Maha Vikas Aghadi Seat Sharing Live Updates : विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधानसभेसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे, तर २३ नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच पक्षांचे नेते जोरदार कामाला लागले आहेत. महायुती, महाविकास आघाडीतील पक्षांसह इतर सर्वच पक्षांच्या उमेदवारांच्या याद्या जाहीर झाल्या आहेत. यातच आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीत चार मोठ्या नेत्यांचा पक्ष प्रवेश झाला आहे. पक्ष प्रवेश होताच अजित पवारांकडून त्यांना उमेदवारीही जाहीर करण्यात आली आहे. आज अजित पवारांकडून सात उमेदवारांची घोषणा करण्यात आली. तसेच इतरही अनेक राजकीय घडामोडी आज पाहायला मिळतील. या सर्व घडामोडींवर आपलं लक्ष असेल. राज्यातील राजकीय व सामाजिक घडामोडींचा वेध आपण या लाइव्ह न्यूज ब्लॉगद्वारे जाणून घेणार आहोत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Maharashtra Breaking News Live Today, 25 October 2024 : अजित पवारांच्या राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर, कोणाला मिळाली संधी?
सोलापूर : एका गंभीर गुन्ह्याच्या तपासात कच्चे दुवे सोडण्यासाठी आणि अटकेतील आरोपीला लवकरात लवकर जामीन होण्याच्या अनुषंगाने अनुकूल मदत करण्यासाठी संबंधित आरोपीच्या वडिलांकडे पाच लाखांची लाच मागितली आणि तडजोडीत दोन लाखांची लाच स्वीकारण्यास संमती दिल्याप्रकरणी एका पोलीस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.
नागपूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची लगबग सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी सुरू केली. भाजपने तर उमेदवारी यादी जाहीर करण्यात आघाडी घेतली तसेच उमेदवारी अर्ज ही भरणे सुरू केले. नागपूर भाजपचे सत्ता केंद्र आहे. शुक्रवारी भाजपाचे सर्वात प्रभावशाली नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अर्ज दाखल केले.
विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यामुळे राज्यात अनेक घडामोडी घडत आहेत. यातच पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी करत कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. आज पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पुणे पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान तबब्ल १३८ कोटी रुपये किमतीचा सोन्याने भरलेला ट्रक पकडला आहे. हे कोट्यावधीचे सोने कुठे चालले होते? याबाबतची अधिक चौकशी पोलिसांकडून करण्यात येत असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी पुण्यातील खेड-शिवापूर परिसरातही एकगाडीमधून पाच कोटी रोख रक्कम जप्त करण्यात आली होती.
पुणे : पुणे जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी ८ हजार ४१७ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आलेली आहेत. त्यापैकी ३८ मतदान केंद्रे दुर्गम ठिकाणी असून, त्या ठिकाणी संप्रेषण सुविधा सक्रिय नाही. त्यामुळे जिल्ह्यात दूरसंचार सेवा देणाऱ्या कंपन्यांनी दुर्गम भागातील मतदान केंद्रांवर संप्रेषण सुविधा उपलब्ध करण्याची सूचना उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा दळणवळण आराखड्याच्या समन्वय अधिकारी शमा पवार यांनी केली.
डोंबिवली : पादचाऱ्यांनी मोटार कार चालकाने भोंगा वाजविल्याच्या रागातून कार चालकाच्या वाहनाची रात्रीच्या वेळेत तोडफोड केली. त्यानंतरच्या वादातून एका इसमाने मोटार कार चालकाला पिस्तुलचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे.
मुंबई :आरोग्य विभागाच्या माध्यमातून विविध पातळ्यांवर कुष्ठरोग निर्मूलनासाठी होणाऱ्या प्रयत्नांमधून तसेच कुष्ठरुग्णांना करण्यात येणाऱ्या सातत्यपूर्ण औषधोपचारामुळे राज्यातील कुष्ठरुग्णांच्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येत आहे.
डोंबिवली : येथील एमआयडीसीतील कावेरी चौकातील पदपथ, रस्ते अडवून उभारण्यात आलेल्या टपऱ्या, या चौकातील फेरीवाले आणि रस्त्याच्या दुतर्फा असलेली दुचाकी, चारचाकी वाहने यामुळे कावेरी चौक हा अपघात प्रवण क्षेत्र झाला आहे.
नागपूर : नैराश्येतून आत्महत्येचा विचार करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे टेलिमानस हेल्प लाईन क्रमांकावर आलेल्या दूरध्वनींच्या विश्लेषणावरून समोर आले आहे. या हेल्पलाईनवर कोल्हापूर आणि पुण्यातून सर्वाधिक दूरध्वनी आले. यात नागपूरचा क्रमांक नववा आहे.
पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणात बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल याच्या मुलासह दोन मित्रांच्या रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणी ससून रुग्णालयाच्या न्यायवैद्यक विभागाचे तत्कालीन प्रमुख डॉ.अजय तावरे, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर, शिपाई अतुल घटकांबळे यांच्याविरुद्ध फौजदारी खटला चालविण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली.
कल्याण-डोंबिवलीत फटाके विक्रीच्या मंचांनी अडविले वर्दळीचे रस्ते, पदपथ
कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरातील मुख्य वर्दळीचे रस्ते, पदपथांवर बहुतांशी विक्रेत्यांनी कल्याण डोंबिवली पालिकेच्या परवानग्या न घेता फटाके विक्रीचे मंच उभारले आहेत.
