Maharashtra Assembly Election 2024 Candidate Full List : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. विधानसभेच्या (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडलं. आता या निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. खरं तर या निवडणुकीकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे. या निवडणुकीत प्रामुख्याने महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना पाहायला मिळाला. त्यामुळे आता निकालानंतर राज्यातील जनता कोणाला कौल देते हे पाहणं महत्वाचं असणार आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्यात विविध विभागानुसार कोणत्या पक्षाने किती जागा लढवल्या? कोणत्या पक्षाचे उमेदवार कोण? या विषयीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात.
विभागनिहाय मतदारसंघ आणि उमेदवारांची यादी
क्रंमाक | विदर्भ (नागपूर जिल्हा) मतदारसंघ | महाविकास आघाडी | महायुती |
१ | काटोल | सलिल देशमुख (राष्ट्रवादी-एसपी) | चरनसिंग ठाकूर (भाजपा) |
२ | सावनेर | अनुजा सुनील केदार (काँग्रेस) | आशीष देशमुख (भाजपा) |
३ | हिंगणा | रमेश बंग (राष्ट्रवादी- एसपी) | समीर मेघे (भाजपा) |
४ | उमरेड | संजय मेश्राम (काँग्रेस) | सुधीर पारवे (भाजपा) |
५ | नागपूर दक्षिण पश्चिम | प्रफुल गुदधे (काँग्रेस) | देवेंद्र फडणवीस (भाजपा) |
६ | नागपूर दक्षिण | गिरीश पांडव (काँग्रेस) | मोहन मते (भाजपा) |
७ | नागपूर पूर्व | दुनेश्वर पेठे (राष्ट्रवादी-एसपी) | कृष्णा खोपडे (भाजपा) |
८ | नागपूर मध्य | बंटी शेळके (काँग्रेस) | प्रवीण दटके (भाजपा) |
९ | नागपूर पश्चिम | विकास ठाकरे (काँग्रेस) | सुधाकर कोहळे (भाजपा) |
१० | नागपूर उत्तर | नितीन राऊत (काँग्रेस) | मिलिंद माने (भाजपा) |
११ | रामटेक | विशाल बरबटे (शिवसेना- ठाकरे) | आशीष जैस्वाल (शिवसेना) |
१२ | कामठी | सुरेश भोयर (काँग्रेस) | चंद्रशेखर बावनकुळे (भाजपा) |