2024 Lok Sabha Election Result Updates: नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधान पदाचा शपथविधी सोहळा दिल्लीत ९ जून रोजी पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्याची तयारी सुरु झाली आहे. राष्ट्रपती भवनात तयारी पूर्ण झाली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधान नरेंद्र मोदींना रविवारी संध्याकाळी ७.१५ मिनिटांनी पंतप्रधानपदाची शपथ देतील. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये शुक्रवारी एनडीएची बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची एनडीएचे संसदीय नेते म्हणून एकमुखाने निवड करण्यात आली. यानंतर आता दिल्लीत ९ जून रोजी नरेंद्र मोदींचा शपथविधी सोहळा रंगणार आहे. जाणून घ्या याच संदर्भातले अपडेट्स एका क्लिकवर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Modi 3.0 Oath Ceremony :९ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शपथविधी सोहळा, दिल्लीत घडामोडींना वेग
काँग्रेसच्या माजी अध्यक्षा, खासदार सोनिया गांधी यांची शनिवारी काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये शनिवारी काँग्रेस संसदीय पक्षाची बैठक पार पडली. यावेळी सोनिया गांधी यांची काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षपदी एकमताने फेरनिवड करण्यात आली.
दिल्लीत काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठीत काँग्रेसच्या नेत्यांनी राहुल गांधी यांच्याकडे लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी देण्याबाबत चर्चा केली. यानंतर यावर राहुल गांधींनी प्रतिक्रिया दिली. विरोधी पक्षनेतेपद स्वीकारण्याबाबत विचार करणार आहे, असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.
“राज्याच्या राजकीय वातावरणात बदल झाल्याचा फटका भारतीय जनता पक्षाला बसला आहे. माझ्या मुलाच्या विधानसभा मतदारसंघात देखील मला कमी मताधिक्य मिळालं. मग मी त्यांना म्हणणार का? काम केलं नाही. एकूणच राज्यात राजकीय वातावरणात बदल झाला आणि आम्हाला फटका बसला”, असं भाजपाचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी म्हटलं.
काँग्रेसच्या संसदीय नेत्या म्हणून सोनिया गांधी यांची निवड करण्यात आली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी ही माहिती माध्यमांशी बोलताना दिली.
लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. एनडीएच्या प्रमुखपदी एकमताने नरेंद्र मोदी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच आज एनडीएच्या संसदीय दलाची संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत सर्व एनडीएच्या नेत्यांनी नरेंद्र मोदी यांची संसदीय दलाचे नेते म्हणून निवड केली. आता नरेंद्र मोदी रविवारी ९ जून रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी काही परदेशी पाहुण्यांनाही आमंत्रण दिलं असल्याची माहिती आहे.
या शपथविधीच्या सोहळ्याला जगातील अनेक नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे हे यांना आमंत्रित करण्यात आल्याचं वृत्त आहे. तसेच नेपाळ आणि मॉरिशसच्या प्रमुखांनाही या शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण दिलं आहे. याबरोबरच या शपथविधी सोहळ्यासाठी मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइझू यांनाही निमंत्रण देण्यात आलं आहे आणि त्यांनी ते स्वीकारलं आहे. मोहम्मद मुइझू यांनी हे या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या निवेदनानुसार, मुइझू यांचं नाव या समारंभासाठी आमंत्रित करण्यात आलेल्या मान्यवरांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे, ज्यामध्ये श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे, नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या नावाचाही समावेश आहे. शेख हसीना आज दुपारी भारतात पोहचल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या रविवारी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. संध्याकाळी ७.१५ वाजता हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यावेळी मोदींसोबत एकूण १८ मंत्रीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत. मोदींच्या मंत्रिमंडळात यावेळी एनडीएच्या सर्वच घटक पक्षांना संधी देण्यात येणार आहे. यात मुख्यमंत्री नीतीश कुमार आणि माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाला सर्वाधिक मंत्रीपदे मिळणार असल्याची शक्यता आहे. महाराष्ट्रालाही महत्त्वाची मंत्रीपदे दिली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील काही नेत्यांची नावेही चर्चेत आहेत. . नितीन गडकरी, पीयूष गोयल, नारायण राणे आणि रक्षा खडसे यांची नावे मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत. खान्देशातून रक्षा खडसे यांना मंत्रिपद दिलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे खडसे मंत्री होतात का? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
प्रभू रामाच्या आशीर्वादाने मोदी चौथ्यांदाही पंतप्रधान होतील. ५४२ जागा आहेत, काही जागा आम्ही हरलो आणि काही जिंकलो. आता तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत आहेत. चौथ्यांदाही ते पंतप्रधान होतील असं विश्वास आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी व्यक्त केला आहे.
