Uddhav Thackeray Shivsena vs Eknath Shinde Shivsena Exit Poll Updates: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे मतदान आज (२० नोव्हेंबर) पार पडल्यानंतर लगेचच एक्झिट पोल्सचे अंदाज यायला सुरुवात झाली. जवळपास सर्वच पोल्सनी महायुतीची सत्ता पुन्हा येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला. महाविकास आघाडीही बहुमतापासून किंचित लांब असल्याचे दिसत आहे. त्यामुळे प्रत्यक्ष निकाल आल्यानंतरच निकालाचे खरे चित्र समजू शकेल. मात्र तत्पूर्वी एक्झिट पोल्सनी पक्षनिहाय जे अंदाज व्यक्त केले आहेत. त्यावरून बऱ्याच एक्झिट पोल्सनुसार शिवसेना (शिंदे) पक्षाने बाजी मारल्याचे दिसून येत आहे.
मुंबईत ११ जागांवर दोन्ही शिवसेनेचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात उभे होते. तर राज्यात तब्बल ५१ जागांवर शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना पाहायलमा मिळणार आहे. एक्झिट पोल्सचे हे केवळ अंदाज असले तरी खरा निकाल २३ नोव्हेंबर रोजीच कळू शकेल.
काय आहेत एक्झिट पोलचे अंदाज?
इलेक्टोरल एज
शिवसेना (शिंदे) – २६
शिवेसना (ठाकरे) – ४४
चाणक्य
शिवसेना (शिंदे) – ४८
शिवेसना (ठाकरे) – ३५
मॅट्रिझ
शिवसेना (शिंदे) – ३७-४५
शिवेसना (ठाकरे) – २९-३९
पोल डायरी
शिवसेना (शिंदे) – २७-५०
शिवेसना (ठाकरे) – १६-३५
लोकाशाही-मराठी रुद्र
शिवसेना (शिंदे) – ३०-३५
शिवेसना (ठाकरे) – ३९-४३
विधानसभा निवडणुकीत शिवसेना (ठाकरे) पक्षाने ९५ जागांवर निवडणूक लढवली होती. तर शिवसेना (शिंदे) पक्षाच्या वाट्याला ८१ जागा आल्या होत्या. एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीमध्ये ९ जागा अधिक मिळाल्या होत्या. तरीही बऱ्याच एक्झिट पोल्समध्ये शिवसेना शिंदे गट पुढे दिसत आहे.