मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीतील चित्र स्पष्ट झालं आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपाला मोठ्या प्रमाणात यश मिळालं आहे. तर, काँग्रेसने तेलंगणात सत्ता खेचून आणली आहे. पण, राजस्थान आणि छत्तीसगडसारखी राज्ये काँग्रेसला गमावावी लागली आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यावर्षी राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळालेल्या आम आदमी पक्षाने ( आप ) मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये निवडणूक लढवली होती. ‘आप’चे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी तीनही राज्यांत मोठ्या प्रमाणात प्रचार केला होता. तरीही, ‘आप’ला तीनही राज्यांमध्ये खातंही उघडता आलं नाही.

हेही वाचा : राजस्थानमध्ये मोदी, ध्रुवीकरण, जातींच्या आधारावर भाजपची सत्तेवर पकड

गुजरात विधानसभा निवडणुकीत ‘आप’ने चमकदार अशी कामगिरी केली होती. त्याच पार्श्वभूमीवर मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये ‘आप’ने उमेदवार उभे केले होते. पण, ‘आप’ला यश मिळालं नाही.

‘आप’ने २७० जागा असलेल्या मध्य प्रदेशात ७० हून अधिक उमेदवार उभे केले होते. १९९ जागा असलेल्या राजस्थानमध्ये ८८ आणि ९० जागा असलेल्या छत्तीसगडमध्ये ५७ उमेदवार उभे केले होते. मात्र, तीनही राज्यांमध्ये केजरीवालांना मोठा झटका बसला आहे. एकाही उमेदवाराला छाप पाडता आली नाही. सर्व उमेदरावांची अनामत रक्क जप्त झाली आहे.

हेही वाचा : मध्य प्रदेशमध्ये भाजपाचा बोलबाला, शिवराजसिंह चौहान यांना पुन्हा मुख्यमंत्रिपद मिळणार का?

‘आप’ला छत्तीसगडमध्ये ०.९४ टक्के मते मिळाली आहे. तर, मध्य प्रदेशात ०.४४ टक्के आणि राजस्थानमध्ये ०.३८ टक्के मते मिळाली आहेत.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Madhya pradesh rajasthan chhattisgarh election result aap contested 200 seats not won any ssa