ईशान्य भारतातील मेघालय, त्रिपुरा आणि नागालँड राज्याच्या विधान निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. तिन्ही राज्यातील चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. निवडणुकीआधी तिन्ही राज्यात स्थानिक पक्षाच्या मदतीनं भाजपाची सत्ता होती. या निवडणुकीतही अपेक्षित निकाल लागला आहे. त्रिपुरा राज्यात भाजपाने बहुमताचा आकडा गाठला आहे. तर नागालँडमध्येही भाजपाला स्थानिक पक्षाच्या मदतीने सरकार स्थापन करण्याची दारं खुली झाली आहे.

दुसरीकडे, मेघालयमध्ये त्रिशंकू लढत पाहायला मिळाली. मेघालयात संगमा यांच्या पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. येथेही भाजपाच्या मदतीने सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. एकेकाळी ईशान्य भारत हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. पण अलीकडच्या काही काळात काँग्रेसला येथे सपाटून मार खावा लागला आहे. त्यामुळे या तिन्ही राज्यांच्या निवडणूक निकालाचा नेमका अर्थ देशाच्या राजकारणासाठी काय आहे, यावर ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी सविस्तर विश्लेषण केलं आहे.

या निवडणुकीनंतर कर्नाटक विधानसभा निवडणूक काँग्रेससाठी किती महत्त्वाची आहे, यावरही गिरीश कुबेर यांनी भाष्य केलं आहे.

Story img Loader