Lok Sabha Election Result 2024 Live Updates : राज्यातील आणि देशातील काही मतदारसंघ हे फार चर्चेत राहिले. बारामती लोकसभा मतदारसंघ, रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघ, सोलापूर लोकसभा मतदारसंघ, अमरावती लोकसभा मतदारसंघ, अहमदनगर लोकसभा मतदारसंघ आदीसह देशात अनेक मतदारसंघामध्ये अनेकांचं लक्ष आहे. एकाच पक्षात पडलेल्या फुटी, विद्यमान आणि माजी खासदारांमध्ये असलेल्या लढती, विद्यमान केंद्रीय मंत्र्यांविरोधात उभे ठाकलेले तगडे उमेदवार यामुळे काही मतदारसंघ बिग फाईट्स ठरले आहेत. या मतदारसंघात काय घडतंय? कोणाच्या बाजूने निकाल लागतोय? निकालावर इतरांच्या प्रतिक्रिया काय? आदी सर्व जाणून घेऊयात.
अटीतटीच्या नेमक्या लढती कोणत्या? कोणत्या मतदारसंघावर सर्वांचं सर्वाधिक लक्ष?
- नाशिक लोकसभा मतदारसंघ – हेमंड गोडसे वि. राजाभाऊ वाजे
- बारामती लोकसभा मतदारसंघ – सुप्रिया सुळे वि. सुनेत्रा पवार
- ठाणे लोकसभा मतदारसंघ – राजन विचारे वि. नरेश म्हस्के
- मुंबई उत्तर मध्य मतदारसंघ – उज्ज्व निकम वि. वर्षा गायकवाडअहम
- अहमदनगर लोकसभा मतदारसंघ – सुजय विखे पाटील वि. निलेश लंके
- कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ – छत्रपती शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक
- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ –रत्नागिरी – नारायण राणे विरूद्ध विनायक राऊत
- सोलापूर लोकसभा मतदारसंघ – प्रणिती शिंदे विरुद्ध राम सातपुते
- अमरावती लोकसभा मतदारसंघ – नवनीत राणा विरुद्ध बळवंत वानखडे
- वाराणसी लोकसभा मतदारसंघ – नरेंद्र मोदी वि. अथेर लारी
- रायबरेली लोकसभा मतदारसंघ- राहुल गांधी वि. दिनेश प्रताप सिंग
- हैदराबाद लोकसभा मतदारसंघ – असदुद्दीन ओवैसी वि. माधवी लथा
- अमेठी लोकसभा मतदारसंघ – स्मृती इराणी वि. के. एल. शर्मा
- गांधी नगर लोकसभा मतदारसंघ – अमित शाह वि. सोनल पटेल
- मंडी लोकसभा मतदारसंघ – कंगना रणौत वि. विक्रमादित्य सिंग
Maharashtra India General Election Result 2024 Live Updates : सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या मतदारसंघामध्ये कोणाच्या बाजूने लागणार निकाल? जाणून घ्या सविस्तर
देशातील जनतेने तिसऱ्यांदा एनडीएवर विश्वास ठेवला आहे. हा भारताच्या इतिहासातील ऐतिहासिक विजय आहे. जनतेने दाखवलेल्या विश्वासाप्रती मी त्यांचे आभार मानतो. आणि त्यांना खात्री देतो की यापुढेही चांगलं काम सुरूच राहील. तसंच, मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांच्या कठोर मेहनतीप्रतीही त्यांचं अभिवादन करतो. अपवादात्मक कामांसाठी शब्द अपुरे पडतात.
