देशात लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्याचे मतदान आज पडलं असून येत्या ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. मात्र, त्यापूर्वी आता विविध एक्झिट पोलचे अंदाज समोर येऊ लागले आहेत. त्यानुसार तिरुवनंतपूरमबाबत धक्कादायक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हेही वाचा – Exit Poll : केरळ, तमिळनाडूत भाजपाचा चंचूप्रवेश तर कर्नाटकात काँग्रेसला धक्का?…

अरविंद केजरीवाल आणि 'आप'ला रोखण्यासाठी भाजपाची मतदारांना कोणती आश्वासनं? (फोटो सौजन्य पीटीआय)
अरविंद केजरीवाल आणि ‘आप’ला रोखण्यासाठी भाजपाची मतदारांना कोणती आश्वासनं?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
स्मृती इराणी दिल्ली विधानसभेची निवडणूक लढवणार? केजरीवालांना शह देण्यासाठी भाजपाचा प्लान काय? (फोटो सौजन्य पीटीआय)
Delhi Elections 2025 : स्मृती इराणी दिल्ली विधानसभेची निवडणूक लढवणार? केजरीवालांना शह देण्यासाठी भाजपाचा प्लान काय?
uddhav Thackeray Devendra fadnavis
“पुढील मकर संक्रांतीपर्यंत ठाकरे-फडणवीस एकत्र”, आमदार रवी राणांचा दावा
akola ZP
वंचितची प्रतिष्ठा पणाला लागणार; अकोला जिल्हा परिषद निवडणुकीचे वेध, राजकीय पतंगबाजी रंगणार
scheme for unemployed youth promises rs 8500 per month
सत्तेत आल्यास सुशिक्षित बेरोजगारांना दरमहा ८५०० रुपये : काँग्रेस
bjp deciding direction of campaign for the delhi assembly elections
लाल किल्ला : दिल्ली निवडणुकीची सूत्रे भाजपच्या हाती?
Devendra Fadnavis On Local Body Election
Devendra Fadnavis : आगामी महापालिकेच्या निवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; म्हणाले, “पुढील तीन-चार महिन्यांत…”

माय एक्सिस इंडिया टुडेच्या एक्झिट पोलमध्ये वर्तवलेल्या अंदाजानुसार, तिरुवनंतपूरमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांचा पराभव, तर भाजपाचे उमेदवार चंद्रशेखर विजयी होताना दिसून येत आहेत. महत्त्वाचे म्हणजे काँग्रेसने राज्यसभेच्या सदस्यांपैकी ज्यांना लोकसभेची उमेदवारी दिली त्यापैकी शशी थरुर एक आहेत.

तिरुवनंतपूरम हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. शशी थरूर तीन वेळा या मतदारसंघातून खासदार राहिले आहेत. २००९ पासून थरूर इथून जिंकत आहेत. तिरुवनंतपूरम सर्वात जास्त काळ खासदार राहण्याचा मान त्यांना मिळाला आहे. २०१९ च्या निवडणुकीत थरूर यांनी भाजपाच्या कुम्मनम राजशेखरन यांना जवळपास एक लाख मतांनी पराभूत केले होते.

हेही वाचा – केजरीवालांना आत्मसमर्पण करावं लागणार; न्यायालयाकडून दिलासा नाहीच, जामीन अर्जावर आता ‘…

दरम्यान, यंदा त्यांची लढत भाजपाचे उमेदवार चंद्रशेखर यांच्याशी होती. चंद्रशेखर हे व्यवसायाने उद्योजक आणि राजकारणी आहेत. २०१४ पासून भाजपा तिरुअनंतपूरममध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि एलडीएफला तिसऱ्या स्थानावर ढकलले गेले आहे.

Story img Loader