Lok Sabha Election Result Updates: भाजपाने लोकसभा निवडणुकीत ४०० पारचा नारा दिला होता. मात्र ते स्वप्न निकालाच्या दिवशी पूर्ण होताना दिसत नाहीये. कारण भाजपाला वाटली होती तेवढी ही सोपी निवडणूक नाही. भाजपाला ३०० ची संख्याही गाठणं कठीण जातं आहे. कारण उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये भाजपाला निवडणुकीत मोठा फटका बसला आहे हे समोर आलं आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना महाराष्ट्रात झाला. यामध्ये काँटे की टक्कर झाल्याचं दिसून येतं आहे.

कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांनी मोठं मताधिक्य घेतलं आहे. दुसरीकडे सुरेश म्हात्रे अर्थात बाळ्यामामांनी आघाडी घेतली आहे. सातवेळा पक्ष बदलणाऱ्या बाळ्यामामांना यावेळी शरद पवारांनी लोकसभेची उमेदवारी दिली. शरद पवारांचा तो निर्णय योग्य ठरला आहे हेच दिसतं आहे. सुरेश म्हात्रेंनी ३६ हजार मतांची आघाडी घेतली आहे.

shivsena ubt vinod ghosalkar vs bjp manisha Chaudhary
Dahisar Assembly Election 2024: दहिसरमध्ये अटीतटीचा सामना घोसाळकर विरुद्ध चौधरी
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
marathi muslim seva sangh on vote jihad
‘व्होट जिहाद’ हा भाजपाचा दुष्प्रचार, मराठी मुस्लिम सेवा संघाचा आरोप
Belapur vidhan sabha election
गावी जाणाऱ्या मतदारांना रोखण्याचे मोठे आव्हान; ऐरोली, बेलापूरमध्ये उमेदवारांची कसरत
Supriya Sule On Mahayuti
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: “भाजपमध्ये फिफ्टी-फिफ्टी मतभेद, फडणवीस एक सांगतात तर…”, सुप्रिया सुळेंची खोचक टिप्पणी!
Jharkhand Assembly Election 2024 Phase 1 Voting Updates in Marathi
Jharkhand Assembly Election 2024 : झारखंडमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत ५९ टक्के मतदान
Shahajibapu Patil
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: “बिन कामाचा रे बिन कामाचा, अडीच वर्ष…”, शहाजी बापू पाटील यांनी केली उद्धव ठाकरेंची मिमिक्री

सेक्स स्कँडल प्रकरणात अडकलेले प्रज्वल रेवण्णा पराभूत!

कपिल पाटील यांचं स्वप्न अपूर्ण राहणार?

भाजपाने २०१४ आणि २०१९ अशा दोन्ही वेळेला कपिल पाटील यांना संधी दिली होती. ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. आता भाजपाने त्यांना पुन्हा एकदा तिकीट दिलं. मात्र बाळ्यामामांसाठी शरद पवारांनी केलेला प्रचार आणि लोकांनी केलेलं मतदान यामुळे कपिल पाटील यांची विजयाची हॅट् ट्रीक हुकणार आहे असं दिसून येतं आहे. भिवंडी हा विरोधकांच्या दृष्टीने विचार केल्यास काँग्रेसचा मतदारसंघ आहे. मात्र महाविकास आघाडीत सुरेश उर्फ बाळ्यामामाला राष्ट्रवादीने तिकिट दिलं आहे. त्यामुळे सुरेश म्हात्रे कपिल पाटील यांच्यासमोर आव्हान उभं करु शकतात अशी चर्चा सुरु होतीच ते त्यांनी उभं केलं आहे हे निकालाचा दिवस सांगतो आहे.

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Live Updates : बीडमध्ये पंकजा मुंडे-बजरंग सोनवणे यांच्यात चुरशीची लढत, पंकजा मुंडेंच मताधिक्य घटलं; निकालाचे प्रत्येक अपडेट वाचा एका क्लिकवर…

सुरेश म्हात्रेंचा सातवेळा पक्षबदल

कपिल पाटील यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदींना तर सुरेश म्हात्रेंच्या प्रचारासाठी शरद पवारांना उतरावं लागलं. सुरेश म्हात्रेंच्या पक्षनिष्ठेविषयी आणि स्थैर्याविषयी भिवंडीकरांच्या मनात संभ्रम आहे. कारण मनसे, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अशा जवळपास सगळ्या पक्षांमधून ते फिरुन राष्ट्रवादीत स्थिरावले आहेत. शिवसैनिक म्हणून त्यांनी राजकारणाची सुरुवात केली होती. भिवंडीतल्या यंत्रमाग कामगारांबाबत त्यांनी आवाज उठवण्याचं काम केलं, तसंच शिवसेनेत एक वजन निर्माण केलं. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी बाळ्या मामा अर्थात सुरेश म्हात्रेंनी मनसेत प्रवेश केला. मात्र कपिल पाटील यांनी त्यांना २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत हरवलं. ज्यानंतर त्यांनी पुन्हा मनसेला सोडचिठ्ठी दिली आणि शिवसेनेत प्रवेश केला. सुरेश म्हात्रे यांनी २०१४ ते २०२४ या काळात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदे गट, मनसे आणि शेवटी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस असे सातवेळा पक्ष बदलले आहेत. कपिल पाटील यांचा कट्टर प्रतिस्पर्धी ही त्यांची ओळख आहे