Anil Deshmukh on Devendra Fadnavis : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्या पुस्तकातील काही पानं पोस्ट करुन देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख टरबूजा असा केला आहे. देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांची तुलना उंदराशी केली आहे. तर दुसरीकडे सचिन सावंत यांनी अंधेरी पश्चिममधून दिलेली उमेदवारी नाकारली आहे. त्यांनी वांद्रे पूर्व म्हणजेच शिवसेना ठाकरे गटाचे वरुन सरदेेसाई यांना जिथून तिकिट दिलं गेलं आहे तो विधानसभा मतदारसंघ लढवण्यास इच्छुक असल्याचं म्हटलं आहे. तर संजय राऊत यांनी एका मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांच्याशी आमची दुश्मनी नाही असं विधान केलं आहे. निवडणूक काळात या सगळ्या घडामोडी घडत आहेत. यावर आपलं लक्ष असणार आहे लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून.
अनिल देशमुख यांची देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोचरी टीका, सचिन सावंत उमेदवारीवर नाराज यासह महत्त्वाच्या घडामोडी
संगमनेर : स्वच्छ सुसंस्कृत म्हणवून घेणाऱ्या दडपशाहीचा चेहरा आता राज्याला समजला आहे. भगिनीना पुढे करून राजकारण करण्याची वेळ तुमच्यावर आली. ठेकेदाराच्या जीवावर सामान्य माणसांना खेटलात, आता गाठ आमच्याशी आहे. धांदरफळ घटनेमागील सूत्रधार शोधल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिला.
देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय नेत्यांना फटाक्यांची उपमा दिली आहे. कुणाला काय म्हणाले आहेत ते चर्चेत आहे.
कुणाला कुठल्या फटक्यांची उपमा?लक्ष्मीबॉम्ब – राज ठाकरे<br/>फुसका लवंगी फटाका- संजय राऊत<br/>फुलबाजी – फुलबाजी सगळेच आहेत, एक काही नाव घेता येणार नाही.
रॉकेट- आमचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे
भुईचक्र- सगळ्या पक्षांत जे फिरतात ते भुईचक्र, मी एक नाव सांगत नाही.
नाग गोळी-हा लहान मुलांचा फटाका आहे मी नाव घेत नाही पण युवराज.
असं म्हणत देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी प्रत्येक नेत्याचं नाव त्या त्या फटाक्याला दिलं आहे.
हरियाणाबाबत सगळे पोलपंडीत सांगत होते भाजपाचा दारुण पराभव होणार. पण भाजपाला प्रचंड बहुमत मिळाली. त्यामुळे सकाळी टीव्हीसमोर बोलणारे दुपारी काय बोलू या संभ्रमात पडले होते. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला काही प्रमाणात यश मिळवता आलं. फेक नरेटिव्हच्या भरवशावर त्यांनी यश मिळवलं. आमच्यात फक्त पॉईंट ३ पर्सेंटचा फरक होता. फेक नरेटिव्ह आम्ही उघडा पाडला. लोकांच्या लक्षात आलं की ते खोटं बोलत होते. राहुल गांधींनी आरक्षण कसं संपवणार याचा फॉर्म्युला सांगितला. नाना पटोले त्यांचीच रि ओढत आहेत. तसंच लोकसभेच्या निवडणुकीत व्होट जिहाद हा महत्त्वाचा घटक होता. सगळी धार्मिक स्थळं आणि धर्मगुरु व्होट जिहादचा नारा देत होते. आता याचा फायदा होणार नाही. तसंच व्होट जिहादमुळे बहुसंख्य समाजाच्या लक्षात आलं की मोदी नकोत म्हणून व्होट जिहाद करणार असेल तर मतपेटीतून उत्तर देता येईल. त्यामुळे फेक नरेटिव्ह आता चालणार नाही. असं देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) म्हणाले. एनडीटीव्ही मराठी कॉनक्लेव्हमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
यवतमाळ – दिग्रस मतदारसंघात शिवसेना उबाठाने शनिवारी जाहीर केलेली उमेदवारी १२ तासात मागे घेवून हा मतदारसंघ काँग्रेसला सोडला. आता येथून काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे हे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढणार असले तरी त्यांच्यासमोर अनेक आव्हानांचे डोंगर आहे.
