Maharashtra Uttar Pradesh West Bengal Rajasthan Lok Sabha Election Result Updates in India: भारताच्या लोकसभा निवडणुकीचा निकाल आता स्पष्ट झाला आहे. भाजपाने एनडीएसह ४०० पारचा नारा दिला होता. मात्र भाजपाला ३०० जागा गाठणंही कठीण जातं आहे हे निकाल सांगत आहेत. २९७ जागांपर्यंत भाजपा आणि एनडीएने मजल मारली आहे. भाजपासह एनडीएने ४०० पारची जी घोषणा दिली ती मतदारांनी फोल ठरवली आहे. महाराष्ट्रात एनडीएला फटका बसेल असं बोललं जात होतं. मात्र फक्त महाराष्ट्र नाही तर एकूण चार राज्यांत एनडीए आणि भाजपाला मोठा फटका बसला आहे. याबाबत आपण जाणून घेऊ.

एक्झिट पोलचे अंदाज काय?

निवडणुकीत काय होईल या संबंधी एक्झिट पोलचे अंदाजही पुढे आले. या एक्झिट पोल्सनीही भाजपासह एनडीए ३५० जागा जिंकेल असा दावा केला होता. प्रत्यक्षात भाजपासह एनडीएला ३०० जागा जिंकणंही जड जातं आहे. याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे लोकांनी केलेलं मतदान. मतदानात भाजपा आणि एनडीएला अपेक्षित कौल मिळालेला नाही. महाराष्ट्रात निवडणूक कठीण जाईल असं वाटत होतं पण एकूण चार राज्यांमध्ये भाजपासह एनडीएला फटका बसला आहे.

maharashtra vidhan sabha election 2024 sanjay kelkar avinash jadhav rajan vichare thane assembly constituency
लक्षवेधी लढत : ‘शिवसेना- ठाणे’ समीकरण अडचणीत?
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
shivsena ubt vinod ghosalkar vs bjp manisha Chaudhary
Dahisar Assembly Election 2024: दहिसरमध्ये अटीतटीचा सामना घोसाळकर विरुद्ध चौधरी
marathi muslim seva sangh on vote jihad
‘व्होट जिहाद’ हा भाजपाचा दुष्प्रचार, मराठी मुस्लिम सेवा संघाचा आरोप
maharashtra vidhan sabha election 2024 jalgaon jamod assembly constituency bjp sanjay kute vs congress swati wakekar tight fight and vote division
जळगाव जामोदमध्ये भाजपची घोडदौड थांबणार?
Jharkhand Assembly Election 2024 Phase 1 Voting Updates in Marathi
Jharkhand Assembly Election 2024 : झारखंडमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत ५९ टक्के मतदान
Amit Shah On Jharkhand Election 2024
Jharkhand Election 2024 : झारखंडमधल्या घुसखोरांना हुडकण्यासाठी घेणार ‘हा’ निर्णय; अमित शाह यांचं मोठं आश्वासन
shweta mahale vs congress rahul bondre
चिखलीत ‘ताई’ आणि ‘भाऊ’ची प्रतिष्ठा पणाला; तुल्यबळ लढतीत कोण बाजी मारणार?

हे पण वाचा- Lok Sabha Election Results Live Updates : राहुल गांधी रायबरेलीतून ४ लाख मतांनी विजयी, अमेठीतून भाजपाच्या स्मृती इराणींचा पराभव

भाजपाला महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये मोठा फटका

भाजपाला वाटलं होतं की पश्चिम बंगालमध्ये त्यांच्या जागा वाढतील. मात्र ममता बॅनर्जींनी भाजपाला लोकसभा निवडणुकीतही धोबीपछाड दिला. तसंच उत्तर प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये भाजपाला मतदारांनी साथ दिली नाही. २०१९ मध्ये या राज्यांमध्ये भाजपाने आणि एनडीएने चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे भाजपाला या निवडणुकीतही अपेक्षा होती. मात्र अपेक्षित चार राज्यांमध्येच भाजपाला आणि एनडीएला फटका बसला आहे. उत्तर प्रदेशातल्या ७२ जागा २०१९ मध्ये भाजपाला मिळाल्या होत्या. मात्र यावेळी इंडिया आघाडीला एनडीएपेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत. भाजपाला वाटलं होतं की उत्तर प्रदेशातल्या जास्त जागा येतील. मात्र भाजपाला झटका लागला आहे.

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Live Updates : अमरावतीत भाजपाला मोठा धक्का; नवनीत राणांचा पराभव; निकालाचे प्रत्येक अपडेट वाचा एका क्लिकवर…

आणि भाजपाचं स्वप्न भंगलं…

चार राज्यांमध्ये भाजपाला जो फटका बसला त्यामुळे भाजपाचं ४०० चं स्वप्न भंगलं आहे. २०१९ मध्ये भाजपाला ३०२ जागा मिळाल्या होत्या. या निवडणूक निकालात भाजपाची २५० च्या पुढे जाताना त्रेधा उडते आहे. २०१९ च्या तुलनेत भाजपाच्या ६० जागा कमी झाल्या आहेत. तर एनडीएला ३०० जागांसाठी संघर्ष करावा लागतो आहे. कदाचित भाजपासह एनडीएच्या जागा २९७ पर्यंतच थांबू शकतात. २०१९ मध्ये भाजपाला पश्चिम बंगालमध्ये १८ जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत ही संख्या ११ जागांवर आली आहे. तसंच राजस्थान २०१९ मध्ये भाजपाला २५ जागा मिळाल्या होत्या, ज्या यावेळी १४ पर्यंतच आहेत. महाराष्ट्रात २०१९ मध्ये ४१ जागा मिळाल्या होत्या. मात्र यावेळी तसं घडलेलं नाही. या चार राज्यांत जो फटका बसला त्यामुळे एनडीएसह भाजपाचं ४०० पारचं स्वप्न भंगलं आहे.