Telangana Vidhan Sabha Election Result 2023 Updates, 3 December 2023: सध्या देशभरात चर्चा आहे ती पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या निकालांची. राजस्धान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा या राज्यांमध्ये आज मतमोजणी होत असून मिझोरममध्ये सोमवारी मतमोजणी होणार आहे. राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये काँग्रेस व भाजपामध्ये थेट लढत दिसत असताना तेलंगणामध्ये मात्र काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचा अंदाज एग्झिट पोल्सच्या माध्यमातून वर्तवण्यात आला होता. मतमोजणीच्या पहिल्या काही तासांमध्ये हा कौल अधिकाधिक स्पष्ट होऊ लागताच तेलंगणामधील राजकीय हालचाली वाढल्या आहेत.

काँग्रेस सर्व संभाव्य शक्यतांसाठी सज्ज!

तेलंगणामध्ये काँग्रेसला बहुमत मिळत असल्याचे प्रारंभिक कौल येताच काँग्रेस सतर्क झाली आहे. हैदराबादमध्ये काही लग्झरी बसेस तयार ठेवण्यात आल्या आहेत. तसेच, सर्व विजयी आमदारांना लगेच हॉटेलमध्ये हलवण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. यासंदर्भात काँग्रेसचे नेते स्पष्ट बहुमत असल्यामुळे आम्हाला चिंता वाटण्याचं कारण नाही, अशी भूमिका मांडत असले, तरीही कोणताही धोका पत्करण्यासाठी काँग्रेस नेतेमंडळी तयार नसल्याचं त्यांच्या प्रतिक्रियांवरून दिसून येत आहे.

Image Of India Alliance Leaders.
AAP vs Congress : “तर काँग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर काढायला लावू”; काँग्रेसला भाजपाकडून निधी, आपचे गंभीर आरोप
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
डॉ. आंबेडकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा वार अन् भाजपाचा पलटवार, दिल्लीत एनडीएच्या बैठकीत काय ठरलं? (फोटो सौजन्य पीटीआय)
BJP vs Congress : डॉ. आंबेडकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा वार अन् भाजपाचा पलटवार, दिल्लीत एनडीएच्या बैठकीत काय ठरलं?
Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray
Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, “२०१९ मध्ये मोठी गद्दारी…”
Important update regarding municipal elections in Maharashtra state
राज्यातील महापालिका निवडणुकीबाबत महत्वाची अपडेट, बावनकुळे म्हणाले…
Public Works Minister Shivendra Raje, Satara Shivendra Raje,
साताऱ्यातील आम्ही चारही मंत्री एकत्रितपणे जिल्ह्याचा विकास करू, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजेंचा विश्वास
Shambhuraj Desai, tourism Maharashtra ,
महाराष्ट्राला पर्यटनामध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य बनवू, पर्यटनमंत्री शंभूराज देसाईंची ग्वाही
devendra fadnavis gadchiroli guardian minister
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना हवंय ‘या’ जिल्ह्याचं पालकमंत्रीपद; मित्रपक्षांनी सहमती दिल्यास जबाबदारी स्वीकारणार!

“केसीआर यांची पद्धत सगळ्यांनाच माहिती आहे”

आमदारांना गळाला लावण्याची केसीआर यांची पद्धत असल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे.

Telangana Election Result 2023: BRS व भाजपात पडद्यामागे हातमिळवणी? खासदाराच्या विधानामुळे तर्क-वितर्कांना उधाण!

“आपल्या सगळ्यांनाच केसीआर यांची कामाची पद्धत माहिती आहे. आमदारांना पळवणं हीच त्यांची पद्धत आहे. त्यामुळे आम्ही काही सतर्कतेचे उपाय करून ठेवले आहेत. पण आजचे कौल पाहाता आम्हाला काळजी करण्याची गरज नाही असं दिसतंय. कारण आम्ही किमान ८० जागांवर विजयी होत आहोत. सर्वकाही ठीक आहे”, अशी प्रतिक्रिया तेलंगणा काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष किरण कुमार यांनी दिली आहे.

खरंच आमदारांना हलवलं जाणार आहे का?

दरम्यान, तेलंगणातील विजयी आमदारांना खरंच हॉटेलमध्ये किंवा इतर ठिकाणी हलवलं जाणार आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारताच कर्नाटकमधील काँग्रेसचे मंत्री रहीम खान यांनी सूचक प्रतिक्रिया दिली. “जर तशीच वेळ आली, तर हाय कमांड त्यावर निर्णय घेईल”, असं ते म्हणाले.

दरम्यान, हैदराबादमधील ताज कृष्णा परिसरात बसेस तयार ठेवण्यात आल्या असून सर्व विजयी आमदारांना बंगळुरूमध्ये हलवण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.

Story img Loader