#WATCH | Uttar Pradesh: Upon reaching Ayodhya, Assam CM Himanta Biswa Sarma says, "… There are 542 seats, we will win some and lose some. So what is the issue?… Narendra Modi is going to be the Prime Minister for the third time with the blessings of Lord Ram…' pic.twitter.com/ZAK0Brx4Ze
— ANI (@ANI) June 8, 2024
लोकसभा निकालानंतर संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या एनडीएच्या बैठकीतील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत. त्यापैकी नितीन गडकरी मोदीनामाच्या गजरापासून अलिप्त राहिल्याचा व्हिडीओ सर्वाधिक चर्चेत राहिला. सविस्तर बातमी वाचा
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भूपेश बघेल यांनी मध्यावधी निवडणुका लागण्याचा अंदाज वर्तविला आहे. सविस्तर बातमी वाचा
लोकसभा निवडणुकीचे निकाल नुकतेच लागले आहेत. या निवडणुकीत महायुतीला फक्त १७ जागांवर यश मिळालं आहे. अशात ठाकरे गटात पुन्हा एकदा भूकंप होणार का? या चर्चा सुरु झाल्या आहेत. फोडाफोडी होऊनही ठाकरेंच्या शिवसेनेने ९ खासदार निवडून आणले. तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे सात खासदार निवडून आले आहेत. अशात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात ठाकरे गटाच्या दोन खासदारांनी काम करण्याची तयारी दर्शवली असल्याची माहिती समोर आली आहे.
खासदार नरेश म्हस्केंनी हा दावा केला आहे की उद्धव ठाकरेंच्या गटातले दोन खासदार आमच्या संपर्कात आहेत. दोन खासदारांनी आमच्याशी संपर्क केला आहे. मतदारसंघात कामं झाली पाहिजेत ही त्यांची इच्छा आहे. यासाठी या दोन्ही खासदारांनी मोदींना पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे. मुल्ला मौलवींना पैसे देऊन मतं मिळवण्याची उद्धव ठाकरेंची भूमिका आम्हाला पटलेली नाही. असं या खासदारांनी सांगितलं आहे. या खासदारांवर पक्षांतर बंदी कायद्याच्या अंतर्गत कारवाईचा धोका आहे. त्यासाठी या दोन खासदारांनी योजनाही तयार केली आहे. असंही नरेश म्हस्केंनी स्पष्ट केलं.
दिल्लीत आज काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक पार पडत आहे. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी राहुल गांधी यांच्याकडे लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे खासदार राहुल गांधी लोकसभेत विरोधी पक्षांचं नेतृत्व करणार का? याचा निर्णय या बैठकीत होणार आहे.
४०० पारच्या घोषणेने भाजपाचं नुकसान केलं आहे असं रणनितीकार प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
इथे वाचा सविस्तर वृत्त
इंडिया आघाडीच्या बैठकांवर बैठका सुरू आहेत. आज दिल्लीत काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक पार पडत आहे. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी राहुल गांधी यांच्याकडे लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे खासदार राहुल गांधी लोकसभेत विरोधी पक्षांचं नेतृत्व करणार का?, याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.
इथे वाचा सविस्तर बातमी
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. रविवारी ९ जून रोजी नरेंद्र मोदींच्या शपथविधीचा सोहळा पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर दिल्ली आणि आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. याबरोबरच या सोहळ्यादरम्यान शहराला नो फ्लाय झोन घोषित करण्यात आलं आहे. तसेच दिल्लीत मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.
लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत गाठण्यास अपयशी ठरल्यानंतर भाजपाकडून सत्तास्थापनेचा दावा करण्यापूर्वी एनडीएच्या घटक पक्षांची बैठक संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये घेण्यात आली. एनडीएचे निवडून आलेले खासदार, मित्रपक्षांचे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित होते. नरेंद्र मोदी यांना एकमताने संसदीय दलाचा नेता म्हणून निवडण्यात आले. भाजपाच्या वतीने राजनाथ सिंह यांनी हा प्रस्ताव मांडला, त्याला अमित शाह आणि नितीन गडकरी यांनी अनुमोदन दिले. नितीन गडकरी यांनी म्हटले की, नरेंद्र मोदी देशाला महाशक्ती बनविण्यासाठी समर्पित भावनेने काम करत आहेत. गडकरींनी आपल्या भाषणात मोदींचे कौतुक केले असले तरी त्यांची काल दिवसभरापासून वेगळ्याच कारणामुळे चर्चा होत आहे. नरेंद्र मोदी यांना अभिवादन करण्यासाठी आणि त्यांच्या भाषणात टाळ्या न वाजविल्याबद्दल गडकरींचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.
सविस्तर बातमी