाय आकडेवारी...
धुळे- २८.७३ टक्के दिंडोरी- ३३.२५ टक्के नाशिक - २८.५१ टक्के पालघर- ३१.०६ टक्के भिवंडी- २७.३४ टक्के कल्याण - २२.५२ टक्के ठाणे - २६.०५ टक्के मुंबई उत्तर - २६.७८ टक्के मुंबई उत्तर - पश्चिम - २८.४१ टक्के मुंबई उत्तर - पूर्व - २८.८२ टक्के मुंबई उत्तर - मध्य - २८.०५ टक्के मुंबई दक्षिण - मध्य- २७.२१ टक्के मुंबई दक्षिण - २४.४६ टक्के
देशभरातील ४९ राज्यांमध्ये आज मतदान होत असून दुपारी एक वाजेपर्यंत सरासरी ३६.७३ टक्के मतदान पार पडलं आहे.
राज्यनिहाय आकडेवारी...
महाराष्ट्र - २७.७८ टक्के
बिहार - ३४.६२ टक्के
झारखंड - ३४.७९ टक्के
लडाख - ५२.०२ टक्के
ओडिशा - ३५.३१ टक्के
उत्तर प्रदेश - ३९.५५ टक्के
पश्चिम बंगाल - ४८.४१ टक्के
काँग्रेस नेते व रायबरेली-वायनाडमधील उमेदवार राहुल गांधी यांनी आज दुपारी रायबरेली मतदारसंघातील मतदान केंद्रावर जाऊन पाहणी केली.
मी निवडणूक आयोगाचा नॅशनल आयकॉन आहे. मतदानासंदर्भात जनजागृती करण्यासंदर्भातल्या अनेक उपक्रमांमध्ये मी सहभागी होतो. त्याचा मला अभिमान आहे. समस्या दोन प्रकारे होतात. तुम्ही विचार न करता कृती करता किंवा फक्त विचार करता, त्यावर कृती करत नाहीत. मी फक्त एवढीच विनंती सगळ्यांना करेन की कृपा करून तुम्ही मतदानाला या. आपल्या देशाच्या भवितव्यासाठी हे फार महत्त्वाचं आहे - सचिन तेंडुलकर
महाराष्ट्रात महायुतीच्या ४५ जागा निवडून येतील. विरोधकांचा सुपडा साफ होईल. ज्या बाळासाहेबांनी काँग्रेसला धडा शिकवला, त्याच बाळासाहेबांचा वारसा सांगणाऱ्यांनी काँग्रेसला अभिमानाने मतदान केलंय. हा शिवसेनेच्या आजपर्यंतच्या वाटचालीतला काळा दिवस आहे - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
महाराष्ट्रात सकाळी ११ वाजेपर्यंत १५.९३ टक्के मतदान
महिला मतदार टर्निंग पॉइंट असेल का? असा प्रश्न विचारताच राज ठाकरे म्हणाले, "मला माहिती नाही. मी काय ज्योतिषी म्हणून बसलोय का?"
उन्हाळ्याचे दिवस आहेत. आत्ताच सुरुवात झाली आहे. १०-११ वाजले आहेत. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत बघू किती मतदान होतंय. मुंबईकर जास्तीत जास्त प्रमाणात बाहेर पडून मतदान करतील अशी अपेक्षा आहे. मतदारांना आवाहन म्हणून नेहमीचंच घिसंपिटं वाक्य सांगेन, मतदानाचा हक्क बजावा. पहिल्यांदाच मतदानाचा अधिकार मिळालेले तरुण-तरुणी मतदानासाठी उतरतील. पण ज्यांच्या आशा संपल्या आहेत, त्यांच्याकडून तुम्ही मतदानासाठी अपेक्षा ठेवू शकत नाहीत - राज ठाकरे
एका बाजूला मुडदे पडले आहेत. निरपराथ लोक मरण पावले आहेत आणि तिथून समोरून देशाचे पंतप्रधान रोड शो करतात. हे किती असंवेदनशील आहे. ईशान्य मुंबईत नारायण राणे, राज ठाकरे असे सगळे आले. तुम्हाला रस्त्यावर आम्ही उतरवलंय. आता तुम्ही घाम गाळताय. राज ठाकरेंनी स्वत:च्या पक्षासाठी एवढी मेहनत घेतली असती, तर कदाचित त्यांच्या कार्यकर्त्यांना चांगले दिवस आले असते. भाजपानं अनेकांना भाड्यानं घेतलं आहे. त्यामुळे त्यांना रस्त्यावर उतरावं लागतंय. असे काय महान दिवे लावले आहेत मोदी शाहांनी? ज्या मोदी-शाहांना महाराष्ट्रात पाय ठेवू नका असं तुम्ही सांगत होतात, त्यांच्या पखाल्या वाहताना आम्ही तुम्हाला पाहिलं, आम्हाला वाईट वाटलं - संजय राऊत</p>
आज राज्यातल्या पाचव्या टप्प्यासाठी मतदान होतंय. निवडणूक आयोग पूर्णपणे सत्ताधाऱ्यांच्या अंमलाखाली आहे. तरीही विरोधक जिद्दीनं उतरले आहेत. सर्वत्र प्रचंड पैशाचा वाटप चालू आहे. निवडणूक आयोगानं काहीही कारवाई केली नाही. पैसे सोडून दिले. नंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगांमधून त्यांची चड्डी-बनियन दाखवले फक्त. अखिलेश यादव यांनी काल उत्तर प्रदेशातलं एक ट्वीट केलं. भाजपाच्या एका कार्यकर्त्यानं ७ वेळा कसं मतदान केलं हे दाखवलं. आयोगानं काय कारवाई केली? आयोग सध्या भाजपाची एक शाखा म्हणून काम करतेय - संजय राऊत</p>
दुपारी अति तीव्र उन्हाच्या झळा लागत असल्याने सकाळी सकाळी मतदान करावे या हेतूने अनेक जण आलेले आहेत.
महाराष्ट्रातील १३ मतदारसंघांमध्ये सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी ६.३३ टक्के मतदान झाल्याची माहिती समोर आली आहे.
धुळे- ६.९२ टक्के दिंडोरी- ६.४० टक्के नाशिक - ६.४५ टक्के पालघर- ७.९५ टक्के भिवंडी- ४.८६ टक्के कल्याण - ५.३९ टक्के ठाणे - ५.६७ टक्के मुंबई उत्तर - ६.१९ टक्के मुंबई उत्तर - पश्चिम - ६.८७ टक्के मुंबई उत्तर - पूर्व - ६.८३ टक्के मुंबई उत्तर - मध्य - ६.०१ टक्के मुंबई दक्षिण - मध्य- ७.७९ टक्के मुंबई दक्षिण - ५.३४ टक्के
अभिनेता फरहान अख्तर
https://twitter.com/SurrbhiM/status/1792379650288624053
अभिनेत्री शोभा खोटे
https://twitter.com/ANI/status/1792400516988977209
चित्रपट निर्माते कुणाल कोहली
https://twitter.com/PTI_News/status/1792397760173351311
जान्हवी कपूर
https://twitter.com/shaandelhite/status/1792393066093203902
परेश रावल
https://twitter.com/ANI/status/1792403662951886898
राजकुमार राव
(संग्रहित छायाचित्र) फोटो-लोकसत्ता टीम