India Lok Sabha Election 2024 Phase 6 Voting Updates: लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी आज, शनिवारी सहा राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधील ५८ मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. दिल्लीतील सर्व सात आणि हरियाणातील सर्व दहा जागांवर मतदान होणार असून सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आली आहे. सकाळी सात वाजता मतदान सुरु झालं आहे. या ५८ मतदारसंघांमध्ये ११.१३ कोटी मतदार असून ५.८४ कोटी पुरुष व ५.२९ कोटी महिला मतदारांचा समोवश आहे. निवडणूक आयोगाने १.१४ लाख मतदान केंद्रांवर सुमारे ११.४० लाख मतदान अधिकारी तैनात केले आहेत. सध्या देशाच्या अनेक भागांत तीव्र उकाडा जाणवत असून आधीच्या टप्प्यांमध्ये मतदारांना उन्हाचा त्रास झाल्याने निवडणूक आयोगाने निवडणूक अधिकारी व राज्य यंत्रणांना पुरेशा उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. जाणून घ्या या टप्प्याचे अपडेट्स

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

India Lok Sabha Election 2024 Phase 6 Voting |लोकसभा निवडणुकीचा सहावा टप्पा, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

18:42 (IST) 25 May 2024
संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ५७ टक्के मतदान

बिहार – ५२.२४ टक्के

हरियाणा- ५५.९३ टक्के

जम्मू आणि काश्मीर- ५१.३५ टक्के

झारखंड – ६१.४१ टक्के

दिल्ली – ५३.७३ टक्के

ओदिशा – ५९. ६० टक्के

उत्तर प्रदेश- ५२. ०२ टक्के

पश्चिम बंगाल – ७७.९९ टक्के

16:18 (IST) 25 May 2024
सहाव्या टप्प्यात दुपारी ३ पर्यंत ४९ टक्के मतदान, वाचा कुठे किती मतदान पार पडलं?

सहाव्या टप्प्यात दुपारी ३ पर्यंत ४९ टक्के मतदान पार पडलं आहे. कुठल्या राज्यात किती टक्के मतदान दुपारी ३ पर्यंत झालंय जाणून घेऊ.

बिहार ४५.२१ टक्के

हरियाणा -४६.२६ टक्के

जम्मू काश्मीर – ४४.४१ टक्के

दिल्ली – ४४.५८ टक्के

ओदिशा – ४८.४४ टक्के

उत्तर प्रदेश – ४३.९५ टक्के

पश्चिम बंगाल- ७०.१९ टक्के

15:06 (IST) 25 May 2024
लोकसभेच्या सहाव्या टप्प्यात दुपारी १ पर्यंत ३९.१३ टक्के मतदान

लोकसभेच्या सहाव्या टप्प्यात दुपारी १ पर्यंत ३९.१३ टक्के मतदान झालं आहे. कुठल्या राज्यात किती मतदान झालं आहे जाणून घेऊ.

बिहार-३६.४८ टक्के

हरियाणा-३६.४८ टक्के

जम्मू काश्मीर-३५.२२ टक्के

झारखंड – ४२.५४ टक्के

एनसीटी आणि दिल्ली- ३४.३७ टक्के

उत्तर प्रदेश – ३७.२३ टक्के

पश्चिम बंगाल- ५४.८० टक्के

आत्तापर्यंत जी माहिती समोर आली आहे त्यानुसार पश्चिम बंगालमध्ये दुपारी १ वाजेपर्यंत सर्वाधिक म्हणजेच ५४.८० टक्के मतदान झालं आहे.

https://platform.twitter.com/widgets.js

15:02 (IST) 25 May 2024
लोकसभा निवडणुकीचा निकाल भाजपाच्या बाजूनेच लागेल, मोदीच पंतप्रधान होतील-मनेका गांधी

लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या बाजूनेच लागेल आणि पुन्हा एकदा मोदीच पंतप्रधान होतील असा विश्वास भाजपाच्या खासदार मनेका गांधींनी व्यक्त केला आहे. आज मनेका गांधींनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना ही गोष्ट स्पष्ट केली आहे.

https://platform.twitter.com/widgets.js

14:57 (IST) 25 May 2024
सोनिया गांधी, राहुल गांधींनी बजावला मतदानाचा हक्क

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला आहे. तसंच प्रियांका गांधीनीही मतदान केलं. आम्ही लोकशाही वाचवण्यासाठी मतदान केल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

