Maharashtra Assembly Election 2024 Mahavikas aghadi Mahayuti Candidates : महाराष्ट्राची विधासभा निवडणूक अवघ्या २३ दिवसांवर येऊन ठेपली असून या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निवडणूक आयोगाने २९ ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिली आहे. निवडणुकीचा अर्ज भरण्यास आता केवळ काहीच तास बाकी आहेत. अद्याप महाविकास आघाडी व महायुतीचा जागावाटपाचा घोळ काही मिटलेला नाही. तसेच अद्याप महाविकास आघाडी किंवा महायुतीने सर्व उमेदवार जाहीर केले नाहीत. त्यामुळे मविआ व महायुतीचा जागावाटपाचा, उमेदवार निवडीचा तिढा कधी सुटणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे. काँग्रेस, शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) मनसे व इतर पक्षांनी रविवारी उमेदवारांच्या अनेक याद्या जाहीर केल्या. मात्र अजूनही युती किंवा आघाडी सर्व उमेदवार जाहीर करू शकलेली नाही.
जागावाटप व उमेदवार जाहीर करण्याच्या बाबतीत महाविकास आघाडीने महायुतीला मागे टाकल्याचं दिसत आहे. कारण मविआने महायुतीपेक्षा जास्त उमेदवार जाहीर केले आहेत. दरम्यान, ज्या ज्या जागांवरील घोळ मिटलेला नाही, तिथे महायुती व मविआमधील दोन-दोन पक्षांमधील उमेदवारांनी अपक्ष अर्ज दाखल केले आहेत. यांच्यापैकी काहीजण आपले अर्ज मागे घेऊ शकतात. ३० ऑक्टोबर २०२४ रोजी उमेदवारी अर्जांची पडताळणी केली जाईल. तर, ४ नोव्हेंबर २०२४ पर्यंत उमेदवार आपले अर्ज मागे घेऊ शकतात.
महाविकास आघाडीने आतापर्यंत २५९ जागांवरील उमेदवार जाहीर केले आहेत. मविआ नेते अद्याप २९ जागांवरील तिढा सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर, महायुतीने केवळ २३५ उमेदवार जाहीर केले असून ४९ जागांवरील तिढा कायम आहे. महायुतीचे नेते हा तिढा सोडवून आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत उमेदवार जाहीर करतील अशी अपेक्षा आहे.
हे ही वाचा >> Supriya Sule : भाऊबीजेला अजित पवारांची वाट बघणार का? सुप्रिया सुळेंचं उत्तर, “प्रेम असतं तेव्हा…”
महाविकास आघाडीची स्थिती काय?
c
क्र. | पक्ष | जागा |
1 | काँग्रेस | १०० |
2 | शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) | ८३ |
3 | राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) | ७६ |
4 | एकूण जाहीर जागा | २५९ |
5 | बाकी जागा | २९ |
6 | एकूण जागा | २८८ |
हे ही वाचा >> Ajit Pawar : ‘मी केलेली चूक त्यांनी करायला नको होती’; अजित पवारांचं बारामतीत शरद पवारांबाबत मोठं विधान
महायुतीची स्थिती काय?
क्र. | पक्ष | जागा |
1 | भाजपा | १२१ |
2 | शिवसेना (शिंदे) | ६५ |
3 | राष्ट्रवादी (अजित पवार) | ४९ |
4 | एकूण जाहीर जागा | २३५ |
5 | उर्वरित जागा | ४३ |
6 | एकूूण जागा | २८८ |