Lok Sabha Election Result Updates: लोकसभा निवडणूक निकालाचा दिवस उजाडला आहे. या निकालातले सुरुवातीचे कल हे एक्झिट पोलचे अंदाज चुकवणारे ठरले आहेत. जवळपास सगळ्या एक्झिट पोल्सनी भाजपासह एनडीएला ३५० किंवा त्याहून जास्त जागा दाखवल्या गेल्या होत्या. तर १ जूनच्या दिवशी काँग्रेसने इंडिया आघाडीला २९५+ जागा मिळतील असं म्हटलं होतं. तसंच सोनिया गांधी यांनीही एक्झिट पोलच्या विरोधात निकाल लागतील असं म्हटलं होतं. आता पहिले कल आणि आघाडी पिछाडी जे हाती येत आहेत त्यातून एक्झिट पोलच्या विरोधात जाताना दिसत आहेत.

Lok Sabha Election Results Live Updates : अयोध्येत भाजपा पिछाडीवर, सपाचे अवधेश प्रसाद आघाडीवर

maharashtra vidhan sabha election 2024 aditya thackeray milind deora sandeep deshpande worli assembly constituency
लक्षवेधी लढत : आदित्य ठाकरेंची कोंडी करण्याची खेळी
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Belapur vidhan sabha election
गावी जाणाऱ्या मतदारांना रोखण्याचे मोठे आव्हान; ऐरोली, बेलापूरमध्ये उमेदवारांची कसरत
ajit pawar expressed about obc vote in an interview given to the indian express
ओबीसींची एकगठ्ठा मते मिळणे कठीणच; महायुतीबाबत अजित पवार यांचे मत
union minister nitin gadkari interview for loksatta ahead of Maharashtra Assembly Election 2024
व्यक्तिगत लाभाच्या योजनांकडे सर्वच पक्षांची धाव!
Latur Politics
Latur Politics : अमित देशमुखांना भाजपाच्या अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान; देशमुख वर्चस्व राखणार की चाकूरकर जायंट किलर ठरणार?
Jharkhand Assembly Election 2024 Phase 1 Voting Updates in Marathi
Jharkhand Assembly Election 2024 : झारखंडमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत ५९ टक्के मतदान

रिपब्लिक भारत-मैट्रीजच्या सर्व्हेने काय अंदाज वर्तवला?

एनडीए – ३५३ ते ३६८ जागा
इंडिया आघाडी – ११८ ते १३३ जागा
इतर- ४३ ते ४८ जागा

रिपब्लिक PMARQ चा अंदाज

एनडीए – ३५९ जागा
इंडिया आघाडी – १५४ जागा
इतर- ३० जागा

जन की बातच्या एक्झिट पोलचा अंदाज

एनडीए- ३६२ ते ३९२ जागा
इंडिया आघाडी- १४१ ते १६१ जागा
इतर- १० ते २० जागा

इंडिया न्यूज डी डायनामिक्सचा अंदाज

एनडीए -३७१ जागा
इंडिया आघाडी- १२५ जागा
इतर – ४७ जागा

एबीपी सी व्होटर्सच्या सर्व्हेचा अंदाज जागा काय?

एनडीए-३५३ ते ३८३ जागा
इंडिया आघाडी- १५२ ते १८२ जागा
इतर – ४ ते १२ जागा

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Live Updates : सांगलीत विशाल पाटील यांना निर्णायक आघाडी; प्रत्येक अपडेट वाचा एका क्लिकवर…

चाणक्यचा सर्व्हे

एनडीए ४०० ते ४१५ जागा
इंडिया आघाडी- १०७ ते १११ जागा
इतर ३६ जागा

हे प्रमुख एक्झिट पोल्स लक्षात घेतले तर सगळ्याच एक्झिट पोल्सनी मोदी पुन्हा पंतप्रधान होतील आणि एनडीएसह भाजपाला ३५० पेक्षा जास्त जागा मिळतील असा अंदाज वर्तवला होता. मात्र निवडणूक निकालाच्या दिवशी जे पहिले कल हाती आले आहेत ते कल एक्झिट पोलच्या विरोधात जात असल्याचं दिसून येतं आहे. आता नेमकं काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

महाराष्ट्रात भाजपाला मविआची तगडी टक्कर

भाजपाने ३७० पारचा तर एनडीएसह चारशे पारचा नारा निवडणुकीच्या आधीपासून दिला होता. तसंच मोदींनीही त्यांच्या प्रचारसभांमध्ये अनेकवेळा ही घोषणा दिली होती. हा नारा मात्र भाजपाला फळलेला दिसत नाहीये हेच आत्ताचे कल सांगत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात १८ सभा घेतल्या. मात्र त्याच फारसा परिणाम झालेला दिसत नाही असंच हे कल सांगत आहेत. कारण महाराष्ट्रातही भाजपाला महाविकास आघाडीने चांगली टक्कर दिली आहे. अशात आता काय काय घडामोडी समोर येतात आणि शेवटच्या टप्प्यांपर्यंत काय बदल घडतात? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.