Lok Sabha Election Results 2024 Leading & Trailing: लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे. या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. या निकालाच्या आधी एक्झिट पोल्सचे आकडे समोर आले होते. त्यामध्ये भाजपाप्रणित एनडीएला बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात आला. एनडीएला ३५० पेक्षा जास्त जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. तर, इंडिया आघाडीला १५० ते १७० जागा मिळतील, असं एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आलं. मात्र, इंडिया आघाडीने २९५ जागा मिळतील, असा दावा केला आहे. एनडीए की इंडिया आघाडी कोण सत्ता स्थापन करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे. या लोकसभा निवडणुकीसाठी अनेक जागांवर चुरशीची लढत बघायला मिळाली होती. आता देशभरातील निकाल तुम्हाला एक क्लिकवर वाचा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Election Results 2024, NDA Vs INDIA Alliance Vote Counting

09:17 (IST) 4 Jun 2024
Lok Sabha Election Result Live Updates : पंतप्रधान मोदी ६ हजार मतांनी पिछाडीवर

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी ६ हजारांहून अधिक मतांनी पिछाडीवर आहेत. थोड्याच वेळात निकाल स्पष्ट होणार आहे.

09:15 (IST) 4 Jun 2024
Lok Sabha Election Result Live Updates : समाजवादी पक्ष ११० जागांवर आघाडीवर

लोकसभा निवडणुकीचा निकाल थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे. निवडणुकीच्या आकडेवारीनुसार समाजवादी पक्ष ११० जागांवर आघाडीवर आहे.

https://platform.twitter.com/widgets.js
09:09 (IST) 4 Jun 2024
Lok Sabha Election Results 2024 : कंगना रणौत आघाडीवर

हिमाचल प्रदेशच्या लोकसभेचा निकाल थोड्याच वेळात लागणार आहे. हिमाचल प्रदेशमधून कंगना रणौत आघाडीवर आहेत.

09:03 (IST) 4 Jun 2024
Lok Sabha Election Results 2024 : अमित शाह ७३११ मतांनी आघाडीवर

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे गुजरातच्या गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून ७३११ मतांनी आघाडीवर आहेत. लोकसभा निवडणुकीचा निकाल थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे.

https://platform.twitter.com/widgets.js
08:54 (IST) 4 Jun 2024
Lok Sabha Election Results 2024 : एनडीएला २५३ जागांवर आघाडी तर इंडिया आघाडी १६४ जागांवर आघाडीवर

लोकसभा निवडणुकीचा निकाल थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे. सध्या एनडीए २५३ जागांवर आघाडी आहे, तर इंडिया आघाडी १६४ जागांवर आघाडीवर आहे.

08:49 (IST) 4 Jun 2024
Lok Sabha Election Results 2024 : दिल्लीतील भाजपा मुख्यालयात पुरी आणि मिठाई तयार करण्यास सुरुवात

लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी दिल्लीतील भाजपा मुख्यालयात पुरी आणि मिठाई तयार करण्यात येत आहेत. लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सकाळी ८ वाजता सुरू झाली असून सध्या तरी एनडीए आघाडीवर आहे. थोड्याच वेळात निकाल स्पष्ट होणार आहे.

08:41 (IST) 4 Jun 2024
Narendra Modi VS Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आघाडीवर तर राहुल गांधीही आघाडीवर

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसीमधून आघाडीवर आहेत. तसेच काँग्रेस खासदार राहुल गांधी केरळमधील वायनाड आणि उत्तर प्रदेशातील रायबरेली या दोन लोकसभा जागांवर आघाडीवर आहेत.

08:37 (IST) 4 Jun 2024
BJP VS Congress : वायनाड आणि रायबरेलीमधून राहुल गांधी आघाडीवर

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून काँग्रेस खासदार राहुल गांधी केरळमधील वायनाड आणि उत्तर प्रदेशातील रायबरेली या दोन लोकसभा जागांवर आघाडीवर आहेत.

