लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे. या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. या निकालाच्या आधी एक्झिट पोल्सचे आकडे समोर आले होते. त्यामध्ये एनडीएला बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात आला. एनडीएला ३५० पेक्षा जास्त जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. तसेच इंडिया आघाडीला १५० ते १७० जागा मिळतील, असं एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आलं. असं असलं तरी एनडीए की इंडिया आघाडी कोण सत्ता स्थापन करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय जनता पार्टीने लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान ४०० पारचा नारा दिला होता. संपूर्ण प्रचारात भाजपाच्या नेत्यांनी ४०० पारच्या नाऱ्यावर नेत्यांनी भर दिला. मात्र, निकालाच्या आधी एक्झिट पोल्सचे आकडे समोर आल्यानंतर एनडीए ४०० पार करणार नाही तर ३७५ पर्यंत जाईल असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. त्यामुळे भाजपाचं ४०० पारचं स्वप्न भंगणार असं चित्र दिसत आहे. पण असं असलं तरी एनडीए बहुमतात सत्ता स्थापन करेल, असा अंदाजही व्यक्त करण्यात आलेला आहे.

हेही वाचा : सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या बारामतीत काय होणार? रवींद्र धंगेकरांचं मोठं विधान; म्हणाले, “उद्या कोणत्यातरी एका पवारांना…”

दुसरीकडे इंडिया आघाडीला एक्झिट पोल्सलच्या अंदाजानुसार १५० ते १७० पर्यंत जागा निवडून येतील, असं म्हटलं आहे. मात्र, इंडिया आघाडीने एक्झिट पोल्सलची आकडेवारी फेटाळून लावत इंडिया आघाडी देशात २९५ जागा निवडून येतील, असा दावा केला आहे. त्यामुळे देशाचा कौल एनडीए की इंडिया आघाडीला आहे, याचा निकाल लागण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. ४ जून रोजी सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. त्यानंतर नरेंद्र मोदी पुन्हा हॅटट्रीक करणार की इंडिया आघाडीला यश मिळणार? याचा निर्णय आता अवघ्या काही तासांत समजणार आहे.

निकालाआधी महाराष्ट्रात घडामोडींना वेग

लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या अवघे काही तास आधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी भाजपाचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखल झाले आहेत. त्यामुळे निकालाआधी घडामोडींना वेग आला असून देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात काय चर्चा झाली, यासंदर्भातील तपशील अद्याप समोर आलेला नाही. मात्र, विधानपरिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. कोकण पदवीधर मतदारसंघामधून मनसेने अभिजीत पानसे यांना उमेदवारी दिली आहे. तर भारतीय जनता पार्टीने निरंजन डावखरे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे कोकण पदवीधर निवडणुकीसंदर्भात देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात चर्चा झाल्याचा अंदाज आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lok sabha elections will be announced on june 4 nda vs india lok sabha election result 2024 gkt