Loksabha Election Results 2024: गेल्या अडीच महिन्यांपासून लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु होती. या निवडणुकीचा निकाल आज (४ जून) लागणार आहे. एकूण सात टप्प्यांमध्ये झालेल्या या निवडणुकीमध्ये सत्ताधारी एनडीए आणि विरोधातील इंडिया आघाडीमध्ये चुरशीची लढत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सत्तास्थानी येणार की विरोधक त्यांना सत्तेतून पायउतार करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ पासून उत्तर प्रदेशमधील वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे तर राहुल गांधी यावेळी उत्तर प्रदेशमधील रायबरेली आणि आणि केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवत आहेत. मतमोजणीतील सध्याच्या कलांनुसार, राहुल गांधींची रायबरेली मतदारसंघातील आघाडी ही नरेंद्र मोदींच्या वाराणसीतील आघाडीपेक्षा दुप्पट असल्याचे चित्र दिसत आहे. सध्या राहुल गांधी सव्वा दोन लाख मतांनी आघाडीवर आहेत; तर नरेंद्र मोदी एक लाख मतांनी आघाडीवर आहेत
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : 2024 Lok Sabha Election Result Live Updates : सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात १३ हजारांचा फरक, बारामतीचा गड राखण्यासाठी लेकी-सुनेत चढाओढ
वारणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात फक्त सहा उमेदवार उभे होते. या ठिकाणी काँग्रेसच्या अजय राय यांनी मोदींसमोर प्रमुख आव्हान उभे केले आहे. तसेच बसपाचे उमेदवार अतहर जमाल लारी हेदेखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सध्याच्या कलांनुसार, पंतप्रधान मोदी १ लाख १७ हजार मतांनी आघाडीवर आहेत. दुसरीकडे, रायबरेली या आपल्या पारंपारिक मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या राहुल गांधींविरोधात भाजपाच्या दिनेश प्रताप सिंह यांचे प्रमुख आव्हान होते. सध्या राहुल गांधी रायबरेलीमध्ये २ लाख ४७ हजार मतांनी आघाडीवर आहेत. राहुल गांधी यांनी रायबरेलीसोबतच केरळमधील वायनाड मतदार संघातूनही निवडणूक लढवली आहे. या मतदारसंघात राहुल गांधी तब्बल ३ लाख १३ हजार मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे दोन्हीही मतदार संघात राहुल गांधी विजयी ठरतील, असे चित्र आहे.
हेही वाचा : दमदार कामगिरीसाठी कोणत्या पाच गोष्टींवर काँग्रेसचे लक्ष?
२०१९ मध्ये राहुल गांधींचा अमेठीतून पराभव
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये राहुल गांधींनी केरळमधील वायनाडसोबतच उत्तर प्रदेशमधील अमेठी मतदारसंघातूनही निवडणूक लढवली होती. खरे तर अमेठी हा काँग्रेसचा पारंपारिक बालेकिल्ला मानला जातो. मात्र, तरीही या मतदारसंघामध्ये भाजपा नेत्या स्मृती इराणी यांनी राहुल गांधींचा पराभव केला होता. त्यानंतर राहुल गांधींनी वायनाड मतदारसंघातील विजयाच्या जोरावर संसदेत प्रवेश केला. या निवडणुकीमध्ये राहुल गांधींनी अमेठी मतदारसंघाऐवजी रायबरेलीतून निवडणूक लढवणे पसंत केले आहे; तर अमेठीमध्ये काँग्रेस कार्यकर्ते किशोरी लाल शर्मा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.