राजकारणाची आवड असलेला कार्यकर्ता सुरुवातीच्या काळात कोणतेही पद पदरात पाडण्यासाठी धडपडत असतो. राजकीय महत्त्वाकांक्षा असलेला हा कार्यकर्ता पहिल्यांदा प्रयत्न करतो तो नगरसेवक होण्याचा. एकदा का नगरसेवक पदाची पायरी चढली की त्याची महत्त्वाकांक्षा वाढत जाते. सत्ताधारी पक्षाचा नगरसेवक असेल, तर तो महापौरपदाची माळ गळ्यात पडण्याचे स्वप्न उराशी बागळतो.
विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीसह इतर काही पक्षांनी आपल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या आहेत. आता काँग्रेस पक्षाची दुसरी यादी कधी येणार? याबाबत नाना पटोले यांनी माहिती दिली आहे. आज संध्याकाळपर्यंत काँग्रेस पक्षाची दुसरी यादी याहीर होणार असल्याची माहिती नाना पटोले यांनी दिली.
पनवेल ः नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत असणा-या एका महिला पोलीसाने पतीच्या वेळोवेळीच्या वागणूक आणि टोमण्यांना वैतागूण आत्महत्येचा मार्ग निवडला.
पुणे : वैद्यकीय पदवी नसताना वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या तोतया डाॅक्टरविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
मुंबई : ‘बेस्ट’उपक्रमातील दिव्यांग चालकांना पर्यायी काम नाकारणाऱ्या बेस्टचे महाव्यवस्थापक आणि संबंधित अधिकाऱ्यांना औद्योगिक न्यायालयाने समन्स जारी केले आहे.
कराड : खासदार शरद पवारांना राजकारणातील फोडाफोडीचे नोबेल पारितोषिकच दिले जावे असा टोला लगावताना, शरद पवारांचा पूर्वी बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्व आठही जागांवर महायुतीचेच उमेदवार मताधिक्याने विजयी होतील असा ठाम दावा खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
पुणे : मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नवले पूल परिसरात देहविक्रय करणाऱ्या आठ महिलांविरुद्ध अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. महिलांकडून अश्लील हावभाव करण्यात येत असून, या भागातील रहिवाशांना त्रास होत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे करण्यात आल्या होत्या.
अमरावती : अपेक्षेनुसार अमरावती विधानसभा मतदारसंघातून माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांना काँग्रेसची उमेदवारी जाहीर झाली आणि तब्बल पंधरा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर काँग्रेसच्या उमेदवारीचे त्यांचे वर्तुळ पूर्ण झाले. त्यांचा राजकीय प्रवास नाट्यपूर्ण आहे. २००९ मध्ये उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर त्यांनी केलेले बंड देशभर गाजले होते.
वर्धा : काँग्रेसकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली. त्यात वर्धा जिल्ह्यात एकमेव उमेदवार जाहीर झाले. माजी मंत्री व देवळीचे आमदार रणजित कांबळे हे आता लढत देण्यास परत सज्ज झाले आहे. १९९९ पासून ते आमदार आहेत. आमदारकीची २५ वर्ष त्यांनी पूर्ण केलीत. सलग पाच वेळा निवडून आलेल्या कांबळे यांनी आता सहाव्यांदा संधी घेतली. विदर्भातील ते काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार ठरतात.
“महाविकास आघाडीतील जाहीर झालेल्या उमेदवारांच्या एखाद्या दुसऱ्या जागेबाबत पुन्हा चर्चा होऊ शकते. एखाद्याच्या नावात एडीटींग (बदल) होऊ शकते. कॉग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार), आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये आमच्या एखाद्या दुसऱ्या जागेबाबत पुन्हा एकदा चर्चा होऊ शकते. रामटेकच्या जागेवर शिवसेनेचा विद्यमान आमदार आहे. त्यामुळे काय करायचं ते आम्ही निर्णय घेणार आहोत”, असं मोठं विधान संजय राऊत यांनी केलं.
विधानसभेसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे, तर २३ नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज थोड्या वेळात उमेदवारी अर्ज भरणार आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याच्याआधी देवेंद्र फडणवीस यांचं त्यांच्या कुटुंबियांकडून औक्षण करण्यात आलं आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी आज अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये सात उमेदवारांचा समावेश आहे. यामध्ये वांद्रे पूर्वमधून झिशान सिद्दिकी, इस्लामपूरमधून निशिकांत पाटील,तासगावमधून संजयकाका पाटील, लोहा कंधारमधून प्रताप चिखलीकर, वडगाव शेरीमधून सुनील टिंगरे, शिरुर हवेलीमधून ज्ञानेश्वर कटके, अनुशक्तीनगरमधून सना मलिक यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक – २०२४ साठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं अधिकृत उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात येत आहे. मी सर्व उमेदवारांना त्यांच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.िजयी_भव_महाराष्ट्रवादी#maharashtraelection2024 pic.twitter.com/snydOBpujF
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) October 25, 2024
अजित पवारांच्या राष्ट्रवादीत चार मोठ्या नेत्यांचा प्रवेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये आज चार मोठ्या नेत्यांनी पक्षप्रवेश केला. यामध्ये सांगलीचे माजी खासदार संजय काका पाटील, आमदार झिशान सिद्दिकी, सांगलीचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील आणि माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा समावेश आहे.