लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर झाला. या निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळालं आहे. तर इंडिया आघाडीला २३२ जागा मिळाल्या आहेत. जम्मू काश्मीरमध्ये कलम ३७० रद्द केल्यानंतर पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत जम्मू काश्मीरच्या दोन माजी मुख्यमंत्र्यांना पराभवाला समोरं जावं लागलं. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांचा आणि माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांचा पराभव झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी बारामुल्ला लोकसभा मतदारसंघामधून ही निवडणूक लढवली होती. त्यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार अब्दुल राशिद शेख (राशिद इंजिनिअर) हे निवडणुकीच्या मैदानात होते. अब्दुल राशिद शेख हे सध्या तुरुंगात आहेत. त्यांच्यावर यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल झाल्याप्रकरणी ते तुरुंगात आहेत. मात्र, त्यांनी तुरुंगात असतानाही बारामुल्ला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. या निवडणुकीत जनतेने अब्दुल राशिद शेख यांना निवडूनही दिलं. त्यामुळे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांना पराभवाला समोरं जावं लागलं. तर दुसरीकडे पंजाबमधील खडूर साहिब लोकसभा मतदारसंघातून अमृतपाल सिंगने तुरुंगातूनच निवडणूक लढवली आणि जिंकली.

हेही वाचा : जम्मू-काश्मीरमध्ये दोन माजी मुख्यमंत्र्यांचा पराभव, तर भाजपाला मिळाल्या ‘एवढ्या’ जागा

एकीकडे तुरुंगातून निवडणूक लढवली आणि थेट माजी मुख्यमंत्र्यांचा पराभव केल्यामुळे अब्दुल राशिद शेख पुन्हा एकदा चांगलेच चर्चेत आले आहेत. आता ते बारामुल्ला लोकसभा मतदारसंघामधून खासदार झाले आहेत. नवनियुक्त खासदार झाल्यानंतर पदाची शपथ घ्यावी लागते. मात्र, अब्दुल राशिद शेख हे सध्या तुरुंगात आहेत. त्यामुळे ते खासदारकीची शपथ कशी घेणार? असा प्रश्न विचारला जात आहे. तसंच अमृतपाल सिंगच्या बाबतीतही असा प्रश्न विचारला जात आहे.

तुरुंगातून खासदारकीची शपथ कशी घेणार?

पंजाबमधील खडूर साहिब लोकसभा मतदारसंघातून अमृतपाल सिंग विजयी झाला आहे. अमृतपाल सिंगने तुरुंगातूनच ही निवडणूक लढवली होती. खडूर साहिब लोकसभा मतदारसंघातील जनतेने अमृतपाल सिंगला निवडून दिलं. दुसरीकडे जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला लोकसभा मतदारसंघामधून अब्दुल राशिद शेख यांनी तुरुंगातून निवडणूक लढवली आणि त्यांचाही विजय झाला. त्यामुळे तुरुंगात असतानाही अमृतपाल सिंग आणि अब्दुल राशिद शेख यांनी ही निवडणूक जिंकली. मात्र, तुरुंगातून खासदारकीची शपथ कशी घेणार? हा सवाल आहे.

काही तज्ज्ञांच्या माहितीनुसार, अमृतपाल सिंग आणि शेख अब्दुल रशीद (इंजिनियर रशीद) यांना खासदारकीची शपथ घेण्यासाठी तुरुंग प्रशासनाची किंवा न्यायालयाची परवानगी घ्यावी लागणार आहे. तसंच शपथ घेतल्यानंतर पुन्हा तुरुंगात परतावं लागेल. दरम्यान, शेख अब्दुल रशीद (इंजिनियर रशीद) हे यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल झाल्याप्रकरणी तुरुंगात आहेत. तर अमृतपाल सिंग सध्या राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत (एनएसए) दिब्रुगडच्या तुरुंगात आहे.