Maharashtra Vidhan Sabha Election 2019 Big Leader Defeat : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यामुळे राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडींना वेग आला आहे. विधानसभेसाठी २० नोव्हेंबरला मतदान आणि २३ नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. २३ नोव्हेंबर रोजी राज्यात कुणाचं सरकार येणार हे चित्र स्पष्ट होईल. मात्र, या विधानसभेसाठी अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कारण २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या आणि त्यानंतर राजकीय समीकरणे बदलली. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत अनेकांनी कंबर कसली आहे. मात्र, या अनुषगांनेच २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कोणत्या दिग्गच नेत्यांचा पराभव झाला होता? याविषयी थोडक्यात जाणून घेऊयात…

धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंचा पराभव

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघात भारतीय जतना पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) धनंजय मुंडे यांच्यामध्ये लढत झाली होती. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवणारे धनंजय मुंडे यांनी त्यांच्या बहिणीचा म्हणजे पंकजा मुंडे यांचा पराभव केला होता. तेव्हा पंकजा मुंडे या ग्रामविकास आणि महिला-बालकल्याण मंत्री होत्या. मात्र, तरीही त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. आता २०२४ च्या विधानसभेच्या निवडणुकीत धनंजय मुंडे हे महायुतीचे उमेदवार आहेत.

mns mayuresh wanjale
“खडकवासलावर मनसेचा शंभर टक्के झेंडा फडकणार” मनसे उमेदवार मयुरेश वांजळेंचा विश्वास
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
Maharashtra BJP tickets
भाजपाच्या ८० आमदारांना पुन्हा तिकीट; उमेदवारी देताना भाजपाने यावेळी अधिक खबरदारी का घेतली?
babanrao lonikar vidhan sabha
बबनराव लोणीकर यांना सलग आठव्यांदा उमेदवारी
Vikhroli Vidhan Sabha Election 2024 Sunil Raut
Vikhroli Assembly constituency : पक्षफुटीचं राजकारण होणार की भाषिक वाद रंगणार? हॅटट्रीकसाठी राऊतांसमोर महायुतीचं आव्हान!
Jammu Kashmir Election Results 2024
Jammu Kashmir Election Results 2024: इतिहासात गाजलेल्या त्या ‘तीन’ निवडणुका का ठरल्या होत्या महत्त्वाच्या?
FEmale mla in jammu kashmir
Women MLA In Jammu Kashmir : शगुन, शमीमा आणि सकिना; जम्मू काश्मीरमधील विधानसभेत या तिघींचा घुमणार आवाज!
bjp eight minister lost election
Haryana Assembly Election 2024 : हरियाणात भाजपाला पूर्ण बहुमत; पण कृषी आणि अर्थमंत्र्यांसह ‘या’ आठ मंत्र्यांचा पराभव

हेही वाचा : महाराष्ट्रात खरंच राष्ट्रपती राजवट लागू शकते का? संजय राऊतांच्या दाव्यात किती तथ्य? नियम काय सांगतो?

रोहित पवारांकडून राम शिंदेंचा पराभव

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे नेते राम शिंदे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते रोहित पवार यांनी पराभव केला होता. रोहित पवार (Rohit Pawar) हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर पहिल्यांदाच कर्जत-जामखेड मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहिले होते. तेव्हा राम शिंदे हे तत्कालीनं मंत्री आणि नगर जिल्ह्याचे पालकमंत्री होते. मात्र, तरीही त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. दरम्यान, यंदाच्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत आता पुन्हा एकदा कर्जत-जामखेड (Karjat Jamkhed) विधानसभा मतदारसंघात रोहित पवार विरुद्ध राम शिंदे (Ram Shinde) असा सामना रंगणार आहे.

कैलास गोरंट्याल यांच्याकडून अर्जुन खोतकरांचा पराभव

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जालना विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे (शिंदे) नेते अर्जुन खोतकर यांचा काँग्रेसचे नेते कैलास गोरंट्याल यांनी पराभव केला होता. अर्जुन खोतकर आणि कैलास गोरंट्याल यांच्यामध्ये चुरशीचा सामना झाला होता. तेव्हा अर्जुन खोतकर हे राज्यमंत्री होते. मात्र, तरीही कैलास गोरंट्याल यांनी अर्जुन खोतकर यांचा पराभव करत विजय मिळवला होता. यंदा २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत अर्जुन खोतकर विरुद्ध कैलास गोरंट्याल असा सामना पुन्हा रंगणार आहे. त्यामुळे आता जालना मतदारसंघातील जनता कोणाला कौल देते? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

जयदत्त क्षीरसागरांचा संदीप क्षीरसागरांकडून पराभव

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत बीड विधानसभा मतदारसंघात जयदत्त क्षीरसागर आणि त्यांचा पुतण्या संदीप क्षीरसागर यांच्यात लढत झाली होती. मात्र, या निवडणुकीत संदीप क्षीरसागर यांनी जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव केला होता. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीआधी जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांची मंत्रीपदी वर्णी लागली होती. पण त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत जयदत्त क्षीरसागर यांचा संदीप क्षीरसागर यांनी पराभव केला होता.

अनिल बोंडेंचा देवेंद्र भुयार यांच्याकडून पराभव

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अमरावतीमधील मोर्शी विधानसभा मतदारसंघामधून भाजपाचे नेते अनिल बोंडे यांचा देवेंद्र भुयार यांनी पराभव केला होता. अनिल बोंडे हे तेव्हा कृषीमंत्री होते. मात्र, तरीही देवेंद्र भुयार यांच्याकडून त्यांचा पराभव झाल्यामुळे त्यांच्यावर मोठी नामुष्की ओढावली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातील नेते म्हणून अनिल बोंडे यांना ओळखलं जातं.

संजय जगतापांकडून शिवतारेंचा पराभव

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पुरंदरमधून शिवसेनेचे (शिंदे) नेते विजय शिवतारे यांचा पराभव झाला होता. काँग्रेसचे संजय जगताप यांनी विजय शिवतारे यांचा पराभव केला होता. तेव्हा विजय शिवतारे हे मंत्री होते. मात्र, तरीही त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं.