Exit Poll 2024 Result Updates: लोकसभा निवडणुकीचे सातही टप्पे संपले आहेत. सातव्या टप्प्यात ५७ जागांसाठी आज मतदान पार पडलं. अशातच आज एक्झिट पोलचे अंदाज संध्याकाळी ६.३० पासून वर्तवण्यास सुरुवात झाली. या सगळ्या एक्झिट पोल्सच्या अंदाजानुसार भारतात पुन्हा एकदा कमळ फुलणार आणि मोदी पंतप्रधानपदी बसणार हे निश्चित मानलं जातं आहे. काँग्रेससह इंडिया आघाडीच्या जागा वाढतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र भारतात एनडीएसह भाजपाला ३५० किंवा त्याहून अधिक जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अशात हैदराबादच्या एका अंदाजानेही लक्ष वेधलं आहे. हैदराबादमध्ये असदुद्दीन ओवैसींचा पराभव होईल आणि माधवी लता जिंकून येतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हे पण वाचा- Maharashtra Exit Poll 2024 : बारामतीकरांचा कौल लेकीला की सुनेला? अजित पवारांची राजकीय प्रतिष्ठा पणाला

Dabbawala, Dabbawala backs Uddhav Thackeray,
मुंबईचे डबेवाले शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) पाठीशी
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Ramesh Chennithala Nana Patole
Congress : बंडखोरांविरोधात काँग्रेस अ‍ॅक्शन मोडवर, मतदानाच्या १० दिवस आधी १६ जण निलंबित
jayant patil criticize ajit pawar about koyta gang in hadapsar
पुण्यातील कोयता गँगचा बंदोबस्त करा आणि मग आमच्या पोलीस स्टेशनवर बोला : जयंत पाटील
maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
Political Parties in Maharashtra Vidhan Sabha Election 2024
रविवार प्रचारवार; घरोघरी भेटी, गृहनिर्माण संकुलांना भेटी, चौक सभा यांना जोर
maharashtra assembly election 2024 uddhav thackeray hoarding
‘प्रकल्प रोखणारे सरकार’ला ठाकरे गटाचे फलकबाजीतून उत्तर
maha vikas aghadi releases manifesto for maharashtra assembly poll 2024
महिला, शेतकऱ्यांवर आश्वासनांची खैरात; मविआचा ‘महाराष्ट्रनामा’ जाहीर

लोकसभेच्या निकालाकडे सगळ्या देशाचं लक्ष

लोकसभा निवडणुकीचा सातवा आणि अखेरचा टप्पा पार पडला आणि एक्झिट पोलचे अंदाजही व्यक्त झाले आहेत. आता प्रतीक्षा आहे ती निकालाच्या दिवसाची. या दिवशी नेमक्या भाजपासह एनडीएला किती जागा मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तसंच काँग्रेसने विजयाचा दावा केला आहे. २९५ किंवा त्याहून अधिक जागा आम्हाला मिळतील एक्झिट पोलचा अंदाज काहीही असू द्या आम्हाला जनतेचा पोल ठाऊक आहे असा विश्वास काँग्रेसने व्यक्त केला आहे. त्यामुळे आता नेमकं काय चित्र असणार आहे? देशाने कुणाला कौल दिला आहे हे ४ जून रोजी म्हणजेच पुढच्या तीन दिवसांत स्पष्ट होणार आहे.

हे पण वाचा- Exit Poll Results 2024: नरेंद्र मोदी करणार पंडीत नेहरुंच्या ‘त्या’ विक्रमाशी बरोबरी, एक्झिट पोल्सचे ‘हे’ संकेत!

चाणक्यने हैदराबादच्या जागेबद्दल काय अंदाज वर्तवला आहे?

हैदराबाद येथे माधवी लता यांना भाजपाने तिकिट दिलं आहे. एआयएमआयएमचे असदुद्दीन ओवैसी यांच्या विरोधात त्या उभ्या आहेत. त्या या निवडणुकीत निवडून येतील असा अंदाज चाणक्यने वर्तवला आहे. इतकंच नाही तर चाणक्यने एनडीएसह भाजपाच्या ४१५ जागा येतील असाही अंदाज वर्तवला आहे. आता या जागेचं काय होतं हे पाहणंही औत्सुक्याचं असणार आहे. हैदराबादची जागा चार दशकांपासून ओवैसी कुटुंबाकडे आहे. जर ही जागा माधवी लतांनी जिंकली तर ओवैसींच्या या गडाला सुरुंग लागणार आहे.

हैदराबादच्या जागेच्या इतिहास

हैदराबाद हा लोकसभा मतदारसंघ चार दशकांपासून ओवैसी कुटुंबाकडे आहे. असदुद्दीन ओवैसींचे वडील सुल्तान सलाहुद्दीन ओवैसी १९८४ ते २००४ या कालावधीत याच मतदारसंघातून खासदार होते. तर सध्याच्या घडीला एआयएमआयएमचे प्रमुख चौथ्यांदा या जागेवरुन निवडून गेले आहेत. यावेळी त्यांच्या विरोधात भाजपाने माधवी लता यांना उमेदवारी दिल्याने त्या चर्चेत आल्या.

माधवी लता कोण आहेत?

माधवी लता या हैदराबादच्याच रहिवासी आहेत. त्यांचे वडील मिलट्री इंजिनिअरींग सर्व्हिसमध्ये होते. एक उत्तम वक्त्या अशी त्यांची ओळख आहे. माधवी लता यांनी हैदराबादच्या निजाम कॉलेजातून पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं आहे. त्यांनी एम. ए. ची डिग्री या महाविद्यालयातून घेतली आहे. माधवी लता या भरतनाट्यम नृत्यही करतात. तसंच त्यांना चित्रकलेचीही आवड आहे. समाजसेवा करणं हीदेखील त्यांची आवड आहे. अनेक व्हिडीओंतून त्या भजन गातानाही दिसतात. एकही मूल रडत शाळेत जाऊ नये यासाठी त्या कार्यरत आहेत. आता माधवी लता जिंकून येतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. असं घडलं तर ओवैसींविरोधात माधवी लतांना उभं करण्याची भाजपाची खेळी यशस्वी ठरेल यात शंका नाही. मात्र नेमकं काय घडतं हे ४ जून रोजीच स्पष्ट होणार आहे.