India Lok Sabha Election 2024 Phase 5 Voting Live Updates, 20 May: महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांच्या सर्व टप्प्यांमध्ये सर्वाधिक १३ मतदारसंघांमध्ये पाचव्या म्हणजेच आजच्या टप्प्यात मतदान होत आहे. कल्याण, ठाणे आणि मुंबईतल्या सर्व सहा मतदारसंघांसह भिवंडी, नाशिक, दिंडोरी, धुळे, पालघर या मतदारसंघांमध्येही महाविकास आघाडी व महायुतीचे उमेदवार आमने-सामने आले आहेत. यात अनेक दिग्गज नेत्यांचाही समावेश आहे. त्यामुळे पाचव्या टप्प्यातील मतदारसंघ व तेथील मतदान यावर राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता आहे. या टप्प्यात दोन कोटी ४६ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून ते २६४ उमेदवारांचे भवितव्य निश्चित करतील. त्याशिवाय, राष्ट्रीय पातळीवरही तब्बल ८ राज्यांमधील ४९ जागांवर आज मतदान होत आहे. यात अनेक महत्त्वाच्या मतदारसंघांचा समावेश आहे.
Lok Sabha Polls 2024 Phase Five Live Updates: लोकसभा निवडणूक पाचवा टप्पा लाईव्ह अपडेट्स
‘मतदानाचा दिवस हा तुमचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस नाही’, देवेंद्र फडणवीसांनी शेअर केला चिमुकलीचा व्हिडीओ. हातात मतदानाचं आवाहन करणारा फलक घेऊन चौकात उभ्या चिमुकलीचा व्हिडीओ व्हायरल!
It couldn’t get more natural, and genuine !
— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) May 20, 2024
She understood the importance of Voting, hope you do too and VOTE today!
…तो बात समझ आई?
पहले ख़ुद वोट करें और फिर दूसरों से भी कहें।#Election2024 #Maharashtra #GoTV #VoteKaro pic.twitter.com/asos7n7XLY
‘दंगल’फेम अभिनेत्री सान्या मल्होत्रा हिनं आज सकाळी मुंबईत मतदानाचा अधिकार बजावला आहे.
#WATCH | Actor Sanya Malhotra shows the indelible ink mark on her finger after casting her vote at a polling booth in Mumbai.#LokSabhaElections2024 pic.twitter.com/ajbM69mtqJ
— ANI (@ANI) May 20, 2024
आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनीही बजावला मतदानाचा अधिकार, म्हणाले, “आपण मत देतो तेव्हा मोठा अभिमान वाटतो. जी काही व्यवस्था उभी केली आहे, ती सोपी नाही. खूप मोठ्या प्रमाणावर व्यवस्था उभी करावी लागते. त्यामुळे सगळ्यांसाठीच ही मोठ्या अभिमानाची बाब आहे. सगळ्यांनी घराबाहेर पडून मतदान करायला हवं”!
#WATCH | RBI Governor Shaktikanta Das arrives at a polling station in Mumbai to cast his vote for #LokSabhaElections2024 pic.twitter.com/ZlsL3b0jte
— ANI (@ANI) May 20, 2024
जान्हवी कपूरनं बजावला मतदानाचा अधिकार.. मत देऊन बाहेर आल्यानंतर आवाहन करताना म्हणाली, “कृपा करून सगळ्यांनी घराबाहेर पडा आणि मतदान करा”!
#WATCH | Bollywood Actress Janhvi Kapoor casts her vote at a polling station in Mumbai for #LokSabhaElections2024
— ANI (@ANI) May 20, 2024
"Please come out and vote, " she says pic.twitter.com/5Ki6JH30Et
ठाणे
मतदारसंख्या – २५,०८,०७२
एकूण केंद्र – २४५३
वेबकास्टिंग केंद्र – १२२७
संवेदनशील केंद्र – ०१
कल्याण
मतदारसंख्या – २०,८२,८००
एकूण केंद्र – १९६०
वेबकास्टिंग केंद्र – ९९१
संवेदनशील केंद्र – ००
भिवंडी
मतदारसंख्या – २०,८७,६०४
एकूण केंद्र – २१९१
वेबकास्टिंग केंद्र – ११०७
संवेदनशील केंद्र – ०६
उत्तर मुंबई</p>
मतदान केंद्र – १७०२
संवेदनशील केंद्र – ३०
उमेदवार – १९
वायव्य मुंबई
मतदान केंद्र – १७५३
संवेदनशील केंद्र – २१
उमेदवार – २१
ईशान्य मुंबई
मतदान केंद्र – १६८२
संवेदनशील केंद्र – ३२
उमेदवार – २०
उत्तर-मध्य मुंबई
मतदान केंद्र – १६९८
संवेदनशील केंद्र – ३०
उमेदवार – २७
दक्षिण मध्य मुंबई
मतदान केंद्र – १५३९
संवेदनशील केंद्र – ००
उमेदवार – १५
दक्षिण मुंबई
मतदान केंद्र – १५३०
संवेदनशील केंद्र – ११
उमेदवार – १४
ठाणे
राजन विचारे वि. नरेश म्हस्के
कल्याण
श्रीकांत शिंदे वि. वैशाली दरेकर
भिवंडी
