Exit Poll 2024 Date and Time: लोकसभा निवडणूक १९ एप्रिल पासून सुरु झाली होती. आज (१ जून) लोकसभा निवडणुकीचा सातवा आणि अखेरचा टप्पा संपतो आहे. २०२४ च्या निवडणुकीत भाजपाने ४०० पारचा नारा दिला आहे. एनडीएसह आम्ही ४०० पेक्षा जास्त जागा जिंकणार आहोत असं भाजपाने म्हटलं आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने इंडिया आघाडीसह विजयाचा दावा केला आहे. आम्हाला निर्णयाक बहुमत मिळेल असं म्हटलं आहे. हे चित्र ४ जून रोजी स्पष्ट होणार आहे. मात्र एक्झिट पोल्स हे निकालाचा अंदाज वर्तवत असतात. त्यामुळे ते महत्त्वाचे मानले जातात. आज संध्याकाळी ६.३० पासून हे एक्झिट पोल्स सुरु होतील.

४ जूनच्या दिवशी लागणार लोकसभेचा निकाल

लोकसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेसने प्रमुख विरोधी पक्षांसह इंडिया आघाडी स्थापली आहे. इंडिया आघाडी विरुद्ध एनडीए असा सामना लोकसभेला झाला आहे. या सामन्याचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे. कारण ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. या मतमोजणीत भाजपाला सत्ता राखण्यात यश मिळणार का? की काँग्रेस बाजी मारणार या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. अशातच आणखी एक चर्चा लोकांमध्ये होते आहे आणि ती आहे एक्झिट पोलची. निकालपूर्व अंदाज अर्थात एक्झिट पोल कधी वर्तवले जातील हे आम्ही तुम्हाला या बातमीच्या माध्यमातून सांगत आहोत.

AJit pawar on Seat Sharing in Mahayuti
Vidhansabha Election : महायुतीत जागावाटप कसं होणार? अजित पवारांनी केलं स्पष्ट; मेरिटचा उल्लेख करत म्हणाले…
china biggest dam in the world
चीनमधील ‘या’ अवाढव्य धरणामुळे पृथ्वीचा वेग मंदावला? धरणाचा…
Three Zodiac Signs May Face Challenges in october month
ऑक्टोबर महिन्यात ‘या’ तीन राशीच्या लोकांनी घ्यावी काळजी, धन संपत्ती अन् प्रगतीवर होऊ शकतो परिणाम
Delhi Chief Minister Atishi leaves her predecessor Arvind Kejriwals chair empty
दिल्ली विधानसभा निवडणुकीआधी ‘आप’कडून रामायणाचा प्रचारात वापर; आतिशी यांनी खुर्ची मोकळी सोडून काय साधले?
Working 12-hour days can significantly affect the body and mind, leading to long-term health concerns
द ब्लफ’च्या शूटिंगदरम्यान आठवड्यातील सहा दिवस १२ तास काम करीत होती प्रियांका चौप्रा! शरीरावर काय होतो परिणाम; तज्ज्ञ काय सांगतात….
18th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१८ सप्टेंबर पंचांग: पंचांगानुसार आज कोणाच्या कुंडलीत होणार उलथापालथ? आरोग्य तर धन-संपत्तीकडे द्यावं लागणार लक्ष; वाचा तुमचे राशीभविष्य
short story on potholes on road in monsoon season
विक्रमवेताळ आणि खड्डे पुराण
contract teachers, agitation ,
कंत्राटी शिक्षक नियुक्तीच्या निर्णयावर टीकेची झोड, निर्णय रद्द न केल्यास आंदोलनाचा इशारा

लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल कधी होणार?

लोकसभा निवडणुकीचा सातवा टप्पा शनिवारी संध्याकाळी ६ वाजता संपणार आहे. त्यानंतर अर्ध्या तासाने म्हणजेच ६.३० वाजल्यापासून विविध वाहिन्यांवर एक्झिट पोल सुरु होतील. एक्झिट पोल हा निकालाचा अंदाज असतो. १ जूनच्या संध्याकाळी ६.३० पासून एक्झिट पोल सुरु होतील.

हे पण वाचा- विश्लेषण: पंतप्रधान मोदी म्हणाले त्याप्रमाणे ‘गांधी’ चित्रपटापूर्वी महात्मा गांधी जगासाठी खरंच अज्ञात होते का?

एक्झिट पोल सुरु करण्याची वेळ संध्याकाळी ६.३० चीच का?

एक्झिट पोल मतदान संपल्यानंतर ३० मिनिटांनी सुरु होईल याचं कारण निवडणूक आयोग मतदान सुरु असताना एक्झिट पोलची संमती देत नाही.

२०१९ चे एक्झिट पोल काय होते?

इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल काय होता?

भाजपा+ ३३९ ते ३६५ जागांचा अंदाज
काँग्रेस + ७७ ते १०८ जागांचा अंदाज
सपा-बसपा – १० ते १६ जागांचा अंदाज
इतर – ५९ ते ७० जागांचा अंदाज

इंडिया टुडे-ई चुनावचा एक्झिट पोल काय होता?

भाजपा+ ३०६ जागांचा अंदाज
काँग्रेस + ११२ जागांचा अंदाज
सपा आणि बसपा – १३ जागांचा अंदाज
इतर – ९२ जागांचा अंदाज

हे पण वाचा- जयराम रमेश यांचा दावा, “४ जूनला आम्हाला स्पष्ट बहुमत मिळणार आणि पंतप्रधानपदी..”

टाइम्स नाऊ व्हिएमआर यांचा एक्झिट पोल काय होता?

भाजपा+ ३०६ जागांचा अंदाज
काँग्रेस + १३२ जागांचा अंदाज
सपा बसपा- २० जागांचा अंदाज
इतर – ८४ जागांचा अंदाज

सी व्होटर्सच्या एक्झिट पोलने काय म्हटलं होतं?

भाजपा+ २८७ जागांचा अंदाज
काँग्रेस+ १२८ जागांचा अंदाज
सपा बसपा- ४० जागांचा अंदाज
इतर – ८७ जागांचा अंदाज

एबीपी नेल्सनचा एक्झिट पोल काय होता?

भाजपा+ २७७ जागांचा अंदाज
काँग्रेस+ १३० जागांचा अंदाज
सपा बसपा- ४५ जागांचा अंदाज
इतर – ९० जागांचा अंदाज

२०१९ चा निवडणूक निकाल काय होता?

२०१९ च्या निवडणूक निकालांमध्ये भाजपाने ३०३ तर एनडीएसह एकूण ३५३ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेस आणि त्यांच्या बरोबर आघाडी केलेल्या पक्षांना ९१ जागा मिळाल्या होत्या. तर इतर पक्षांना एकूण ९८ जागा मिळाल्या होत्या. आता यावेळी नेमकं काय होतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तसंच एक्झिट पोल्सकडेही लक्ष असणार आहे.