Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates : अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर ४ जून रोजी निकाल लागला. यंदाचा निकाल अनपेक्षित आणि सर्वच राजकीय विश्लेषक आणि एक्झिट पोल्सना धक्का देणारा ठरला. भाजपा स्वबळावर सत्ता स्थापन करेल, असा अंदाज वर्तविण्यात येत असतानाच प्रत्यक्षात मात्र भाजपाला २४० जागांवर समाधान मानावे लागले आहे. याचा अर्थ बहुमताचा २७२ हा आकडा गाठण्यासाठी आता त्यांना इतर सहयोगी पक्षांची मदत घ्यावी लागणार आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने देशभरात चांगली कामगिरी करत ४४ खासदारांच्या संख्येवरून थेट ९९ वर मजल मारली आहे. तसेच इंडिया आघाडीतील इतर घटक पक्षांचीही कामगिरी उत्तम राहिली. ज्या उत्तर प्रदेशवर भाजपाची सर्वाधिक भिस्त होती, तिथे समाजवादी पक्षाने ३७ जागा मिळवून तिसरा सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला आहे. तर ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने २९ जागा मिळवत चौथ्या क्रमाकांचा मोठा पक्ष होण्याचा मान मिळविला आहे. आता बहुमताचा आकडा गाठण्यात कुणाला यश येते? हे पाहावे लागेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Lok Sabha Election 2024 Result Live | लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतरची प्रत्येक अपडेट मिळवा एका क्लिकवर

16:06 (IST) 5 Jun 2024
Lok Sabha Election 2024 Result Live : ‘फडणवीसांच्या मनधरणीसाठी भाजपा नेत्यांची पळापळ’, सागर बंगल्यावर बैठकांचे सत्र

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि सुकाणू समितीतील नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सरकारमधून बाहेर न पडण्याची विनंती केली आहे. भाजप नेते फडणवीस यांना भेटण्यासाठी सागर बंगल्यावर पोहोचले असून त्यांचे मन वळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

15:59 (IST) 5 Jun 2024
Lok Sabha Election 2024 Result Live : अरविंद केजरीवाल यांचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला

लोकसभा निवडणुकींचा निकाल लागल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात अंतरिम जामीनासाठी अर्ज केला. मात्र त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. सध्या तिहार तुरुंगात असलेल्या केजरीवाल यांनी आरोग्याच्या कारणास्तव सात दिवसांचा जामीन मागितला होता. मात्र तो फेटाळण्यात आला.

15:48 (IST) 5 Jun 2024
Kalyan Lok Sabha Election Result 2024: दरेकरांची वाढलेली मते किणीकरांसाठी डोकेदुखी ? अंबरनाथमध्ये ठाकरे गटाला ५८ हजार मते, वंचितचेही मतदान वाढले

या मतांमुळे अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता व्यक्त होते आहे.

सविस्तर वाचा…

15:29 (IST) 5 Jun 2024
वाशिम : घरात एकट्या असलेल्या ८ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, वज्रदेही महिला विकास संघाचा मोर्चा

वाशिम : वाशिम शहरात माणूसकीला काळीमा फासणारी घटना घडली. कुटुंबातील सदस्य हळदीच्या कार्यक्रमाला गेले असता, जवळच राहणाऱ्या गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती विजय उर्फ भोला बरखम याने ८ वर्षीय चिमुरडीवर जिवाने मारण्याची धमकी देऊन अत्याचार केला.

सविस्तर वाचा…

14:56 (IST) 5 Jun 2024
लोकसभेतल्या पराभवानंतर देवेंद्र फडणवीस राजीनामा देण्याच्या तयारीत

महाराष्ट्रात जो पराभव झाला, त्याची नैतिक जबाबदारी मी घेतो. तसंच मी माझ्या पक्षाला विनंती करणार आहे की मला उपमुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावं. मला जर मुक्त करण्यात आलं तर त्यासंदर्भात मी विनंती करणार आहे.

14:55 (IST) 5 Jun 2024
Lok Sabha Election Result 2024 : ‘मी पराभवाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्यास तयार’, देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

राज्यात भाजपाचा निराशाजनक पराभव झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. मी पराभवाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्यास तयार आहे. वरिष्ठ नेत्यांनी माझा राजीनामा स्वीकारावा आणि मला पूर्णवेळ विधानसभेसाठी झोकून काम करण्याची संधी द्यावी, अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

14:51 (IST) 5 Jun 2024
८ जून ला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शपथविधी?

