Lok Sabha Election Result Updates : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात २०२३ मध्ये शिवसेनेप्रमाणेच फूट पडली. अजित पवार यांनी बहुसंख्य आमदारांना घेऊन आपला वेगळा गट स्थापन केला. राष्ट्रवादीचे तीन विद्यमान खासदार शरद पवार गटाकडे होते, तर एक खासदार अजित पवार गटाबरोबर राहिले. लोकसभा निवडणुकीची चाहूल लागल्यानंतर शरद पवार गटाने महाविकास आघाडीकडून निवडणूक लढताना १० जागा आपल्या पारड्यात पाडून घेतल्या होत्या. या दहा जागांपैकी तब्बल आठ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी घेतलेली आहे. तर अजित पवार गटाने फक्त रायगडमध्ये आघाडी घेतली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दिंडोरीमध्ये धक्कादायक निकाल पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे भास्कर भगरे यांनी भाजपाच्या खासदार भारती पवार यांच्यावर मोठे मताधिक्य मिळवले आहे. तब्बल ३० हजारांची आघाडी त्यांनी घेतल्याचे दाखवत आहे. बारामतीकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांनी आठ हजारांचे मताधिक्य घेतले आहे. सकाळपासून झालेल्या फेऱ्यामध्ये सुप्रिया सुळे आघाडीवर आहेत.

मुंबईत मविआची महायुतीला जोरदार टक्कर, ठाकरे गटाची शिंदे गटावर आघाडी!

राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ उमेदवार आघाडीवर

अठराव्या लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडल्यानंतर अजित पवार हे महायुतीमधून तर शरद पवार हे महाविकास आघाडीतून निवडणूक लढवित आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने १९ जागांवर निवडणूक लढविली होती. यापैकी बारामतीमधून सुप्रिया सुळे, रायगडमधून सुनील तटकरे, शिरूरमधून डॉ. अमोल कोल्हे आणि साताऱ्यात उदयनराजे भोसले यांचा विजय झाला होता. दोन महिन्यांनी उदयनराजे भोसले यांनी राजीनामा दिल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत श्रीनिवास पाटील विजयी झाले होते.

मोदींनी ज्यांना लहान भाऊ म्हटले ते महादेव जानकर १८ हजार मतांनी पिछाडीवर; निकालाचे प्रत्येक अपडेट वाचा एका क्लिकवर…

यंदा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला महाविकास आघाडीमध्ये केवळ १० जागा मिळू शकल्या. दोन गटात फूट पडल्यानंतर शरद पवारांकडे सुप्रिया सुळे, श्रीनिवास पाटील आणि डॉ. अमोल कोल्हे हे तीन विद्यमान खासदार उरले आहेत. तर अजित पवार गटाकडे सुनील तटकरे हे निवडून गेलेले एकमेव खासदार आहेत. महायुतीमधून निवडणूक लढवित असताना अजित पवार यांना मात्र जागावाटपात फार यश मिळाले नाही. रायगड, शिरूर, बारामती आणि धाराशिव हे चार मतदारसंघ त्यांच्या वाट्याला आले. त्यातही शिरूर आणि धाराशीवमध्ये त्यांना शिंदे गट आणि भाजपामधून उमेदवार आयात करावे लागले.

बारामती आणि शिरूर या दोन मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत होत आहे. या दोन जागांचा निकाल दोन्ही गटांसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. अजित पवार यांनी बारामती मतदारसंघात आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे.

२०१९ साली राष्ट्रवादी काँग्रेसने लढविलेल्या जागा –

भंडारा-गोंदिया – नाना पंचबुद्धे,
बुलढाणा – राजेंद्र शिंगणे,
अमरावती – नवनीत राणा पुरस्कृत, परभणी – राजेश विटेकर,
बीड – बजरंग सोनवणे,
धाराशिव – राणाजगजित सिंह,
जळगाव – गुलाबराव देवकर,
रायगड – सुनील तटकरे,
बारामती – सुप्रिया सुळे,
अहमदनगर – संग्राम पाटील,
माढा – संजय शिंदे,
सातारा – उदयनराजे भोसले (पोटनिवडणुकीत श्रीनिवास पाटील), कोल्हापूर – धनंजय महाडिक,
धुळे – कुणाल पाटील,
नाशिक – समीर भुजबळ,
कल्याण – बाबाजी पाटील,
ठाणे – आनंद परांजपे,
ईशान्य मुंबई – संजय दिना पाटील,
मावळ – पार्थ पवार