Mahad Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्रात राजकीय घडामोडी वेगाने घडताना पाहायला मिळाल्या. सर्वच नेत्यांनी आपआपल्या मतदारसंघात पुन्हा एकदा वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी कंबर कसली. त्यामुळे २०२४ च्या विधानसभेची निवडणूक अनेकांसाठी प्रतिष्ठेची मानली जात होती. आता विधानसभेच्या निवडणुकीत रायगड जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ देखील महत्वाचे ठरले. यामध्ये गेल्या पाच वर्षात राज्यात प्रचंड राजकीय उलथापालथ झाली. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणातही अनेक समिकरणे बदलली आहेत. राज्याच्या राजकारणात महाड विधानसभा मतदारसंघ (Mahad Vidhan Sabha) कायम चर्चेत राहिला. या मतदारसंघातून सध्या शिवसेनेचे (शिंदे गट) भरत गोगावले विद्यमान आमदार आहेत.

महाड विधानसभा मतदारसंघामधून महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) स्नेहल जगताप यांनी निवडणूक लढवली. तसेच महायुतीकडून भरतशेठ गोगावले हे निवडणुकीच्या मैदानात होते. गेल्या पाच वर्षात झालेली राजकीय उलथापालथ पाहता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने दोन्ही पक्षांची ताकद विभागली गेली. त्यामुळे दोन्ही गट परस्पर विरोधी झाले. त्यातच युती आघाडीच्या राजकारणाची समिकरणे ३६० अंशाच्या कोनात बदलली. त्यामुळे सध्या मतदार देखील काहीसे संभ्रमावस्थेत असल्याचं दिसून आलं. मात्र, या निवडणुकीत महाडमध्ये भरत गोगावले यांचा विजय झाला तर ठाकरे शिवसेनेच्या स्नेहल जगतापांचा पराभव झाला.

sharad pawar ncp vs ajit pawar ncp contest
Maharashtra Election 2024 : तुमसर विधानसभा मतदारसंघात ‘राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी’?
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
bjp leader dilip bhoir
अलिबागमधून भाजपचे दिलीप भोईर बंडखोरीच्या तयारीत
Rebellion in BJP in Karjat and Alibag, Karjat,
रायगडमध्ये भाजपच्या बंडखोरांचे शिवसेना शिंदे गटाला आव्हान
shani dev margi 2024 today horoscope
१५ नोव्हेंबरनंतर शनिदेव ‘या’ राशींवर करणार धन अन् सुखाची बरसात; शनी मार्गी होताच मिळेल बक्कळ पैसा अन् यश
After Diwali Transit of Venus in Sagittarius will be a sign of prosperity in astrology
दिवाळीनंतर धनाचा दाता शुक्र ग्रह बदलणार चाल! ‘या’ राशींचे उजळणार भाग्य, बँक बॅलन्समध्ये मोठी वाढ होण्याचा योग
Walan Kund place
लोक पर्यटन  : वाळणकोंड
Congress Withdrawals in Kolhapur North Assembly Election Constituency
Kolhapur Assembly Election 2024 : कोल्हापूरमधील काँग्रेसच्या माघारनाट्याने निकालाची समीकरणे बदलणार ?

हेही वाचा : Shrivardhan Constituency 2024 : श्रीवर्धनमध्ये कोण बाजी मारणार; आदिती तटकरे पुन्हा वर्चस्व राखणार का? काय आहे राजकीय समीकरण?

महाड विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत झाली. या मतदारसंघामधून याआधी प्रभाकर मोरे यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे. त्यानंतर भरत गोगावले यांनी या मतदारसंघाचे दीर्घकाळ प्रतिनिधित्व केलं. ते सध्याही विद्यमान आमदार आहेत. आता शिवसेनेतील फुटीमुळे महाडमधील कार्यकर्तेही आणि मतदारही विभागले गेले. मात्र, त्याचा फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसल्याचं पाहायला मिळालं.

