Big Fights in 2019 Maharashtra Vidhan Sabha Election : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं घोडामैदान जवळ आलं आहे. २३ नोव्हेंबरला राज्यात कुणाचं सरकार येणार हे चित्र स्पष्ट झालेलं असेल. दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. तसंच यावेळी २०१९ सारखी परिस्थिती म्हणजेच महायुती विरुद्ध काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी अशी नसून सहा मुख्य पक्षांची लढाई आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष अर्धे अर्धे झाले आहेत. त्यामुळे विधानसभेचं महाभारत कुरुक्षेत्राच्या लढाईसारखंच असणार आहे. यंदाही बिग फाईट्सची चर्चा रंगली ( Big Fights in 2019 Maharashtra Vidhan Sabha Election ) आहे. मात्र २०१९ लाही बिग फाईट्स झाल्याच होत्या. कुणी बहिणीला हरवलं. तर कुणी पहिल्यांदाच निवडून आलं. जाणून घेऊ २०१९ च्या बिग फाईट्स बाबत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२०१९ बिग फाईट क्रमांक १

परळी मतदारसंघात मुंडे विरुद्ध मुंडे असा सामना रंगलेला दिसून आला. पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे यांचा जो सामना झाला त्यात धनंजय मुंडेंनी बाजी मारली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लढणारे धनंजय मुंडे यांनी त्यांच्या बहिणीचा म्हणजेच पंकजा मुंडेंचा दारुण पराभव केला. ज्यामुळे पंकजा मुंडेंच राजकारण बऱ्यापैकी मर्यादित झालं. सद्यस्थितीत दोन्ही भावंडांमध्ये ऑल इज वेल आहे. धनंजय मुंडे सत्ताधारी पक्षात आहेत.

२०१९ बिग फाईट क्रमांक २

२०१९ मध्ये चर्चा रंगलेली दुसरी बिग फाईट होती अजित पवार विरुद्ध गोपीचंद पडळकर यांची. भाजपाने गोपीचंद पडळकारांच्या मागे ‘महाशक्ती’ उभी केली होती. मात्र बारामतीत पडळकर यांच्यासह सगळ्या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं. ( Big Fights in 2019 Maharashtra Vidhan Sabha Election ) कारण अजित पवारांना १ लाख ९५ हजार ६४१ मतं मिळाली. २०२३ मध्ये अजित पवार महायुतीत सहभागी झाले. आता बारामती त्यांना कौल देणार का? की युगेंद्र पवारांना निवडणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

२०१९ बिग फाईट क्रमांक ३

चंद्रकांत पाटील यांना भाजपाने कोथरुडमधून उमेदवारी दिली होती. त्यांच्या विरोधात प्रचार करताना राज ठाकरेंनी त्यांचा उल्लेख चंपा असा केला होता. ( Big Fights in 2019 Maharashtra Vidhan Sabha Election ) मात्र चंद्रकांत पाटील यांनी १ लाख ५ हजार २४६ मतं मिळवत मनसेच्या किशोर शिंदे यांचा पराभव केला होता.

२०१९ बिग फाईट क्रमांक ४

सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे यांनी एमआयएमच्या हाजी फारुक मॅकबोल शब्दी यांचा पराभव केला. ५१ हजार ४४० मतं मिळवत त्या विजयी झाल्या होत्या. सद्यस्थितीत प्रणिती शिंदे खासदार झाल्या आहेत. आता या विधानसभा मतदार संघात कुणाला तिकिट मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

२०१९ बिग फाईट क्रमांक ५

वरळी या मतदारसंघात आदित्य ठाकरेंनी पहिल्यांदाच निवडणुकीत नशीब आजमावलं. ८९ हजार २४८ मतं मिळवत आदित्य ठाकरे विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरेश मानेंचा पराभव केला. ( Big Fights in 2019 Maharashtra Vidhan Sabha Election )

हे पण वाचा- Maharashtra Assembly Election Results 2019 Analysis : २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत विभागनिहाय राजकीय पक्षांना किती जागा मिळाल्या?

२०१९ बिग फाईट क्रमांक ६

कराड दक्षिण मतदारसंघातून काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण यांनी विजयाचा गुलाल उधळला. या निवडणुकीत त्यांना ९२ हजार २९६ मतं मिळाली. त्यांनी भाजपाच्या अतुल भोसलेंचा पराभव केला.

२०१९ बिग फाईट क्रमांक ७

भाजपाचे नितीश राणे विरुद्ध शिवसेनेचे सतीश सावंत अशी लढाई या मतदारसंघात झाली होती. मात्र यात नितेश राणे विजयी झाले. ८४ हजार ५०४ मतं मिळवत नितेश राणेंनी कणकवलीचा गड राखला.

२०१९ बिग फाईट क्रमांक ८

मुंब्रा कळवा मतदारसंघात २०१९ ला झालेली लढत काहीशी ग्लॅमरस ठरली. कारण शिवसेनेने अभिनेत्री दिपाली सय्यद यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं होतं. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या जितेंद्र आव्हाड यांनी १ लाख ९ हजार २८३ मतं मिळवून दिपाली सय्यद यांचा पराभव केला.

२०१९ बिग फाईट क्रमांक ९

कल्याण ग्रामीण या मतदारसंघातली लढत चुरशीची झाली. कारण मनसेचे राजू पाटील यांनी शिवसेनेच्या रमेश म्हात्रेंना पराभवाची धूळ चारली. ९३ हजार ९२७ मतं मिळवून राजू पाटील विजयी झाले. या खेपेलाही पक्षाने त्यांना संधी दिली आहे.

२०१९ बिग फाईट क्रमांक १०

कर्जत जामखेड या मतदारसंघातून रोहित पवार हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर पहिल्यांदाच उभे राहिले होते. त्यांनी भाजपाच्या राम शिंदेंचा पराभव केला. रोहित पवार यांना या निवडणुकीत १ लाख ३५ हजार ८२४ मतं मिळाली होती.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra assembly election 2019 big fights who spilled victory who became the giant killer scj