कपिल पाटील वि. सुरेश म्हात्रे वि. निलेश सांबरे
नाशिक
हेमंत गोडसे वि. राजाभाऊ वाजे वि. शांतिगिरी महाराज
धुळे
सुभाष भामरे वि. शोभा बच्छाव
दिंडोरी
भारती पवार वि. भास्कर भगरे
वायव्य मुंबई</p>
अमोल किर्तीकर वि. रवींद्र वायकर
उत्तर मध्य मुंबई
वर्षा गायकवाड वि. उज्ज्वल निकम
दक्षिण मुंबई
अरविंद सावंत वि. यामिनी जाधव
दक्षिण मध्य मुंबई
राहुल शेवाळे वि. अनिल देसाई
उत्तर मुंबई
पियुष गोयल वि. भूषण पाटील
ईशान्य मुंबई
मिहीर कोटेचा वि. संजय दीना पाटील
ठाण्यातील नौपाडा मतदारसंघात सकाळी तासाभरापासून मतदानयंत्रात बिघाड झाल्याचं दिसून आलं. या पार्श्वभूमीवर नरेश म्हस्के यांनी मतदानकेंद्रावर दाखल होत मतदानासाठी वेळ वाढवून देण्याची मागणी केली आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, पाचव्या टप्प्यात एकूण ६९५ उमेदवार ४९ जागांमध्ये निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पाचव्या टप्प्यातील निवडणुकीसाठी एकूण १५८६ जणांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी तब्बल ७४९ अर्ज वैध ठरले. मात्र, त्यातीलही काहींनी अर्ज मागे घेतले. पहिल्या चार टप्प्यांमध्ये साधारण ६० ते ६९ टक्के मतदान झालं आहे. यात चौथ्या टप्प्यात सर्वाधिक ६९.१६ टक्के मतदान झालं आहे.
राहुल गांधी – रायबरेली लोकसभा मतदारसंघ
स्मृती इराणी – अमेठी लोकसभा मतदारसंघ
राजनाथ सिंह – लखनौ लोकसभा मतदारसंघ
रोहिणी आचार्य (लालूप्रसाद यादव यांच्या कन्या) – सारण लोकसभा मतदारसंघ
चिराग पासवान – हाजीपूर लोकसभा मतदारसंघ
पियूष गोयल – उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ
ओमर अब्दुल्ला – बारामुल्ला लोकसभा मतदारसंघ
महाराष्ट्रातील १३ मतदारसंघांशिवाय…
उत्तर प्रदेश (१४ जागा)
पश्चिम बंगाल (७ जागा)
बिहार (५ जागा)
ओडिशा (५ जागा)
झारखंड (३ जागा)
जम्मू-काश्मीर (१ जागा) आणि
लडाख (१ जागा)
या ठिकाणी आज मतदान होत आहे.
ईशान्य मुंबई, दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर मुंबई, वायव्य मुंबई, उत्तर मध्य मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, नाशिक, दिंडोरी, धुळे.
आधीच्या टप्प्यांचा मतटक्का
’पहिला टप्पा : ६३.७१
’दुसरा टप्पा : ६२.७१
’तिसरा टप्पा : ६३.५५
’चौथा टप्पा : ६२.२१
मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर १२ ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरण्यात आले आहेत. त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखवल्यानंतर मतदान करता येईल. मतदार ओळखपत्र नसलेल्या मतदारांसाठी पारपत्र (पासपोर्ट), वाहन चालक परवाना (ड्रायिव्हग लायसन्स), केंद्र अथवा राज्य शासन, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र, बँक किंवा टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित केलेले पासबुक, पॅन कार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अंतर्गत भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्ड, ‘मनरेगा’चे रोजगार ओळखपत्र, निवृत्तिवेतनाची कागदपत्रे, संसद, विधानसभा, विधान परिषदेच्या सदस्यांनी दिलेले अधिकृत ओळखपत्र, आधार कार्ड, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाच्या वतीने अपंगांना दिलेले विशेष ओळखपत्र, कामगार मंत्रालयाद्वारे वितरित आरोग्य विमा स्मार्ट कार्ड हे पुरावे मतदानासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत.
सकाळी ७ ते सायंकाळी ६ अशी मतदानाची वेळ आहे. मतदान प्रक्रियेत बाधा निर्माण करणे, मतदान केंद्रांवरील शांतता भंग करणे तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्यासाठी मोबाइलचा गैरवापर होण्याची शक्यता गृहीत धरून मतदान केंद्रांवर मोबाइल घेऊन जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. मतदारांना मतदान केंद्रापासून १०० मीटर अंतरावर मोबाइल ठेवून मतदानासाठी जावे लागेल.
मुंबईत जेमतेम ५० टक्क्यांच्या आसपास मतदान होते. मुंबईत २०१९ मध्ये सरासरी ५५ टक्के मतदान झाले होते.
