महाराष्ट्रातील ४८ जागांसाठी सर्वच एक्झिट पोल्सनी संमिश्र असा अंदाज व्यक्त केला होता. त्याप्रमाणे आज निकालाच्या दिवशी चित्र दिसत आहे. सकाळच्या सत्रात महाराष्ट्रातील ४८ पैकी महायुती २१ तर महाविकास आघाडी २५ जागांवर पुढे असल्याचे दिसत आहे. मविआचे नाशिकचे उमेदवार राजाभाऊ वाजे, हातकंणगलेमध्ये सत्यजित आबा, शिरूरमध्ये डॉ. अमोल कोल्हे सांगलीमध्ये अपक्ष उमेदवार विशाल पाटील, साताऱ्यात शशिकांत शिंदे आघाडीवर असल्याचे दिसत आहेत. हे कल सकाळच्या सत्रातील असले तरी दुपारपर्यंत यावर आणखी स्पष्टता येऊ शकते. मात्र भाजपाने ४५ जागा जिंकण्याचा दावा केला होता, त्या दाव्याला कुठेतरी छेद जात असल्याचे दिसत आहे.

मतमोजणीच्या आतापर्यंत चार फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. मुंबईत उबाठाचे अरविंद सावंत, अनिल देसाई पुढे आहेत. तर उत्तर पश्चिम लोकसभेत शिंदे गटाचे रवींद्र वायकर पुढे आहेत.

Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
delhi assembly elections 2025
लालकिल्ला : दिल्ली भाजपसाठी आणखी प्रतिष्ठेची!
Prithviraj Chavan On Budget 2025
Prithviraj Chavan : “अर्थसंकल्पाने आमची घोर निराशा केली”, पृथ्वीराज चव्हाण यांची अर्थसंकल्पावरून टीका
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये
BJP leader manoj tiwari interview
ते ‘रेवड्या’ वाटतात, आम्ही ‘मोफत’ देतो; भाजपा नेते मनोज तिवारींची ‘आप’वर टीका
jayant patil speeches on treasure looting jayant patil on british treasure looting
घरे भरण्यासाठी खजिन्याची लूट : जयंत पाटील
फडणवीस सरकारची जन्म दाखल्यांवर करडी नजर; बांग्लादेशी घुसखोरांविरोधात मोहीम (फोटो सौजन्य पीटीआय)
‘Vote Jihad 2’: फडणवीस सरकारची बांग्लादेशी घुसखोरांविरोधात मोहीम; आता जन्म दाखल्यांवर करडी नजर

मुंबईत मविआची महायुतीला जोरदार टक्कर, ठाकरे गटाची शिंदे गटावर आघाडी!

उर्वरीत महाराष्ट्रात सांगलीतील विशाल पाटील, दिंडोरी मतदारसंघात मविआचे भास्कर भगरे, चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार पिछाडीवर आहेत. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे आघाडीवर आहेत. चंद्रपूरचा निकाल २०१९ प्रमाणेच धक्कादायक असल्याचे म्हटले जाते. २०१९ सालीही याठिकाणी भाजपाच्या हंसराज अहिर यांचा पराभव झाला होता.

विदर्भात महायुती केवळ तीन जागांवर पुढे आहे. विदर्भ हा भाजपाचा गड मानला जातो. मात्र विदर्भात सकाळच्या सत्रात भाजपाला मोठा झटका मिळाला असल्याचे दिसत आहे.

सोलापूर लोकसभेत दुसऱ्या फेरीअखेर काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आघाडीवर आहेत. त्यांनी भाजपाच्या राम सातपुते यांच्यावर १७ हजार ८९७ मतांची आघाडी घेतली आहे.

Pune Lok Sabha Election 2024 Results Live Updates : भाजपाचे मुरलीधर मोहोळ यांना २१ हजार मतांची आघाडी

कोण किती जागा लढवत आहे?

महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत आहे. महायुतीमध्ये भाजपा २८, शिवसेना शिंदे गट १५, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट ४ आणि रासप १ जागा लढवत आहे. तर मविआमध्ये शिवसेना उबाठा २१, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट १० आणि काँग्रेस १७ जागांवर लढत आहे.

महाराष्ट्रात किती टप्प्यात मतदान झाले?

राज्यातील ४८ मतदारसंघांसाठी एकूण पाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली. १९ मे रोजी पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात रामटेक, नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली चिमूर, चंद्रपूर या पाच मतदारसंघांत मतदान झाले. पहिल्या टप्प्यात ६३.७१ टक्के नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाचा दुसरा टप्पा २६ एप्रिल रोजी पार पडला. या दिवशी , बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ वाशीम, हिंगोली, नांदेड, परभणी या आठ मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली. या दुसऱ्या टप्प्यात ६२.७२ टक्के मतदान झाले. तिसरा टप्पा सात मे रोजी झाला असून रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले अशा ११ लोकसभा मतदारसंघात ६३.५५ टक्के मतदारांनी मतदान केले. १३ मे रोजी झालेल्या चौथ्या टप्प्यात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड या लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडले. या मतदारसंघांमध्ये एकूण ६२.२१ टक्के मतदारांनी मतदान केले. तर २० मे रोजी शेवटच्या टप्प्यात धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण अशा एकूण १३ मतदारसंघांत मतदान झाले. यावेळी ५६.८९ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

Story img Loader