१५व्या महाराष्ट्र विधानसभेसाठी यंदा निवडणुका होत आहेत. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या प्रमुख पक्षांमध्ये फूट पडल्यानंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक असेल. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीकडे राज्यातीलच नव्हे, तर देशभरातील राजकीय विश्लेषकांचं लक्ष लागलेलं आहे. भारतीय जनता पक्ष, शिवसेना एकनाथ शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची महायुती, तर दुसरीकडे शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व काँग्रेस यांची महाविकास आघाडी या दोन प्रतिस्पर्ध्यांमध्ये प्रामुख्याने ही निवडणूक होईल.
१९५७ साली महाराष्ट्र व गुजरात मिळून मुंबई प्रांताची निवडणूक पार पडली. तर १९६२ साली महाराष्ट्राच्या स्थापनेनंतरची पहिली निवडणूक झाली.
महाराष्ट्रातील विद्यमान विधानसभेचा कालावधी २८ नोव्हेंबर २०२४ रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे राज्यातील निवडणुका आणि मतमोजणी प्रक्रिया ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यांत होण्याची शक्यता आहे.
गेल्या विधानसभा निवडणुका २१ ऑक्टोबर रोजी पार पडल्या होत्या. २४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडली. भाजपा व शिवसेनेच्या युतीला बहुमत मिळाल्यानंतरही राजकीय वादामुळे पुढील महिनाभर सत्तास्थापना होऊ शकली नाही. अखेर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.
२३ नोव्हेंबर २०१९ रोजी देवेंद्र फडणवीस व अजित पवारांनी शपथ घेऊन सरकार स्थापन केलं. पण २६ नोव्हेंबर रोजी दोघांनी राजीनामा दिला. २८ नोव्हेंबर रोजी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसनं मिळून सरकार स्थापन केलं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले.
गेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला १०५ जागांवर विजय मिळाला. त्यापाठोपाठ शिवसेनेला ५६ तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ५४ जागा मिळाल्या. काँग्रेस पक्षानं राज्यात ४४ जागा जिंकल्या. वंचित बहुजन आघाडीला ३, एमआयएमला २, समाजवादी पक्षाला २, प्रहार जनशक्ती पक्षाला २ तर माकप, मनसे, शेकाप, स्वाभिमानी पक्ष, जन सुराज्य शक्ती, क्रांतिकारी शेतकरी पक्ष व रासप या पक्षांना प्रत्येकी एका जागेवर विजय मिळाला. या निवडणुकीत १३ अपक्ष निवडून आले होते.
भारतात स्वीकारण्यात आलेल्या लोकशाहीच्या प्रातिनिधिक संघराज्य स्वरूपानुसार केंद्रात लोकसभेत लोकांमधून निवडून आलेले लोकप्रतिनिधी खासदार म्हणून बसतात, तर राज्यात अशाच प्रकारे निवडून आलेले लोकप्रतिनिधी आमदार म्हणून विधानसभेत बसतात. राज्य विधिमंडळात विधानपरिषद हे वरीष्ठ सभागृह तर विधानसभा हे कनिष्ठ सभागृह मानलं जातं.
Maharashtra Assembly Election 2024: Get all the latest details on the Maharashtra Assembly Elections 2024, covering all 288 constituencies. Learn about key candidates from the leading political alliances—Maha Vikas Aghadi (MVA) and Mahayuti Alliance. Find a complete constituency list, updated election schedule, and an extensive candidate list. Stay up to date with the latest election results, party affiliations, and voter demographics. This page is the go-to source for insights into Maharashtra’s political landscape and what the election outcomes mean for the state’s future.
Jharkhand Assembly Elections 2024: Get all the latest details on the Jharkhand Assembly Elections 2024, covering all 81 constituencies across 24 districts. Learn about key candidates from leading political alliances, including the Jharkhand Mukti Morcha (JMM), Congress and Bharatiya Janata Party (BJP). Find a complete constituency list, updated election schedule, and an extensive candidate list. Stay up to date with the latest election results, party affiliations, and voter demographics.