Maharashtra Assembly Election 2024 : “आम्ही न्यायाच्या प्रतिक्षेत होतो, पण…”, निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच आदित्य ठाकरेंची पोस्ट चर्चेत!

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Date : निवडणुका जाहीर झाल्याने आता जागा वाटपाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Date| Maharashtra Assembly Election 2024 Date
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ वेळापत्रक (फोटो – आदित्य ठाकरे/X)

ECI on Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Date : राज्यात विधानसभेच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर या विधानसभेकडे सर्वांचं लक्ष होतं. आजपासून राज्यात आचारसंहिता लागू झाली असून सर्वच पक्षांनी जागावाटपाच्या मुद्यावर जोर दिला आहे. दरम्यान, शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे युवा आमदार आदित्य ठाकरे यांनी निवडणूक कार्यक्रमाच्या घोषणानंतर एक्स पोस्ट केली आहे.

“महाराष्ट्रातील जनता ज्या क्षणाची वाट पाहत होती ती वेळ आता आली आहे. २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. राज्यात बदल घडवण्यासाठी, शिंदे-भाजपा सरकार हद्दपार करण्यासाठी निवडणूक जाहीर झाली आहे. आम्ही न्यायाच्या प्रतिक्षेत होतो, पण आता मतदारच आम्हाला न्याय देऊ शकतात”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

हेही वाचा >> Maharashtra Assembly Election 2024 : “…म्हणून महाराष्ट्रातील निवडणुका महत्त्वाच्या”, निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच काँग्रेसची भाजपावर टीका

महाराष्ट्रात कधी होणार निवडणूक?

महाराष्ट्रात एका टप्प्यात निवडणूक घेतली जाणार आहे. २० नोव्हेंबरला एका टप्प्यात निवडणूक घेतली जाणार आहेत. तर २३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ही माहिती दिली आहे.

राजीव कुमार यांनी नेमकं काय म्हटलं आहे?

आम्ही काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचा दौरा केला होता. त्या दौऱ्यादरम्यान आम्ही निवडणुकीची तयारी योग्य प्रकारे झाली आहे की नाही? याची माहिती आम्ही घेतली. लोकसभा निवडणुकीच्या (Maharashtra Vidhan Sabha Election ) वेळी काही गोष्टी घडल्या होत्या त्या टाळण्यासाठी आम्ही आता पूर्णपणे प्रयत्न करत आहोत. लोकांची मतदानासाठी रांग लागते त्यावेळी काही अंतरावर खुर्ची किंवा बाक रचण्याचा सल्ला आम्ही दिला आहे. ८५ वर्षे आणि त्यावरच्या मतदारांना घरुन मतदान करता येणार आहे. तसंच या मतदारांच्या गोपनीयतेची काळजी आम्ही घेऊ त्यासंदर्भातली पूर्ण व्यवस्था आम्ही केली आहे असंही राजीव कुमार यांनी स्पष्ट केलं.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maharashtra assembly election 2024 declare aditya thackeray first reaction sgk

First published on: 15-10-2024 at 17:20 IST
Show comments