मतदारसंघावर भरत गोगावलेंची पकड

महाड मतदारसंघ महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यात येतो. महाड विधानसभा मतदारसंघाची रचना ही महाड, पोलादपूर आणि माणगाव तालुक्यातील काही भाग मिळून होते. या मतदारसंघात १९५२ ते १९८० च्या काळात सलग चार वेळा काँग्रेसचे उमेदवार निवडून आले होते. त्यानंतर २००४ चा अपवाद सोडता महाड विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचं वर्चस्व राहिलं. यामध्ये भरत गोगावले हे २००९, २०१४ आणि २०१९ असे सलग तीन वेळा या मतदारसंघामधून आमदार झाले आहेत. त्यामुळे मतदारसंघावर भरत गोगावलेंची पकड असल्याची चर्चा असते.

महाड विधानसभा मतदारसंघ २०१९ मध्ये शिवसेनेने जिंकला होता. शिवसेनेचे (शिंदे शिवसेना) भरत गोगावले यांनी काँग्रेसचे माणिक मोतीराम जगताप यांचा पराभव करत विजय मिळवला होता. मात्र, माजी आमदार माणिक जगताप यांचे करोना काळात निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या राजकीय वारसदार असलेल्या आणि महाड नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाला भरत गोगावलेंची कोंडी करण्यासाठी समर्थ पर्याय उपलब्ध झाल्याचं बोललं जात आहे. स्नेहल जगताप यांचा मतदारसंघातील वाढता प्रभाव गोगावलेंसाठी अडचणीचा ठरू शकतो अशी चर्चा होती. महाडच्या नगराध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळलेल्या स्नेहल जगताप या देखील लोकप्रिय आहेत. त्यातच पक्ष फुटीनंतर शिवसेनेच्या ठाकरे गटासोबत राहिलेल्या निष्ठावंतांची साथ त्यांना मिळू शकते. दरम्यान, भरत गोगावले यांचा दांडगा जनसंपर्क आणि मतदारसंघातील सक्रियता ही त्यांची जमेची बाजू असली तरी पक्षांतर्गत बंडखोरी केल्याचा मुद्दा ठाकरे गटाकडून सातत्याने लावून धरला जातो. मात्र, या सर्व घडामोडीनंतरही शिवसेना शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी बाजी मारली आहे.

हेही वाचा : Dahanu : डहाणू विधानसभा मतदारसंघावर सीपीएमचा वरचष्मा, भाजपाची भूमिका काय?

भरत गोगावले एसटीच्या अध्यक्षपदी

दरम्यान, आमदार भरत गोगावले यांची महयुतीच्या सरकारमध्ये मंत्रिमंडळात मंत्रिपदी वर्णी लागेल आणि रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रिपद मिळेल, अशी चर्चा होती. मात्र, भरत गोगावले यांना मंत्रिपद मिळालं नाही. पण काही दिवसांपूर्वीच भरत गोगावले यांची महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच एसटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

२०१९ च्या निवडणुकीतील एकूण मतदारांची संख्या

महाड मतदारसंघात २०१९ मध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भरत गोगावले यांनी आपल्या विजयाची हॅट्ट्रिक नोंदवत १ लाख १ हजार ३७० मते प्राप्त करत विजय मिळवला होता. या मतदारसंघांत १ नगर परिषद, १ नगरपंचायतीसह दहा जिल्हा परिषद मतदारसंघांतील मतदारांची एकूण संख्या २ लाख ८४ हजार एवढी आहे. तसेच यामध्ये सुमारे १ लाख ४२ हजार स्त्री मतदार तर १ लाख ४१ हजार पुरुष मतदारांचा समावेश आहे. मतदारांच्या सध्याच्या आकडेवारीमध्ये आता काही बदल झालेला असू शकतो.

२०२४ च्या निवडणुकीत किती टक्के मतदान झालं?

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत (Vidhan Sabha Elections 2024 Voting Percentage) रायगड जिल्ह्यात एकूण ६७.२३ टक्के मतदान झालं आहे.

Story img Loader