Political Nepotism: राष्ट्रवादी काँग्रेसच्या यादीतही घराणेशाहीची झलक; सर्वपक्षीय ‘पॉलिटिकल नेपोटिझम’ला उत

Political Nepotism in Maharashtra Politics: विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील प्रमुख पक्षांनी उमेदवार याद्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये प्रस्थापित नेत्यांच्या कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी दिल्याचे दिसत आहे.

Political Nepotism in Maharashtra Assembly Election 2024
सर्वपक्षीय उमेदवार यादीत घराणेशाहीची झलक पाहायला मिळत आहे. (Photo – Loksatta Graphics)

Political Nepotism in Maharashtra Assembly Election 2024: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यंदा विविध पक्षांनी आपापल्या उमेदवार यादीत घराणेशाहीला थोड्याबहोत प्रमाणात स्थान दिल्याचे दिसत आहे. स्वतःला पार्टी विथ डिफरन्स आणि इतरांना परिवारवादी पक्ष म्हणणाऱ्या भाजपानेही यंदा घराणेशाहीला प्राधान्य दिल्याचे दिसत आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर पुर्वीपासूनच घराणेशाहीचा आरोप होत आला आहे. आज जाहीर केलेल्या यादीतही त्याची प्रचिती आलेली पाहायला मिळाली.

राष्ट्रवादीने आपल्या पहिल्या यादीत कर्जत जामखेड मतदारसंघासाठी रोहित पवार, बेलापूरसाठी संदीप नाईक, मुक्ताईनगरसाठी रोहिणी खडसे, अहेरीमधून भाग्यश्री आत्राम, बारामतीसाठी युगेंद्र पवार, पारनेरमध्ये रानी लंके आणि तासगाव-कवठे महांकाळ मतदारसंघात रोहित आर. आर. पाटील यांना उमेदवारी दिली आहे.

पवार घराण्याचा आणखी एक सदस्य राजकारणात

शरद पवार यांच्या घरातून युगेंद्र पवार यांच्या रुपाने नवीन सदस्य आता निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. याआधी अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार हे राजकारणात सक्रिय आहेत. माजी मंत्री गणेश नाईक यांचे चिरंजीव संदीप नाईक यांनी बंडखोरी करत बेलापूरमधून तुतारीच्या चिन्हावर लढण्याची तयारी केली आहे. अजित पवार गटाचे मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची लेक भाग्यश्री आत्राम ही आपल्या वडिलांविरोधात निवडणूक लढवित आहे. पारनेरमध्ये विद्यमान खासदार निलेश लंके यांची पत्नी रानी लंके निवडणुकीसाठी उभी आहे. तर राज्याचे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील हे त्यांच्या तासगाव- कवठे महांकाळ या पांरपरिक मतदारसंघात निवडणुकीसाठी उभे राहिले आहेत. माजी मंत्री एकनाथ खडसे यांची मुलगी रोहिणी खडसे यांना जळगावच्या मुक्ताई नगरमधून तिकीट देण्यात आले आहे.

हे वाचा >> विश्लेषण: महाराष्ट्रात सर्वच पक्षांत घराणेशाहीची सरशी; उमेदवारी याद्या काय सांगतात?

u

भाजपानेही केला घराणेशाहीचा पुरस्कार

काँग्रेसमधून भाजपामध्ये आलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण, कल्याणमध्ये गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा, जळगाव जिल्ह्यात माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचे पुत्र अमोल, चिंचवडमध्ये दिवंगत लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप, श्रीगोंदा मतदारसंघात बबनराव पातपुते यांच्या पत्नी प्रतिभा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि त्यांचे बंधू विनोद शेलार यांनाही उमेदवारी मिळाली. इचलकरंजीत आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहुल हे भाजप उमेदवार आहेत. भाजपाच्या यादीतील जवळपास २० जण हे घराणेशाहीशी संबंधित आहेत.

हे ही वाचा >> शिंदेंच्या शिवसेनेत घराणेशाही, नेत्यांचे कुटुंबीय विधानसभेच्या रिंगणात; मुलं, भाऊ व पत्नीला उमेदवारी

शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षातही घराणेशाहीचे लाड

शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या यादीतही हाच प्रकार दिसतो. जवळपास ४५ जणांच्या पहिल्या यादीत अनेक नावे घराणेशाहीशी संबंधित आहेत. पैठणमधून संदिपान भुमरे यांचे पुत्र विलास, जोगेश्वरी पूर्वमधून खासदार रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनिषा, दर्यापूरमधून आनंदराव अडसूळ यांचे चिरंजीव अभिजीत, सांगली जिल्ह्यातून अनिल बाबर यांच्या मुलाला संधी देण्यात आली. तसेच मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण हे राजापूरमधून उमेदवार आहेत.

ठाकरेंची पुढची पिढही राजकारणात

शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाने उद्धव ठाकरेंचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. तर वांद्रे पूर्व मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांचे मावसबंधू वरुण सरदेसाई यांना रिंगणात उतरवले आहे.

तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना माहिम विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे. जर आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांचा विजय झाला तर विधानसभेत दोन ठाकरे दिसू शकतात.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maharashtra assembly election 2024 all political parties give tickets to relatives political nepotism kvg

First published on: 24-10-2024 at 21:38 IST
Show comments