Loksabha Voting: लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात मंगळवारी देशभरात सरासरी ६३.२४ टक्के मतदान झाले. महाराष्ट्रात ५६.५७ टक्के मतदान झाले. तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात १४ लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान झाले. दुसरीकडे पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघात श्री शिवाजी मराठा हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयात एका निवडणूक अधिकाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भाजपाला मतदान करा, असे आवाहन संबंधित अधिकारी मतदारांना करत होता, असा आरोप काँग्रेसने केला आहे. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बारामतीत ५२ टक्के आणि पुण्यात ४३ टक्के मतदान झाले.
Total voter turnout for 3rd phase of #LokSabhaElections2019 is 63.24%.
Assam – 78.29%
Bihar – 59.97%
Goa – 71.09%
Gujarat – 60.21%
Jammu & Kashmir – 12.86%
Karnataka – 64.14%
Kerala – 70.21%
Maharashtra – 56.57% pic.twitter.com/bGbCl4G4Q3— ANI (@ANI) April 23, 2019
तिसऱ्या टप्प्यात देशभरात एकूण ११६ जागांसाठी मतदान झाले. यात गुजरातमधील सर्व २६, केरळमधील २०, गोव्याच्या दोन आणि दादरा नगर हवेली तसेच दमण आणि दीवच्या एका जागेचा समावेश आहे. याखेरीज महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये प्रत्येकी १४ तर उत्तर प्रदेशतील दहा, छत्तीसगडमधील सात आणि बिहारमधील पाच जागांचा समावेश आहे. काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे, शशी थरूर, समाज वादी पक्षाचे मुलायमसिंह यादव, भाजपचे वरुण गांधी यांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. गांधीनगरमधून भाजप अध्यक्ष अमित शहा, तर वायनाड या आणखी एका मतदासंघातून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी लढत आहेत.
राज्यात केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्यासह भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, सुप्रिया सुळे, नीलेश राणे, सुजय विखे पाटील, रक्षा खडसे, राजू शेट्टी, उदयनराजे भोसले यांची प्रतिष्ठापणाला आहे.
मंगळवारी सकाळी देशाच्या विविध भागांमध्ये ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर विरोधकांनीही शंका उपस्थित केली आहे. ईव्हीएमवर समाजवादी पक्षाने शंका उपस्थित करत ईव्हीएममधून फक्त भाजपालाच मत जात आहे, असा गंभीर आरोप केला आहे. तर निवडणूक आयोगाने हे आरोप फेटाळून लावले आहेत. शरद पवार यांनी देखील अशाच स्वरुपाचे आरोप केले आहे.
संध्याकाळी सहा वाजता मतदान थांबल्यानंतर देशात तिसऱ्या टप्प्यात ६३.२४ टक्के इतकी मतदानाची नोंद झाली आहे. देशभरातील १५ राज्यांमध्ये तिसऱ्या टप्प्यात मतदान पार पडले. यांपैकी महाराष्ट्रात एकूण ५६.५७ टक्के इतके मतदान झाले.
देशभरातल्या १३ राज्यांमधील आणि २ केंद्रशासीत प्रदेशातील एकूण ११६ लोकसभा मतदारसंघांसाठी आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. दिवसा अखेरपर्यंत ६१.३१ टक्के मतदान झाले.
मी निवडणूक लढवण्यास इच्छुक नव्हतो. पण माझ्याकडे पर्याय नव्हता. मी पाच वर्षात एकही चूक केली असती तर मोदींनी मला कुतुबमीनारवर लटकवले असते: आझम खान
जळगाव 42.62 टक्के, रावेर 46.04 टक्के, जालना 49.40 टक्के, औरंगाबाद 47.36 टक्के, रायगड 47.97 टक्के, पुणे 36.29 टक्के, बारामती 45.35 टक्के, अहमदनगर 45.65 टक्के, माढा 44.13 टक्के, सांगली 46.64 टक्के, सातारा 44.77 टक्के, रत्नागिरी-सिंधुदुर्ग 47.18 टक्के, कोल्हापूर 54.24 टक्के, हातकणंगले 52.27 टक्के.
पीडीपीच्या कार्यकर्त्यांनी नॅशनल कॉन्फरन्सच्या पोलिंग एजंटला केली मारहाण, बोगस मतदानाचा आरोप
तिसऱ्या टप्प्यात आतापर्यंत ३७.८९ टक्के मतदान झाले
औरंगाबादमधील झाकीर हुसेन शाळा येथील मतदान केंद्रावर बोगस मतदान केल्यामुळे एकाला ताब्यात घेतले आहे.
सांगली- 23 %, कोल्हापूर- 30%, हातकणंगले- 25%, औरंगाबाद- 24%, जालना - 27%, रावेर- 26%, जळगाव- 22%, रायगड- 28 %, पुणे- 20%, सातारा- 22%, रत्नागिरी- सिंधुदुर्ग- 30%, बारामती- 24% अहमदनगर- 20%, माढा - 23%
माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा प्रचार करताना पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोहिते- पाटील यांच्यावर केलेल्या टीकेला आज मतदानाच्यावेळी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. पवारांच्या टीकेला मतदारच चोख उत्तर देतील. केवळ माढ्यातच नव्हे तर मावळ आणि बारामतीदेखील राष्ट्रवादीला पराभवाची नामुष्की पत्करावी लागेल, असा दावा मोहिते-पाटील यांनी केला आहे.