राज्यात चार टप्प्यांमध्ये सरासरी ६२ टक्के मतदान झाले असले तरी मुंबई आणि ठाण्यात मतदानाची टक्केवारी वाढवण्यावर पक्षांचा कटाक्ष असेल. अखेरच्या टप्प्यातील १३ मतदारसंघांमध्ये २४ हजार ५७९ मतदान केंद्रे आहेत. त्यापैकी १६० मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत.
वादग्रस्त भाजपा नेते ब्रिजभूषण सिंह यांनी मुलगा करण भूषण सिंह यांच्या कैसरगंज मतदारसंघातील उमेदवारीवर भाष्य केलं आहे.
#WATCH | Gonda, Uttar Pradesh: On his son and BJP candidate from Kaiserganj Karan Bhushan Sharan Singh, BJP MP Brij Bhushan Singh says, "Everyone is happy with his candidature. Karan Bhushan Singh is attached to the youth of Gona. He is a National player so he is interested in… pic.twitter.com/91LS1HWXHw
— ANI (@ANI) May 20, 2024
माझं मत हे चांगल्या प्रशासनासाठी आहे. सर्व नागरिकांची काळजी घेणाऱ्या सरकारसाठी आहे. कृपया सगळ्यांनी घराबाहेर पडून मतदान करायला हवं – फरहान अख्तर
VIDEO | Lok Sabha Elections 2024: “My vote is for good governance, the government that looks after all people. Please step out and vote,” said actor Farhan Akhter who arrived at a polling station in Bandra West, Mumbai to cast his vote.
— Press Trust of India (@PTI_News) May 20, 2024
(Full video available on PTI Videos -… pic.twitter.com/x42ZhuqLMz
उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री व बसपच्या अध्यक्षा मायावती यांनी सकाळी ७ वाजताच मतदानाचा अधिकार बजावला आहे.
#WATCH | Former Uttar Pradesh CM and BSP chief Mayawati shows her inked finger after casting her vote for #LokSabhaElections2024 at a polling station in Lucknow. pic.twitter.com/ZmtmwJg8Yq
— ANI (@ANI) May 20, 2024
उद्योगपती अनिल अंबानी यांनीही मतदानासाठी मुंबईत मतदान केंद्रावर रांगेत उभं राहात आपला हक्क बजावला. रांगेत उभं राहिलेला त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
#WATCH | Industrialist Anil Ambani stands in a queue at a polling booth in Mumbai, as he waits for the voting to begin.#LokSabhaElections2024 pic.twitter.com/UUCC9iOmyu
— ANI (@ANI) May 20, 2024
अभिनेता अक्षय कुमारनं आज मुंबईत मतदानाचा हक्क बजावला असून नागरिकांनीही मोठ्या संख्येनं मतदानासाठी घराबाहेर पडावं, असं आवाहन त्यानं केलं आहे.
#WATCH | Actor Akshay Kumar shows the indelible ink mark on his finger after casting his vote at a polling booth in Mumbai.
— ANI (@ANI) May 20, 2024
He says, "…I want my India to be developed and strong. I voted keeping that in mind. India should vote for what they deem is right…I think voter… pic.twitter.com/mN9C9dlvRD
नाशिकमधील अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांनी मतदान करण्यापूर्वी ईव्हीएम मशीनला हार घातल्याची जोरदार चर्चा! सोशल मीडियावर उमटल्या प्रतिक्रिया
बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना तयार केली. त्यात प्रत्येकाला मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. सर्व जनतेला आवाहन आहे की त्यांनी १०० टक्के मतदान करावं. हृदयातल्या भगवंताला योग्य उमेदवार कोण हे विचारा आणि त्यानंतर त्या उमेदवाराला मतदान द्यावं. मतदान ही अत्यंत पवित्र प्रक्रिया आहे. सर्व नागरिक तिथे मतदान करणार आहेत. त्यांना सद्बुद्धी यावी, भविष्यात कुणाला पश्चात्ताप होण्याची वेळ येऊ नये यासाठी आम्ही इव्हीएम मशीनला हार अर्पण केला आहे. – शांतिगिरी महाराज
या वेळची निवडणूक संविधानाच्या रक्षणासाठी आहे. प्रत्येकानं मतदानाचा अधिकार बजावायला हवा. लोकशाहीच्या सोहळ्यात सगळ्यांनी मोठ्या प्रमाणावर सामील व्हावं – वर्षा गायकवाड</p>
सकाळी ७ ते ९ च्या दरम्यान ठाण्यात दीड हजाराच्या आसपास लोकं मतदानासाठी आणून ठेवली आहेत. ते बोगस मतदान करणार आहेत, अशी माहिती मला काही सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार मी जागरूक नागरिकांना आवाहन करतो की आपण सकाळी ७ ते ९ च्या दरम्यान मतदानाचा अधिकार बजावावा – राजन विचारे, ठाण्यातील मविआचे उमेदवार
Lok Sabha Polls 2024 Phase Five Live Updates: महाराष्ट्र लोकसभा निवडणूक पाचवा टप्पा लाईव्ह अपडेट