08:32 (IST) 4 Jun 2024
NDA VS BJP : एनडीए १६८ जागांवर आघाडीवर तर इंडिया आघाडी ९३ जागांवर आघाडीवर

लोकसभा निवडणुकीच्या निकालाची मतमोजणी सुरु झाली आहे. एनडीए १६८ जागांवर आघाडीवर आहे. तर इंडिया आघाडी ९३ जागांवर आघाडीवर आहे. तसेच इतर पक्ष १० जागांवर आघाडीवर आहे. ही आकडेवारी सातत्याने बदलत आहे.

08:18 (IST) 4 Jun 2024
NDA VS BJP : देशात एनडीए ४० जागांवर आघाडीवर तर इंडिया आघाडी १६ जागांवर आघाडीवर

लोकसभा निवडणुकीच्या निकालाची मतमोजणी सुरु झाली आहे. इंडिया आघाडी १६ जागांवर आघाडीवर आहे. तर देशात एनडीए ४० जागांवर आघाडीवर आहे. ही आकडेवारी सातत्याने बदलत आहे.

08:10 (IST) 4 Jun 2024
इंडिया आघाडी ११ ठिकाणी पुढे तर भाजपा ४ जागांवर आघाडीवर

लोकसभा निवडणुकीच्या निकालाची मतमोजणी सुरु झाली आहे. इंडिया आघाडी ११ ठिकाणी पुढे असल्याची माहिती समोर आली आहे. तर भाजपा ४ जागांवर आघाडीवर आहे. ही आकडेवारी सातत्याने बदलत आहे.

08:01 (IST) 4 Jun 2024
‘…अन्य़था महाभारताचा संग्राम होईल’; पूर्णियातील अपक्ष उमेदवार पप्पू यादव यांचा इशारा

पोस्टलची मतमोजणी आधी का नाही? मी इंडिया आघाडीच्या नेत्यांना आवाहन करतो, तुमच्या समोर पोस्टलची मतमोजणी झाली पाहिजे. ते जेव्हा जाहीर करतील तेव्हा पोस्टलची मोजणी सोडू नका. आज आमची महत्वाची बैठक आहे. आम्हाला येथील जिल्हाधिकाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना सहकार्य करायचे आहे. मतमोजणी पारदर्शक व्हावी. लोकशाही धोक्यात आणण्याचा प्रयत्न केला तर महाभारताचे युद्ध होईल. लोकशाही वाचवण्यासाठी पूर्णिया आणि बिहारमधील प्रत्येक कामगाराने ‘कफन बंद के आये’साठी तयार व्हावे, असं पूर्णिया येथील अपक्ष उमेदवार पप्पू यादव यांनी म्हटलं आहे.

07:48 (IST) 4 Jun 2024
Live Updates lok Sabha Election Results 2024 : सूरतमधून भाजपाचा उमेदवार बिनविरोध

सुरत लोकसभा मतदारसंघामधून भाजपाचे मुकेश दलाल हे बिनविरोध निवडून आलेले आहेत. या मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार निलेश कुम्भानी यांचा उमेदवारी अर्ज अर्ज बाद झाला होता. त्यामुळे सुरतमधून भाजपाचे उमेदवार मुकेश दलाल हे बिनविरोध निवडून आले आहेत.

07:28 (IST) 4 Jun 2024
इंडिया आघाडीचे नेते परवापर्यंत दिल्ली मुक्कामी

इंडिया आघाडीचे सगळे प्रमुख नेते उद्यापर्यंत म्हणजेच पाच जूनपर्यंत किंवा सहा जूनपर्यंत दिल्ली मुक्कामी असणार आहेत. निवडणूक निकाल लागल्यानंतर इंडिया आघाडीची बैठक पार पडणार आहे. किती जागा मिळतात? पुढची रणनीती काय? या सगळ्या गोष्टी या बैठकीत पार पडणार आहेत.

