Byculla Assembly Election 2024 : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय घडामोडींना पाहायला मिळाल्या. राज्यातील सर्वच दिग्गज नेत्यांनी मतदारसंघात पुन्हा एकदा आपलं वर्चस्व निर्माण करण्यासाठी कंबर कसली होती. अनेक नेत्यांनी मतदारसंघात दौरे केले होते मतदारसंघातील कामांचा आढावा घेत निवडणुकीची रणनीती आखण्यात आली होती. खरं तर २०२४ ची विधानसभा निवडणूक अनेक नेत्यांसाठी प्रतिष्ठेची मानली जाते. मुंबईतील भायखळा विधानसभा मतदारसंघही राजकारणात चर्चेस्थानी राहिला. या मतदारसंघामधून शिवसेनेच्या (शिंदे गट) यामिनी जाधव या विद्यमान आमदार होत्या. दरम्यान, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षातील फुटीनंतर राज्याच्या राजकारणाची समीकरणे बदलली. याचा परिणाम स्थानिक राजकारणातही पाहायला मिळतो. राजकीय समीकरणात झालेल्या बदलानंतर आता २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भायखळा मतदारसंघात ठाकरे गटाने बाजी मारली आहे.
खरं तर एकेकाळी भायखळा विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा (Congress) बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. मात्र, काँग्रेसच्या या बालेकिल्ल्याला नंतर खिंडार पडले. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ‘एआयएमआयएम’चे वारिस पठाण या मतदारसंघातून आमदार झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या यामिनी जाधव यांनी ‘एआयएमआयएम’च्या वारिस पठाण यांचा पराभव केला आणि त्या आमदार झाल्या. शिवसेनेच्या (शिंदे गट) यामिनी जाधव यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबई (Mumbai) लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, या निवडणुकीत यामिनी जाधव (Yamini Jadhav) यांना भायखळ्यातूनच पिछाडी मिळाली आणि त्यांचा पराभव झाला. यानंतर विधानसभेची निवडणूक यामिनी जाधव यांनी लढवली. या निवडणुकीत यामिनी जाधवांचा पराभव, तर ठाकरे गटाचे मनोज जामसुतकर यांचा विजय झाला.
दरम्यान, भायखळा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत झाली. मात्र, भायखळा विधानसभा मतदारसंघात मुस्लीम मतदार, मराठी मतदार आणि अमराठी मतदारांची संध्या जास्त आहे. त्यामुळे हे मतदार कोणाला कौल देतात? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना (शिंदे) पक्षाच्या यामिनी यशवंत जाधव या ५१,१८० मते मिळवून विजयी झाल्या होत्या. तर एमआयएमचे वॉरिस युसुफ पठाण यांना दुसऱ्या क्रमांकाची ३१,१५७ मते मिळाली होती. तसेच काँग्रेसचे अण्णा मधु चव्हाण २४,१३९ मते मिळाली होती. तसेच अखिल भारतीय सेनेच्या गीता अजय गवळी यांना १०,४९३ मते मिळाली होती तर नोटाला २,७९१ मतदान पड़ले होते.
२०१९ च्या मतदारांची संख्या
भायखळा विधानसभा मतदारसंघात २०१९ च्या आकडेवारीनुसार, पुरुष मतदारांची संख्या १,२३,६१६ तर महिला मतदारांची संख्या १,०३,५२० एवढी आहे. तसेच एकूण मतदारांची संध्या २,२७,१४३ एवढी होती.
२०२४ च्या निवडणुकीत किती टक्के मतदान झाले?
विधानसभेला भायखळा मतदारसंघात महेश जामसुतकर (शिवसेना ठाकरे) विरुद्ध यामिनी जाधाव (शिवसेना शिंदे) अशी लढत पहायला मिळाली. या निवडणुकीत भायखळा मतदारसंघात अंदाजे ४५ टक्क्याच्या आसपास मतदान झाले आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने मुंबईतील सर्वच मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी मोठा प्रयत्न देखील केला.