सांगलीत महापौर संगीता खोत कमळ चिन्हांकित साडी परिधान करून मिरजेतील समतानगर मतदान केंद्रावर फिरत असल्याची तक्रार काँग्रेस कार्यकर्ते विक्रम कोळेकर यांनी अॅपवर दिली. सहायक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार शरद पाटील यांनी सांगितले की, तक्रार दाखल झाल्यानंतर 10 मिनीटात दक्षता पथकाने पाहणी केली असता तसा प्रकार आढळला नाही, मात्र पुराव्यासह तक्रार दाखल झाली तर स्वतंत्रपणे चौकशी केली जाईल.
जळगाव 20.34 टक्के, रावेर 21.24 टक्के, जालना 23.28 टक्के, औरंगाबाद 20.97 टक्के, रायगड 23.94 टक्के, पुणे 15.50 टक्के, बारामती 21.33 टक्के, अहमदनगर 20.26 टक्के, माढा 19.63 टक्के, सांगली 20.09 टक्के, सातारा 20.67 टक्के, रत्नागिरी-सिंधुदुर्ग 24.96 टक्के, कोल्हापूर 25.49 टक्के, हातकणंगले 23.45 टक्के.
सोलापुरातील करमाळा तालुक्यातील रिद्देवाडी गावातील लोकांचा मतदानावर बहिष्कार, आतापर्यंत एकही मतदान झालं नाही, गावात रस्ता नसल्याने नागरिकांचा निर्णय
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी केला आहे. ईव्हीएममधून फक्त भाजपालाच मत जात असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. रामपूरमध्ये बऱ्याच ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड झाल्याच्या तक्रारी आहेत. मतदान यंत्रात बिघाडाशिवाय प्रक्रिया पार पडायला हवी: अखिलेश यादव
शिवसेना प्रवक्त्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी विद्या भवन शाळा मॉडेल कॉलनी येथे आई लतिका गोऱ्हे यांच्यासह मतदान केले
राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी सकाळी सहपरिवार बारामतीमध्ये मतदानाचा हक्क बजावला.
सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार उदयनराजे भोसले यांनी पत्नी व आईसमवेत मतदानाचा हक्क बजावला आहे.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धी येथे मतदानाचा हक्क बजावला
यंदाच्या निवडणुकीत देशात एका पक्षाचं सरकार निवडून येणार नाही. तर यंदा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) सरकार सत्तेत येणार. आम्ही एनडीएतील घटकपक्ष असून एनडीएचीच सत्ता येणार: संजय राऊत
केरळमधील काँग्रेसचे उमेदवार शशी थरुर यांनी मतदानाच हक्क बजावला, थरुर यांच्याविरोधात भाजपाचे के. राजशेखरन रिंगणात आहेत.
मतदारसंघनिहाय आकडेवारी: जळगाव- ७. ८१ टक्के, रावेर - ८. ४८ टक्के, जालना- ९. २१ टक्के, औरंगाबाद - ८. ७७ टक्के, रायगड - ९. ३५ टक्के, पुणे- ५. ७० टक्के, बारामती - ८. ५४ टक्के, अहमदनगर - ७. ३७ टक्के, माढा - ६. ८५ टक्के, सांगली - ७. ०४ टक्के, सातारा - ६. ८४ टक्के, रत्नागिरी- सिंधुदुर्ग - १०. ९७ टक्के, कोल्हापूर - ९. ९७ टक्के, हातकणंगले - ८. ९८ टक्के
सकाळी ९ वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी
बारामती : ६.१ टक्के
सांगली : ७ टक्के
अहमदनगर : ४ टक्के
कोल्हापूर : ६.७१ टक्के
पुणे : ८.७१ टक्के
माढा : ७.२५ टक्के
औरंगाबाद : ९ टक्के
पुणे- ८. ७१ %, बारामती - ६. १ %, दक्षिण नगर - ४. ९७ %, औरंगाबाद - ९ %, कोल्हापूर - ६. ७१ %, माढा- ७. २५ %, अहमदनगर - ४ %, सांगली - ७ %, बारामती- ६.१ % मतदान
गुजरातमध्ये अमित शाह यांनी बजावला मतदानाचा हक्क, अहमदाबादमधील नारनपुरा येथे केले मतदान
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि त्यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत यांनी कोठंबी या मूळगावी मतदानाचा हक्क बजावला
https://www.loksatta.com/photos/todays-photo-3/1880779/pm-narendra-modi-castied-his-vote-at-a-polling-booth-in-ranip-ahmedabad/
औरंगाबाद येथील वैजापूर तालुक्यातील गारज येथे मतदान यंत्रात बिघाड, दीड तासानंतरही मतदानाला सुरुवात नाही. तर गंगापूर तालुक्यातील बाहेगाव मतदान केंद्रातील यंत्रातही बिघाड. जालन्यात टाकळी अंबड येथेही मतदान यंत्रात बिघाड. बूथ क्रमांक ३२० मधील मतदान यंत्रात बिघाड.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमधील रानिप येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अहमदाबादमधील मतदान केंद्रावर पोहोचले आहेत. निवासस्थान ते मतदान केंद्र हा प्रवास मोदींनी कारमधून केला. या प्रसंगी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी. 'मोदी, मोदी' चे नारे.