लोकसभा निवडणुकीचे निकाल मंगळवारी जाहीर झाले आहेत. ४०० पारचं भाजपाचं स्वप्न भंगलं आहे, मात्र बहुमत एनडीएला मिळालं आहे. अशातच नरेंद्र मोदी हे सरकार स्थापन करणार आणि ८ जून रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ८ जून रोजी संध्याकाळी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा शपथ घेतील अशी शक्यता आहे.

इथे वाचा सविस्तर वृत्त

14:33 (IST) 5 Jun 2024
चालकाला डुलकी लागली अन ‘समृद्धी’वर बस उलटली

बुलढाणा: समृद्धी महामार्गावर छत्तीसगड राज्यातील खासगी बस भरवेगात उलटली. सुदैवाने यात प्राणहानी झाली नसून प्रवासी जखमी झाले आहे. आज ५ जूनला डोणगाव (तालुका मेहकर) नजीक ही दुर्घटना घडली.

सविस्तर वाचा….

14:31 (IST) 5 Jun 2024
Lok Sabha Election Result 2024 Solapur: भाजपविरोधी मतविभागणी टळण्यासह मराठा आणि शेतकरी घटकाचा बनला काँग्रेसला आधार

मागील लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यामुळे भाजपविरोधी झालेली मोठी मतविभागणी यंदा टळली.

सविस्तर वाचा…

14:14 (IST) 5 Jun 2024
ॲड. प्रकाश आंबेडकरांचे राजकारण जनतेने ओळखले; काँग्रेस पाडण्यासाठीच… डॉ. अभय पाटील यांची टीका

अकोला : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी राज्यात अनेक मतदारसंघात वेगवेगळी भूमिका घेतली. त्यांचे राजकारण आता जनतेने ओळखले आहे. त्यामुळेच यावेळेस त्यांच्या मतांमध्ये देखील घट झाली, अशी टीका अकोला लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे पराभूत उमेदवार डॉ. अभय पाटील यांनी केली.

सविस्तर वाचा…

14:00 (IST) 5 Jun 2024
गडचिरोली : सहाही विधानसभा क्षेत्रात काँग्रेसला आघाडी, भाजप आमदारांच्या सुमार कामगिरीची सर्वत्र चर्चा

गडचिरोली : दोनवेळा मोदी लाटेत निवडणून आलेले भाजपचे अशोक नेते यांचा काँग्रेसचे डॉ. नामदेव किरसान यांनी तब्बल १ लाख ४१ हजार ६९६ मतांनी दारुण पराभव केला.

सविस्तर वाचा….

13:43 (IST) 5 Jun 2024
विदर्भात भाजपला अतिआत्मविश्वास नडला

पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या अनेक वक्तव्यातून जाणवणारा अहंकाराचा दर्प, त्यातून बळावलेली मतदारांना गृहीत धरण्याची वृत्ती, मराठा आरक्षणामुळे विचलीत झालेला ओबीसी मोठ्या प्रमाणावर दूर जाणे, त्याकडे लक्ष न देता बहुजन नेतृत्त्वाच्या खच्चीकरणासाठी झालेले प्रयत्न यामुळे भाजपला विदर्भात मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले.

सविस्तर वाचा…

13:38 (IST) 5 Jun 2024
प्रवाहाच्या विरोधात जाण्याची परंपरा यंदाही रायगडमध्ये कायम

अलिबाग– लोकसभा निवडणुकीत रायगड मतदारसंघात अटीतटीचा सामना पहायला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र तसे झाले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनील तटकरे यांनी ही लढत सहज जिंकली.

सविस्तर वाचा…

13:34 (IST) 5 Jun 2024
भिवंडीत बाळ्यामामा म्हात्रेंच्या विजयापेक्षा किसन कथोरेंचीच चर्चा अधिक

बदलापूरः मंगळवारी जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात भिवंडी लोकसभा मतदारसंघातून पराभूत झालेल्या केंद्रीय पंचायतीराज राज्यमंत्री कपिल पाटील यांचा पराभव आणि सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांच्या विजयानंतर मतदारसंघात मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांच्याच नावाची अधिक चर्चा रंगली होती.

सविस्तर वाचा…

13:17 (IST) 5 Jun 2024
Lok Sabha Election 2024 Result Live : पंतप्रधान नरेंद्र मोदी ८ किंवा ९ जून रोजी शपथ घेणार?

नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेण्यासाठी तयार झाले आहेत. एनडीएच्या घटक पक्षांचे एकत्र मिळून २९२ खासदार निवडून आल्याचा दावा करण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनडीए लवकरच सत्ता स्थापनेचा दावा करणार असून पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा बहुमान मिळवणार असल्याचे सांगितले जाते.

12:39 (IST) 5 Jun 2024
“तुझी बहीण असल्याचा अभिमान वाटतो”, प्रियांका गांधींची भावूक पोस्ट

“तुझ्याबद्दल ते काहीही म्हणाले, तरी तू ठाम राहिलास. तुझ्या क्षमतेवर त्यांनी शंका घेतली. पण तू कार्यरत राहिलास, त्यांच्या अपप्रचाराच्या विरोधातही तू सत्यासाठी संघर्ष करत राहिलास. प्रेम, माया, करुणा या तत्त्वांवर तू लोकांची मनं जिंकत गेलास. आज तुला वेगळ्या नजरेतून पाहिले जाईल. पण आमच्यासाठी तू सदैव असाच होतास. तुझी बहीण असल्याचा मला अभिमान वाटतो”, अशी भावनिक प्रतिक्रिया प्रियांका गांधी वाड्रा यांनी दिली आहे.

12:20 (IST) 5 Jun 2024
मोर्शीसह वर्धेने युतीची तर आर्वी, हिंगणघाट, धामणगाव, देवळीने राखली आघाडीची लाज

वर्धा : ज्या विधानसभा क्षेत्रात लीड मिळेल तिथेच भाजप आमदारास पुन्हा तिकीट देवू, असा तंबीवजा इशारा भाजप नेत्यांनी लोकसभा निवडणुकीत दिला होता. मात्र होत्याचे नव्हते झाल्याने आता हे सूत्र तर राहणार नाहीच, पण आहे त्यांना पण सांभाळून घ्यावे लागेल, अशी भाजप वर्तुळत चर्चा सूरू झाली आहे.

सविस्तर वाचा…

12:20 (IST) 5 Jun 2024
चंद्रपूर : लोकसभेच्या सहाही विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला प्रचंड मताधिक्य

चंद्रपूर: लोकसभेच्या चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघात २ लाख ६० हजाराच्या विक्रमी मताधिक्याने जिंकणाऱ्या काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांना सहाही विधानसभा मतदारसंघात विक्रमी मताधिक्य मिळाले आहे.

सविस्तर वाचा…

12:19 (IST) 5 Jun 2024
चंद्रपूर : गृहिणी ते आमदार व आता खासदार, प्रतिभा धानोरकर यांचा थक्क करणारा राजकीय प्रवास

चंद्रपूर: साधी गृहिणी ते आमदार व त्यानंतर राज्याच्या हेविवेट कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा २ लाख ६० हजार ४१० इतक्या विक्रमी मताधिक्याने पराभव करून खासदार होण्यापर्यंतचा प्रतिभा धानोरकर यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे. विशेष म्हणजे आमदार व खासदारकीचे यश त्यांनी अवघ्या साडेचार वर्षांत मिळविले आहे.

सविस्तर वाचा…

12:03 (IST) 5 Jun 2024
मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना इशारा

लोकसभा निवडणूक निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणूक निकालांमध्ये इंडिया आघाडीने २३२ जागा जिंकल्या आहेत. तर ४०० पारचा नारा देणाऱ्या भाजपाला एनडीएसह ३०० जागांची संख्याही ओलांडता आलेली नाही. पंकजा मुंडे यांचाही पराभव मतमोजणी दरम्यान ज्या घडामोडी झाल्या त्यानंतर जाहीर झाला. रावसाहेब दानवेंनीही विजयाचा विश्वास व्यक्त केला होता मात्र त्यांचाही पराभव झाला. महाराष्ट्रात भाजपाच्या २०१९ मध्ये २३ जागा होत्या, त्यावरुन ही संख्या २०२४ मध्ये ९ वर आली आहे. या सगळ्यात मराठा आंदोलनाचा फॅक्टर होता अशा चर्चा होत आहेत. या चर्चा होत असतानाच मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांना आता इशारा दिला आहे.