07:03 (IST) 4 Jun 2024
एक्झिट पोल्सचा अंदाज एनडीए आणि भाजपाच्या बाजूने

लोकसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होतो आहे. तमाम एक्झिट पोल्सनी भाजपाला ३५० ते ३८० जागा मिळतील हा अंदाज वर्तवला आहे. या एक्झिट पोलच्या निकालाप्रमाणेच निकाल लागताना दिसत आहेत. अशात आजच्या निकालाच्या दिवसाच्या दोन दिवस आधी दोन विधासभांचे निवडणूक निकाल आले आहेत. सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश. यापैकी सिक्कीममध्ये भाजपाचा पराभव झाला आहे. ३२ पैकी ३१ जागा मिळवत सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाने विजय मिळवला आहे. याच पक्षाची सत्ता आता सिक्कीमवर पुन्हा आली आहे. तर दुसरीकडे अरुणाचल प्रदेशात भाजपाने ३८ जागा मिळवल्या आणि विजयावर नाव कोरलं आहे. सलग तिसऱ्यांदा अरुणाचल प्रदेशात भाजपाची सत्ता आली आहे.

06:57 (IST) 4 Jun 2024
एक तासात सुरु होणार मतमोजणी

मतमोजणी सुरु होण्यासाठी अवघा एक तास उरला आहे. सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरु होणार आहे. त्यानंतर साधारण दुपारी १ वाजेपर्यंत देशात काय स्थिती असेल याचं चित्र स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.

06:02 (IST) 4 Jun 2024
Lok Sabha Election Result 2024 : काँग्रेसने किती जागांचा दावा केला होता?

लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी एक्झिट पोलचा अंदाज समोर आला. तेव्हा इंडिया आघाडीला १५० जागा दाखवल्या आहेत. मात्र, इंडिया आघाडीतील काही नेत्यांनी इंडिया आघाडीला २९५ जागा निवडून येतील, असा दावा केला होता. त्यामुळे काँग्रेसला किती मिळणार, हे काही तासांत स्पष्ट होणार आहे.

05:07 (IST) 4 Jun 2024
NDA vs INDIA Lok Sabha Election Result 2024 : मतमोजणीला कधी सुरुवात होणार

लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा काउंटडाउन सुरू झाला असून ४ जून रोजी सकाळी ८ वाजता निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात होणार आहे. त्यानंतर काही वेळात पहिला निकाल हाती येण्याची शक्यता आहे.

04:16 (IST) 4 Jun 2024
Maharashtra Lok Sabha Election Result LIVE: लोकसभा निकालाचा काउंटडाउन सुरू

लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा काउंटडाउन सुरू झाला असून आता फक्त काही तासांत पहिला निकाल हाती येणार आहे. त्यामुळे कोणाचा विजय होणार? पहिला निकाला कोणाच्या बाजूने लागणार? काही वेळात स्पष्ट होणार आहे.

03:44 (IST) 4 Jun 2024
Lok Sabha Election Results 2024 LIVE updates: कोणाचा धुव्वा उडणार, एनडीएचा की इंडिया आघाडीचा?

लोकसभा निवडणुकीत भाजपाप्रणित एनडीए आघाडी देशात ३५० पार करेल असा अंदाज एक्झिट पोलची आकडेवारी सांगत आहे. सरकार स्थापन करण्यासाठी २७२ जागांवर यश मिळवणं आवश्यक आहे. त्यामुळे हा आकडा महायुती पार करेल, असा अंदाज एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार समोर आला तर इंडिया आघाडीने आपण सरकार स्थापन करणार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालात कोणाचा धुव्वा उडणार? हे काही तासात स्पष्ट होणार आहे.

03:16 (IST) 4 Jun 2024
NDA vs INDIA Lok Sabha Election Result 2024 : निकालाआधी सोनिया गांधींनी काय प्रतिक्रिया दिली?

काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या अवघे काही तास आधी निकालासंदर्भात प्रतिक्रिया दिली. “आम्ही निकालाची वाट पाहत आहोत. आम्हाला खूप आशा आहे की, निवडणुकीचे निकाल एक्झिट पोल दाखवत असलेल्या विरुद्ध असतील”,असं सोनिया गांधी यांनी म्हटलं.

02:51 (IST) 4 Jun 2024
NDA vs INDIA Lok Sabha Election Result 2024 : देशात कोणता मोठा पक्ष ठरणार?

लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे. या निवडणुकीत कोणत्या पक्षाला जास्त जागा मिळतात हे स्पष्ट होणार आहे. ज्या पक्षाला जास्त जागा मिळणार तो पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी मोठा पक्ष ठरणार की काँग्रेस ठरणार, हे लोकसभेच्या निकालानंतर आता स्पष्ट होणार आहे.

