Family First in Mahayuti and Maha Vikas Aghadi Candidates List : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीला ( Maharashtra Assembly Election 2024 ) अवघे २६ दिवस बाकी आहेत. जागावाटप आणि याद्या यांच्या चर्चा रंगल्या आहेत. एरवी घराणेशाही आमच्या पक्षात नाही असं म्हणणाऱ्या जवळपास सगळ्याच पक्षांनी म्हणजेच सत्ताधारी असोत की विरोधक तिकिट वाटपात मस्तपैकी घराणेशाही जपली आहे. कुठे मुलाला, कुठे पत्नीला तर कुठे भावाला तिकिट देऊन गोंजारण्यात आलं आहे. घराणेशाही नाही हे भाषणात शोभून दिसणारं वाक्य ठरलं आहे. प्रत्यक्षात सर्वपक्षीय नेत्यांची कृती वेगळीच आहे. आपण जाणून घेऊ याविषयीची माहिती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार पक्ष)
अजित पवारांनी विधानसभा निवडणुकीसाठी ( Maharashtra Assembly Election 2024 ) ३८ नावं आत्तापर्यंत जाहीर केली आहे. यामध्ये खासदार सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे यांना श्रीवर्धनमधून विधानसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. तर तटकरेच्या मुलाला भाजपाकडून उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा आता रंगली आहे. म्हणजे एकाच घरात दोन तिकिटं कन्फर्म आहेत. तर अजित पवारांनी मध्यंतरी विधान परिषदेवर छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांना आमदार म्हणून नियुक्त केलं आहे.
गणेश नाईक भाजपाकडून मुलगा शरद पवारांच्या पक्षाकडून
गणेश नाईक हे मुंबई भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना भाजपाने विधानसभेसाठी ( Maharashtra Assembly Election 2024 ) तिकिट दिलं आहे. तर संदीप नाईक यांना बेलापूरमध्ये तिकिट न दिल्याने त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत तिथून तिकिट मिळवल्याचं निश्चित मानलं जातं आहे. मुलगा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष तर वडील गणेश नाईक भाजपाकडून असं चित्र नवी मुंबईत आहे.
नारायण राणेंची दोन्ही मुलं वेगवेगळ्या पक्षातून उमेदवार
नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी २३ ऑक्टोबरला एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. एकनाथ शिंदेंनी त्यांची उमेदवारी जाहीर केली आहे. तर नितेश राणे हे भाजपाकडून लढणार आहेत. पुन्हा एकाच घरात दोन तिकिटं विधानसभा निवडणुकीसाठी ( Maharashtra Assembly Election 2024 ) कन्फर्म झाली आहेत.
अशोक चव्हाण यांच्या कन्येला तिकिट
भाजपाने ९९ जागांची जी पहिली यादी जाहीर केली त्यात भाजपाचे खासदार अशोक चव्हाण यांच्या कन्येला म्हणजेय श्रीजया चव्हाण यांना भोकर या मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. घराणेशाहीला कायम विरोध करणाऱ्या भाजपाने या मतदारसंघात घराणं पाहूनच तिकिट दिलं आहे.
उमेदवाराचं नाव | पक्ष | कुणाशी नातं? |
आदिती तटकरे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) | सुनील तटकरेंच्या कन्या |
आदित्य ठाकरे | शिवसेना (उद्धव ठाकरे) | उद्धव ठाकरेंचे पुत्र |
अमित ठाकरे | मनसे | राज ठाकरेंचे पुत्र |
संतोष दानवे | भाजपा | रावसाहेब दानवेंचे पुत्र |
उद्धव ठाकरेंकडून आदित्य ठाकरेंना तिकिट
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने वरळी मतदार संघातून ( Maharashtra Assembly Election 2024 ) आदित्य ठाकरेंना उमेदवारी जाहीर केली आहे. आदित्य ठाकरे हे मागच्यावेळीही वरळीतून निवडून आले होते. यावेळी त्यांच्या समोर मनसेच्या संदीप देशपांडेंचं आव्हान असणार आहे.
राज ठाकरेंनी अमित ठाकरेंना दिलं तिकिट
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही अमित ठाकरेंना तिकिट दिलं आहे. अमित ठाकरे माहीम मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. त्यांच्या विरोधात एकनाथ शिंदेंचे विश्वासू सदा सरवणकर यांना तिकिट देण्यात आलं आहे. तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनेही माहीममधून उमेदवार दिला आहे.
उमेदवाराचं नाव | पक्ष | कुणाशी नातं? |
संदीप नाईक | राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) | भाजपा नेते गणेश नाईक यांचे पुत्र |
विलास भुमरे | शिवसेना (एकनाथ शिंदे ) | संदीपान भुमरे यांचे पुत्र |
निलेश राणे | शिवसेना (एकनाथ शिंदे ) | नारायण राणे यांचे पुत्र |
श्रीजया चव्हा | भाजपा | अशोक चव्हाण यांच्या कन्या |
आशिष शेलार यांच्या भावाला तिकिट
आशिष शेलार हे वांद्रे पश्चिममधून निवडणूक लढणार आहेत. तर त्यांच्या भावालाही यंदा तिकिट दिलं जाईल ही चर्चा रंगली आहे. तसं घडल्यास या शेलारांच्या घरातही दोन तिकिटं कन्फर्म होतील.
संदीपान भुमरेंच्या मुलाला तिकिट
संदीपान भुमरे यांनी लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजी नगरमधून विजय मिळवला आणि ते खासदार झाले आता विधानसभा निवडणुकीत विलास संदीपान भुमरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विलास भुमरे हे संदीपान भुमरेंचे पुत्र आहेत. त्याच प्रमाणे उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांना राजापूरमध्ये तिकिट देण्यात आलं आहे.
रावसाहेब दानवेच्या दुसऱ्या मुलाला तिकिट
रावसाहेब दानवे हे लोकसभा निवडणुकीत अपयशी ठरले होते. त्यानंतर आता विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यावर भाजपाने त्यांचा मुलगा संतोष दानवेंना भोकरदनमधून उमेदवारी जाहीर केली आहे. एकंदरीत या सगळ्या जागांवर नजर टाकली तर घराणेशाही ही सर्वपक्षीय आहे हेच दिसून येतं आहे.