येथे वाचा सविस्तर बातमी

12:02 (IST) 5 Jun 2024
मोदींनी महाराष्ट्रात सभा घेतलेल्या २३ पैकी ‘या’ १८ उमेदवारांचा पराभव, मविआकडून धोबीपछाड

महाराष्ट्रातील महायुतीच्या अपयशाचं खापर पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या डोक्यावर फोडलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महायुतीच्या उमेदवारांसाठी महाराष्ट्रात अनेक दौरे केले होते. मात्र यातून त्यांच्या हाती फारसं काही लागलेलं दिसत नाही. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात महायुतीच्या ज्या २३ उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतल्या होत्या, त्यापैकी बहुसंख्य उमेदवार या निवडणुकीत पराभूत झाले आहेत. या २३ उमेदवारांसाठी मोदी यांनी १८ सभा घेतल्या होत्या, तसेच एक रोड शो केला होता. मात्र या २३ पैकी १८ उमेदवार पराभूत झाले आहेत. तर केवळ ५ उमेदवार विजयी झाले आहेत

सविस्तर वाचा

12:00 (IST) 5 Jun 2024
Maharashtra Lok Sabha Election Result : उबाठाचा मुंबईत भगवा नाही तर ‘हिरवा’ विजय; मनसेच्या नेत्याची टीका

मुंबईत महायुतीचे पानिपत झाल्यानंतर आता मनसेकडून यावर भाष्य करण्यात आले आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी एक्सवर पोस्ट टाकत उबाठा गटाच्या विजयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सविस्तर बातमी इथे वाचा

11:58 (IST) 5 Jun 2024
Lok Sabha Election 2024 Result Live : चोरी, पाकीटमारी करुन रविंद्र वायकरांना जिंकवण्यात आले; संजय राऊत यांचा आरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पराभव स्वीकारला पाहिजे. आता मोदींची गॅरंटी उरली नाही. भाजपाला बहुमत मिळालेले नाही, त्यामुळे मोदी सरकारचा आता शेवट झाला आहे. आम्ही नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांना घेऊन सरकार स्थापन करू, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. तर उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात रवींद्र वायकर यांचा पाकीटमारी करून विजय झाला, असाही आरोप त्यांनी केला आहे.

11:57 (IST) 5 Jun 2024
“…म्हणून अमोल किर्तीकर ४८ मतांनी पराभूत झाले”, जितेंद्र आव्हाडांचा मोठा दावा; मूळ प्रक्रियेवरच उपस्थित केला सवाल!

2024 Maharashtra Lok Sabha Election Result Updates: वायव्य मुंबईत लागलेल्या निकालामध्ये रवींद्र वायकर यांचा अवघ्या ४८ मतांनी विजय झाला असून मतमोजणी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

वाचा सविस्तर

11:56 (IST) 5 Jun 2024
Lok Sabha Election 2024 Result Live : हुकुमशाही संपतेय याचा आनंद जास्त – नाना पटोले

लोकसभेत मिळालेला विजय हा काँग्रेस कार्यकर्त्यांचा विजय आहे. राहुल गांधी यांनी भारत जडो यात्रा केली, न्याय यात्रा केली त्यामुळे देशात परिवर्तन झाले. जनता राहुल गांधी यांच्या पाठीशी उभी राहिल्याचे दिसत आहे. हुकुमशाही संपत आहे, याचाच जास्त आनंद आहे.

वाचा सविस्तर

11:55 (IST) 5 Jun 2024
Video: चिराग पासवान सर्व खासदारांसह नितीश कुमारांच्या भेटीला; बिहारमध्ये घडामोडींना वेग, ‘इंडिया’त सत्तास्थापनेच्या हालचाली?

सकाळीच चिराग पासवान त्यांच्या सर्व खासदारांसंह नितीश कुमारांच्या भेटीला गेल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

11:47 (IST) 5 Jun 2024
Lok Sabha Election 2024 Result Live : नितीश कुमार, तेजस्वी यादव एकाच विमानातून दिल्लीकडे रवाना; एनडीएचं काय होणार?

भाजपाला केवळ २४० जागा मिळाल्यामुळे यावेळी आघाडीचे सरकार स्थापन होण्याची चिन्हे दिसत आहेत. २७२ चा बहुमताचा आकडा गाठण्यासाठी आता इतर पक्षांची मदत घेणे अनिवार्य ठरू शकते. त्यामुळे नितीश कुमार यांचा जेडीयू, चंद्राबाबू नायडू यांचा टीडीपी या पक्षांना आता महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यातच राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांच्याबरोबर एकत्र विमानाने दिल्लीकडे प्रवास केला आहे.

नरेंद्र मोदी, अमित शाहांना किती मताधिक्क्य? 'या' चार उमेदवारांना देशात सर्वाधिक मते