02:17 (IST) 4 Jun 2024
Election Results 2024 Live News : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काय होणार?

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात ४८ जागा आहेत. महाराष्ट्रा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी प्रमुख लढत पाहायला मिळाली. त्यामुळे महाराष्ट्रात उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीत काय होणार? भारतीय जनता पार्टीला किती जागा आणि महाविकास आघाडीला किती जागा मिळणार, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

01:44 (IST) 4 Jun 2024
India general elections 2024 Results Live Updates : निकालाला फक्त काही तास शिल्लक

लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या फक्त काही तासाच समोर येणार आहे. त्यामुळे उमेदवारांची धाकधूक वाढली असून काय होणार? याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे. सर्वच पक्षाचे उमेदवार आपलाच विजय होईल, असा दावा करत आहेत. मात्र, निकालानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे.

01:14 (IST) 4 Jun 2024
NDA vs INDIA Lok Sabha Election Result 2024 : धाकधूक वाढली, निकालाला अवघे काही तास शिल्लक

लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही तासांत समोर येणार आहे. त्यामुळे काही उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. निवडणुकीच्या निकालाआधी सर्वच पक्षाचे उमेदवार आपलाच विजय होईल, अशी आशा व्यक्त तरत आहेत. या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

00:37 (IST) 4 Jun 2024
NDA vs INDIA : काँग्रेस कमबॅक करणार की भाजपा येणार?

लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. काँग्रेस कमबॅक करणार की भाजपा पुन्हा सत्ता स्थापन करणार हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

23:49 (IST) 3 Jun 2024
Election Results 2024 Live Updates: कोलकाता येथे इंडिया आघाडीच्या समर्थकांकडून मिठाईची तयारी

कोलकाता येथे इंडिया आघाडीच्या समर्थकांकडून लाडू तयार केले जात आहेत. इंडिया आघाडीचे पक्ष म्हणजेच काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि इतर पक्ष यांच्या पक्ष चिन्हांच्या आकाराच्या मिठाया तयार केल्या जात आहेत. काही दुकानदार फुलांच्या माळाही मोठ्या प्रमाणावर तयार करत आहेत. दिल्लीतल्या २४ अकबर रोड या ठिकाणी काँग्रेस समर्थक इंडिया आघाडीच्या विजयाची मिठाई वाटत आहेत. त्यासंदर्भातला एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे.

23:08 (IST) 3 Jun 2024
Live Election Result 2024 : निकालाआधी घडामोडींना वेग

लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या अवघे काही तास आधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी भाजपाचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखल झाले आहेत. त्यामुळे निकालाआधी घडामोडींना वेग आला असून देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात काय चर्चा होते? हे पाहणे महत्वाचं असणार आहे.

22:28 (IST) 3 Jun 2024
लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह अपडेट : निकालाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

देशात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीची मंगळवारी मतमोजणी होणार आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर विविध शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा विविध शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.

22:00 (IST) 3 Jun 2024
Live Updates Lok Sabha Election Result 2024 : भाजपाच्या ४०० पारच्या नाऱ्याच काय होणार?

भारतीय जनता पार्टीने लोकसभा निवडणुकीत ४०० पारचा नारा दिला होता. तसेच भाजपाच्या जवळपास सर्वच नेत्यांनी भाजपा या निवडणुकीत ४०० पार जागा जिंकेल, असा विश्वास व्यक्त केला होता. त्यामुळे भाजपाच्या ४०० पारच्या नाऱ्याच काय होणार? हे अवघ्या काही तासात स्पष्ट होणार आहे.

लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही तासात समोर येणार आहे. काही उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. निवडणुकीच्या निकालाआधी सर्वच पक्षाचे उमेदवार आपलाच विजय होईल, अशी आशा व्यक्त तरत आहेत. तसेच एकीकडे भारतीय जनता पार्टी ४०० पारचा दावा करत आहे. तर दुसरीकडे इंडिया आघाडी २९५ जागा येतील असा दावा करत आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तास शिल्लक राहिले असून निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे अपडेट