१८ व्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी वायनाड आणि रायबरेली या दोन्ही मतदारसंघातून विजय मिळवला आहे. या अभूतपूर्व यशानंतर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. भाजपाने ४०० पारचा नारा दिला होता. परंतु, भाजपाने ३०० ची संख्याही गाठलेली नाही. त्यामुळे इंडिया आघाडी सत्ता स्थापन करू शकते, अशी चर्चा आहे. या चर्चेवर राहुल गांधी यांनी उत्तर दिलं. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
निवडणूक काळात आम्हाला किती समस्यांना झेलावं लागलं हे तुम्हाला माहितच आहे. आमची बँक खाती गोठवली गेली. पण तरीही आम्ही आमचा सकारात्मक प्रचार सुरूच ठेवला. महागाई, बेरोजगारी आदी राष्ट्रीय मुद्द्यांवरून आम्ही निवडणूक लढवली, पण मोदींकडून खोट्या मुद्द्यांचा प्रचार केला गेला - मल्लिकार्जुन खरगे</p>
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ६ लाख १२ हजार ९७० मते मिळाली आहेत. तर, काँग्रेसचे अजय राय यांचा १ लाख २५ हजारांनी पराभव झाला आहे. त्यांना ४ लाख ६ हजार ४५७ मते मिळाली. पहिल्या सत्रात अजय राय आघाडीवर होते. परंतु, दुपारच्या सत्रानंतर नरेंद्र मोदींनी आघाडी घेतली.
आजचा दिवस विशेष आहे. कारण ही माझी पहिलीच निवडणूक होती. पहिलीच निवडणूक अनेक समस्यांनी भरलेली असते. त्यामुळे ही माझी पहिलंच यश आहे - कंगना रणौत
अमेठीतून काँग्रेसचे किशोरी लाल यांना ३ लाख ४३ हजार १३१ मते मिळाली असून स्मृती इराणींना २ लाख ४६ हजार १८२ मते मिळाली आहेत.
वाराणसीतून नरेंद्र मोदी यांना ५ लाख ४० हजार ७३८ मते मिळाली असून काँग्रसेचे अजय राय यांना ४ लाख १५ हजार ९९ मते मिळाली आहेत.
लोकसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर आता सर्वांच्या नजरा निकालाकडे लागल्या आहेत. सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे आणि काही तासांत ट्रेंड दिसायला सुरुवात झाली आहे. या लोकसभा निवडणुकीत अनेक बॉलीवूड स्टार्सही आपले नशीब आजमावत आहेत.
अटतटीच्या ठरलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे आघाडीवर आहेत. त्यांना आतापर्यंत ९६ हजार २२२ मते मिळाली आहेत. तर, अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना ८३ हजार १९० मते मिळाली आहेत. या दोन्ही उमेदवारांमध्ये १३ हजार मतांचा फरक आहे. त्यामुळे बारामतीच गड सुप्रिया सुळे राखतात की त्यांच्या वहिनी सुनेत्रा पवार राखतात हे पाहावं लागणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार की इंडिया आघाडीला यश मिळणार, नक्की कोणाचे सरकार स्थापन होणार, हे चित्र स्पष्ट होणार आहे. लोकसभा निवडणूक निकालात देशातील या प्रमुख लढतींकडे लोकांचे लक्ष लागले आहे. देशातील प्रतिष्ठेच्या लढतींवर एक नजर टाकू या.
अमेठीतून स्मृती इराणी यांना १ लाख १९ हजार ६९ मते मिळाली असून त्या काँग्रेसच्या किशोरी लाल यांच्यापासून ५० हजार मतांनी मागे आहेत. किशोरी लाल यांना १ लाख ६९ हजार ८२७ मते मिळाली आहेत.
तर, दुसरीकडे राहुल गांधी हे रायबरेलीतून आघाडीवर आहेत. राहुल गांधी यांना २ लाख ९५ हजार ३९५ मते मिळाली असून त्यांच्याविरोधात असलेल्या भाजपाच्या दिनेश सिंग यांना १ लाख १३ हजार ११४६ मते मिळाली आहेत. म्हणजेच, ते सध्या १ लाख ६४ हजारांनी मागे आहेत.
ब्रिजभूषण शरण सिंग यांचे सुपूत्र करण भूषण सिंग हे केसरगंज या मतदारसंघातून उभे आहेत. त्यांनी या मतदारसंघातून आघाडी घेतली आहे. १ लाख ६७ हजार ८३० मते त्यांना मिळाले असून त्यांच्या पाठोपाठ भगत पाल आहेत.
