हरियाणामधील हिस्सार मतदारसंघात सासरे विरुद्ध दोन सुना असे एकाच घरातील तिघे परस्परांच्या विरोधात लढत आहेत. तिघांच्या भांडणात चौथ्याचा लाभ होतो की काय, अशी चर्चा मतदारसंघात सुरू झाली आहे.
* माजी उपपंतप्रधान आणि ‘ताऊ’ या नावाने परिचित असलेले देवीलाल यांच्या घरातील तिघे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत.
* देवीलाल यांचे पुत्र ७८ वर्षीय रणजितसिंह चौटाला हे भाजपच्या वतीने निवडणूक लढवित आहेत. हरियाणा विधानसभेत अपक्ष म्हणून निवडून आलेल्या रणजितसिंह यांनी भाजप सरकारला पाठिंबा दिला होता व त्या बदल्यात त्यांना मंत्रिपद देण्यात आले. अलीकडेच त्यांनी भाजपमध्ये अधिकृतपणे प्रवेश केला आणि त्यांची हिस्सार मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली.
हेही वाचा >>> Lok Sabha Elections 2024 : पूर्व विदर्भात ५७.८२ टक्के मतदानाची नोंद
* देवीलाल यांचे ज्येष्ठ पुत्र व माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांचे पुत्र अजय सिंह यांची पत्नी तर माजी उपमुख्यमंत्री दुश्यंत चौटाला यांची आई नैना या जननायक जनता पार्टीच्या वतीन रिंगणात आहेत.
* देवीलाल यांचे आणखी एक पुत्र व माजी आमदार प्रतापसिंह चौटाल यांची सून सुनैना या भारतीय लोकदलाच्या वतीने निवडणूक लढवित आहेत.
* देवीलाल यांच्या तीन मुलांमध्ये सुरुवातीपासूनच राजकीय मतभेद होते. यातूनच कुटुंबीयांनी वेगवेगळया पक्षांची स्थापना केली. तीन कुटुंबे प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात परस्परांच्या विरोधात लढत आहेत. * हिस्सारचे भाजपचे विद्यमान खासदार बिजेंद्र सिंह यांनी निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ते काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत. देवीलाल कुटुंबातील वादात आपला फायदा होईल, अशी काँग्रेसच्या बिजेंद्र सिंह यांना विश्वास आहे.