Lok Sabha Nivadnuk 2024 Schedule : देशात लोकसभा निवडणुकीचा माहौल आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्याआधी त्यांनी निवडणुकीच्या पूर्वतयारीबाबत माहिती दिली. देशात ९६ कोटी मतदार असून ५ लाख मतदान केंद्र आहेत. तर १.५ कोटी निवडणूक कर्मचारी तैनात करण्यात आल्याची माहिती राजीव कुमार यांनी दिली. तसंच, या निवडणुकीतील चार आव्हानेही त्यांनी स्पष्ट केली. मसल (गुन्हेगारी), मनी (पैसा), Missinformation (चुकीची बातमी), MCC Violetions (आचारसंहितेचा भंग) ही आव्हाने सांगताना त्यांनी यावेळी गेल्या ११ विधानसभा निवडणुकीत ३४०० कोटींची रोकड जप्त केल्याची माहिती दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२०२२-२३ च्या निवडणूक काळात, पाच वर्षांपूर्वीच्या तुलनेत ११ राज्यांमध्ये रोख जप्तीचे प्रमाण ८०० टक्केपेक्षा जास्त वाढले आहे. या काळात ३ हजार ४०० कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. तसंच, अंमलबजावणी एजन्सींना बेकायदेशीर पैसे, दारू, ड्रग्ज आणि मोफत वस्तूं वाटणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

अंमलबजावणी यंत्रणांना कोणते निर्देश?

  • दारू, रोख रक्कम, फ्रीबीज, ड्रग्सचे वितरणावर लक्ष ठेवणे.
  • मोफत वस्तूंच्या बेकायदेशीर वितरणावर कारवाई करणे
  • बेकायदेशीर ऑनलाइन रोख हस्तांतरणावर कडक ठेवणे
  • सूर्यास्तानंतर बँकेच्या वाहनांमधून रोकड नेण्याऱ्यावंर कारवाई
  • अनुसूचित नसलेल्या चार्टर्ड फ्लाइटची देखरेख आणि तपासणी

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lok sabha elections 2024 watch on black money in elections 3400 crores seized in 11 elections sgk