गडचिरोली : उमेदवारीसाठी काँग्रेसमध्ये सुरु असलेला तिढा सुटला असून गडचिरोलीतून मनोहर पोरेटी यांना संधी देण्यात आली आहे. माजी खासदार मारोतराव कोवासे यांचे पुत्र विश्वजित कोवासे आणि मनोहर पोरेटी यांच्यामध्ये चुरस होती. अखेर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या जवळचे समजले जाणारे पोरेटी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. तर आरमोरीचा तिढा कायम आहे.
छत्रपती संभाजीनगर : नांदेड लोकसभेसाठी उमेदवार म्हणून इच्छूक असल्याची वावडी उठवून माजी खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद (पूर्व )मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे ठरवले आहे. या मतदारसंघातून भाजपचे नेते व मंत्री अतुल सावे २०१९ मध्ये विजयी झाले होते. या वेळी या मतदारसंघात कॉग्रेसनेही निवृत्त शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख यांना उमेदवारी दिली आहे.
सविस्तर वाचा
छत्रपती संभाजीनगर : जालना लोकसभा मतदारसंघातून माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा पराभव झाल्यांनतर त्याचे चरंजीव संतोष दानवे यांना भोकरदन मतदारसंघातून तर त्यांची मुलगी संजना जाधव यांना कन्नड मतदारसंघातून उमेदवारी देण्याचा निर्णय महायुतीमध्ये घेण्यात आला आहे.कन्नड लोकसभा मतदारसंघाचे आमदार उदयसिंह राजपूत यांच्या विरोधात त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.
देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत विचारलं असता संजय राऊत म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांच्याशी आमची वैयक्तिक दुश्मनी नाही. ते केवळ आमचे राजकीय शत्रू आहेत, असे राऊत यांनी म्हटले. महाराष्ट्राला एक राजकीय संस्कृती आहे. आम्ही कोणाशीही व्यक्तिगत वैर करत नाही. उद्धव ठाकरे यांचं फडणवीसांना उद्देशून असलेलं, ‘एकतर तू तरी राहशील, नाहीतर मी तरी राहीन’, हे वक्तव्य केवळ राजकारणापुरतं मर्यादित होतं, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले. मी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर मी कधीही चहासुद्धा प्यायला नाही. मी एक कडवट शिवसैनिक आहे”, असे सांगत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी पडद्यामागून चर्चा सुरु असल्याची शक्यताही फेटाळून लावली.
Buldhana Assembly Election 2024बुलढाणा : नव्वदीच्या दशकात बुलढाण्यात बऱ्यापैकी स्थिरावलेली शिवसेना कालांतराने जिल्ह्यातही चांगलीच फोफावली. मात्र, जिल्ह्याच्या इतिहासात शिवसेनेने मोठ्या निवडणुकांत महिलांना कधीच संधी दिली नाही. आता फुटीनंतर का होईना, अखेर महिलेला उमेदवारी देऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने ‘स्त्री दाक्षिण्य’ दाखविले. ठाकरे गटाने बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून जयश्री शेळके यांना उमेदवारी देऊन एक विक्रम केला आहे.
गोंदिया : काँग्रेसने अनुसूचित जनजातीकरिता राखीव आमगाव-देवरी विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार सहेसराम कोरेटी यांचे तिकीट कापून त्यांच्या ऐवजी गोंदिया जिल्हा परिषदेचे माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार पुराम यांना काँग्रेसची उमेदवारी जाहीर केली आहे. तर, अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघातून तिरोड्याचे माजी आमदार व काँग्रेसचे गोंदिया जिल्हाध्यक्ष दिलीप बनसोड यांना संधी देण्यात आली आहे.
Bhandara Assembly Election 2024भंडारा : काँग्रेसने भंडारा विधानसभा मतदारसंघात प्रचंड विरोध असतानाही पूजा ठवकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघांत सर्वच प्रमुख पक्षांत बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्या पुस्तकातील काही पानं पोस्ट करुन देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख टरबूजा असा केला आहे. देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांची तुलना उंदराशी केली आहे. तर दुसरीकडे सचिन सावंत यांनी अंधेरी पश्चिममधून दिलेली उमेदवारी नाकारली आहे.