Lok Sabha Election Result 2024 : देशात नुकतीच १८ व्या लोकसभेसाठी निवडणुक पार पडली आणि आज या निवडणूकीचा निकाल समोर येत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात ही लोकसभा निवडणूक अधिक महत्त्वपूर्ण ठरणार आहे. विशेषत: विदर्भात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये चुरस दिसून आली. मतमोजणीची आकडेवारी लक्षात घेता विदर्भात अनपेक्षित निकाल दिसून आला. विदर्भात महायुतीची एकच जागा पक्की झाली आहे. नागपूर मतदार संघातील नितीन गडकरी विजयी झाले आहे.काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांना पराभव झाला आहे.
नितीन गडकरी कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारतानाचा व्हिडीओ पीटीआयने शेअर केला आहे.
पाहा व्हिडीओ
विदर्भात महायुतीची फक्त एकच जागा आली आहे. नागपूर मतदारसंघातून नितीन गडकरी विजयी झाले आहे. बुलडाणा जिल्ह्यात शिवसेनेचे प्रतापराव जाधव विरुद्ध ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर उभे होते. या लढ्यात नरेंद्र खेडेकर आघाडीवर आहे. अकोला जिल्ह्यात भाजपचे अनुप धोत्रे विरूद्ध काँग्रेसचे अभय पाटील उभे होते. या लढ्यात अभय पाटील आघाडीवर आहे. अमरावतीतून भाजपच्या नवणीत राणा आणि काँग्रेस नेते बळवंत वानखेडे उभे होते. या लढ्यात बळवंत वानखेडे विजयी झाले आहे. वर्धा येथे रामदास तडस विरुद्ध अमर काळे यांच्या लढ्यात अमर काळे आघाडीवर आहे. रामटेक मतदार संघात राजू पारवे हे पिछाडीवर असून श्मामकुमार बर्वे आघाडीवर आहे. भंडारा येथे भाजप नेते सुनील मेंढे विरूद्ध काँग्रेस नेके डॉ. प्रशांत पडोळे यांच्या लढ्यात डॉ. प्रशांत पडोळे आघाडीवर आहे. गडचिरोली-चिमूर येथे नामदेव किरसान आघाडीवर आहे. चंद्रपूर मतदारसंघात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार पराभूत झाले असून काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर विजयी झाल्या आहेत. यवतमाळ वाशिम मतदारसंघात ठाकरे गटाचे संजय देशमुख आघाडीवर आहे तर शिवसेनेच्या राजश्री पाटील पिछाडीवर आहे.
हेही वाचा : Baramati Lok Sabha : सुप्रिया सुळेंचा विजय निश्चित? मतमोजणीच्या १६ व्या फेरीनंतर घेतली निर्णायक आघाडी
राज्यातील ४८ मतदारसंघांसाठी एकूण पाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली. १९ मे रोजी पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात रामटेक, नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली चिमूर, चंद्रपूर या पाच मतदारसंघांत मतदान झाले. पहिल्या टप्प्यात ६३.७१ टक्के नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाचा दुसरा टप्पा २६ एप्रिल रोजी पार पडला. या दिवशी , बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ वाशीम, हिंगोली, नांदेड, परभणी या आठ मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली. या दुसऱ्या टप्प्यात ६२.७२ टक्के मतदान झाले.
तिसरा टप्पा सात मे रोजी झाला असून रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले अशा ११ लोकसभा मतदारसंघात ६३.५५ टक्के मतदारांनी मतदान केले. १३ मे रोजी झालेल्या चौथ्या टप्प्यात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड या लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडले. या मतदारसंघांमध्ये एकूण ६२.२१ टक्के मतदारांनी मतदान केले. तर २० मे रोजी शेवटच्या टप्प्यात धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण अशा एकूण १३ मतदारसंघांत मतदान झाले. यावेळी ५६.८९ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.