12:07 (IST) 25 May 2024
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही बजावला मतदानाचा हक्क

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मतदानाचा हक्क काही वेळापूर्वी बजावला. माझे वडील, मी, माझी पत्नी, मुलं यांच्यासह मतदानाचा हक्क मी बजावला आहे. माझ्या आईची प्रकृती बरी नाही त्यामुळे ती मतदान करु शकली नाही. मी हुकूमशाहीच्या विरोधात, बेरोजगारीच्या आणि महागाईच्या विरोधात मतदान केलं आहे, तुम्हालाही आवाहन करु इच्छितो की तुम्हीही मतदान करा असं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

https://platform.twitter.com/widgets.js

11:59 (IST) 25 May 2024
मतदानाचा सहावा टप्पा, सकाळी ११ पर्यंत किती टक्के मतदान झालं?

मतदानाचा सहावा टप्पा देशात पार पडतो आहे. सकाळी ११ पर्यंत कुठे किती टक्के मतदान झालं जाणून घ्या.

बिहार – २३.६७ टक्के

हरियाणा-२२.०९ टक्के

जम्मू-काश्मीर- २३ टक्के

झारखंड – २७.८० टक्के

एनसिटी आणि दिल्ली- २१.६९ टक्के

उत्तर प्रदेश – २७ टक्के

पश्चिम बंगाल – ३६.८८ टक्के

09:54 (IST) 25 May 2024
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी बजावला मतदानाचा हक्क

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काही वेळापूर्वीच मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यानंतर त्यांनी कॅमेरासमोर येत मतदान केल्याची खूण म्हणजेच शाई लावलेलंं बोट दाखवलं. तसंच आपण मतदानाचा हक्क बजावला त्याप्रमाणे नागरिकांनीही बजावला पाहिजे असंही त्यांनी म्हटलं आहे.

08:51 (IST) 25 May 2024
पुरीमध्ये ईव्हीएम मशीन बंद, संबित पात्रा काय म्हणाले?

पुरी या ठिकाणी ईव्हीएम काम करत नसल्याने मतदानात खंड पडला आहे. संबित पात्रा यांनी या प्रकरणी दखल घेतली आहे. त्यांनी हे म्हटलं आहे मी या मध्ये लक्ष घालतो, ईव्हीएम का बंद पडलं याची माहिती घेतो तसंच लवकरात लवकर ते सुरु कसं होईल हे देखील पाहतो.

08:44 (IST) 25 May 2024
छत्तीसगडमध्ये भाजपाला निवडणूक आयोगानं दिली तंबी; ‘त्या’ तीन पोस्ट काढण्याचे आदेश!

देशभरात सहाव्या टप्प्यासाठी मतदान होत असताना दुसरीकडे निवडणूक आयोगाने छत्तीसगड भाजपाला सोशल मीडियावरील पोस्ट हटवण्याचे निर्देश दिले आहेत.

https://www.loksatta.com/elections/sixth-phase-voting-in-india-election-commission-action-on-bjp-for-controversial-posts-on-social-media-pmw-88-4390999/

08:37 (IST) 25 May 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मतदारांना महत्त्वाचं आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहाव्या टप्प्याच्या निमित्ताने मतदारांना आवाहन केलं आहे. मतदारांनी भरघोस मतदान केलं पाहिजे असं मोदींनी म्हटलं आहे. प्रत्येक मताची किंमत असते, मोठ्या संख्येने बाहेर पडा आणि मतदान करा. लोकशाही पुढे नेण्यासाठी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे असं मोदींनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर म्हटलं आहे.

08:31 (IST) 25 May 2024
मतदारांनी भरघोस मतदान करावं, एस. जयशंकर यांचं आवाहन

देशासाठी निर्णायक वेळ आहे, त्यामुळे सगळ्यांनी घराबाहेर पडून भरघोस मतदान करा असं आवाहन परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी केलं आहे. काही वेळापूर्वीच त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे आवाहन केलं आहे.

लोकसभा निवडणुकीचा सहावा टप्पा ( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी आज, शनिवारी सहा राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधील ५८ मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. दिल्लीतील सर्व सात आणि हरियाणातील सर्व दहा जागांवर मतदान होणार असून सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आली आहे. सकाळी सात वाजता मतदान सुरु झालं आहे.