रायबरेलीच्या विद्यमान खासदार आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी सध्याच्या निकालानुसार पिछाडीवर आहेत. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटनुसार, स्मृती इराणी तब्बल ३७ हजारांनी मागे आहेत. तर, काँग्रेसचे उमेदवार किशोरी लाल आघाडीवर आहेत.
मध्य प्रदेशमध्ये २९ जागा असून या सर्व जागांवर भाजपा आघाडीवर आहे. त्यामुळे येथे पूर्ण बहुमत भाजपाला मिळण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत.
रायबरेली लोकसभा मतदारसंघातून राहुल गांधी १ लाख ४२ हजार ६३० मतांनी आघाडीवर आहेत. तर, भाजपचे दिनेश प्रताप सिंग ६८ हजार ९९३ मते मिळाली आहेत.
वाराणसीत नरेंद्र मोदींनी १ लाख ३४ हजार १२८ मतांनी आघाडी घेतली आहे. तर, काँग्रेसचे अजय राय ४० हजार मतांनी आणि बहुजन समाज पक्षाचे अथेर लारी जवळपास १ लाख २० मतांनी मागे आहेत.
कंगना रणौतने मंडी लोकसभा मतदारसंघातून २ लाख २५ हजार ६५४ मतांनी आघाडी घेतली आहे. गांधीनगर मतदारसंघातून अमित शाहांनी २ लाख ७६ हजार ५३४ मतांनी आघाडी घेतली आहे. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाराणसीमधून टफ फाईट सुरू आहे. त्यांनी तिथे १ लाख १९ हजार ४८५ मतांनी आघाडी घेतलीय.
निकाल चांगला असेल. मी अजून निकाल पाहिलेला नाही. पण सर्व चांगलं होईल. मी जी इच्छा मागितली आहे ती पूर्ण होईल. आज जे निकाल येतील तो जनादेश असेल - विक्रमादित्य सिंग, मंडी लोकसभा मतदारसंघ
गांधीनगरमधून अमित शाह, रायबरेलीतून राहुल गांधी आघाडीवर आहेत. परंतु, नरेंद्र मोदी प्राथमिक कलांनुसार पिछाडीवर आहेत. त्यांच्या वाराणसी या मतदारसंघातून काँग्रेसने आघाडी घेतली आहे. तसंच, अमेठी लोकसभा मतदारसंघातून स्मृती इराणी मागे आहेत.
अभिनेत्री कंगना रणौत ही मंडी लोकसभा मतदारसंघातून पिछाडीवर आहे. तर, वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आघाडी घेतली आहे.
लोकसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. भाजपाने एनडीएसह ४०० पारचा नारा दिला आहे. तर दुसरीकडे एकाही एक्झिट पोलच्या चर्चेत सहभागी न होणाऱ्या काँग्रेसने २९५ + जागा मिळतील असा दावा केला आहे. इंडिया आघाडीसह इतक्या जागा जिंकण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. एक्झिट पोल्सच्या विरोधात निकाल लागतील असं काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधींनी म्हटलं आहे. आता नेमकं काय होणार याकडे देशाचं लक्ष लागलं आहे.
लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे. आता हा निकाल समोर यायला अवघे काही तास बाकी आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. या निकालाच्या आधी एक्झिट पोल्सचे आकडे समोर आले. यामध्ये एनडीएला बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र, महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर इंडिया आघाडीला १५० च्या आसपास जागा मिळतील, असा अंदाज एक्झिट पोल्सने वर्तवलेला आहे. तर इंडिया आघाडीने २९५ जागा येण्याचा विश्वास व्यक्त केलेला आहे.
Maharashtra India General Election Result 2024 Live Updates : सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या मतदारसंघामध्ये कोणाच्या बाजूने लागणार निकाल? जाणून घ्या सविस्तर