Maharashtra Politics Updates Today : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक २० नोव्हेंबरला पार पडणार आहे. उमेदवार याद्या जाहीर होत आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी या दोहोंमध्ये नाराजांची संख्या वाढली आहे. त्यामुळे त्यांना रोखणं आणि निवडणुकीला सामोरं जाणं हे दोहोंपुढचं मोठं आव्हान आहे. तसंच मनसे, वंचित बहुजन आघाडी, तिसरी आघाडी या सगळ्यांचा परिणाम कसा होतो ते पाहणंही महत्त्वाचं असणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत तिकिट कापल्याने नाराजी असल्याचं पाहण्यास मिळतं आहे. काँग्रेसमध्येही असाच सूर आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर उमेदवारीसाठी अर्ज भरण्याची आज शेवटची तारीख आहे. त्यामुळे महाराष्ट्रात काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी समंदर लौटके आयेगा और सबको साथ लेकर आयेगाची घोषणा दिली आहे. तर महाविकास आघाडीने महायुती सरकार उलथवण्याचा दावा केला आहे. या आणि अशा सगळ्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Maharashtra Breaking News Today, 29 October 2024| महाराष्ट्रातल्या निवडणुकीशी संदर्भातल्या सगळ्या घडामोडी एका क्लिकवर

19:48 (IST) 29 Oct 2024
निवडणुकीच्या तोंडावर संगमनेर मध्ये गावठी कट्टा जप्त

संगमनेर : संगमनेर मधील राजकीय वातावरण अगोदरच तापलेले असताना विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पोलिसांनी गावठी पिस्तूल विक्रीसाठी घेऊन आलेल्या एका व्यक्तीला पकडले. या कारवाईत ३१ लाखाहून अधिक रकमेचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

आशिष सुनीलदत्त महिरे (वय २८, मूळ रा. सातपूर, नाशिक हल्ली राहणार गोल्डन सिटी संगमनेर) असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याबाबतची अधिक माहिती अशी, संगमनेर शहरातील कुरणरोड भागात एक व्यक्ती गावठी पिस्तुलाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक कुणाल सोनवणे यांना मिळाली होती. त्यांनी याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षण कल्पेश दाभाडे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे, पोलीस नाईक राहुल डोके यांना देत संबंधित ठिकाणी जाऊन कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

पथकाने माहिती मिळालेल्या परिसरात जाऊन शोध घेतला असता कुरण रोड परिसरातील आझादनगर, गल्ली क्रमांक २ समोरून रस्त्यावर एक व्यक्ती त्याच्या ताब्यातील टोयाटो फॉर्च्यूनर गाडीसह (एम.एच. 15 एफ 9630) संशयास्पद स्थितीत आढळून आला.

पोलीस पथकाने संशयित व्यक्तीकडे विचारपूस केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. संशयित आरोपी आशिष महिरे याची झडती घेतली असता गाडीतील ड्रायव्हरच्या सीटखाली सिल्वर रंगाचे लोखंडे धातूचे गावठी पिस्तूल मिळून आले. पथकाने या संदर्भात अधिक चौकशी केली असता महिरे याने सदरचे पिस्तूल विक्रीसाठी आणले असल्याचे पोलीस पथकाला सांगितले.

पथकाने आरोपीकडून ५० हजार रुपये किमतीची सिल्वर रंगाची व त्यावर काळ्या रंगाची पट्टी असलेल्या आणि सोबत मॅक्झिन असलेल्या गावठी पिस्तूलसह २ आयफोन, तीस लाख रुपये किमतीची टोयाटो फोरचुनर कार, मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

या संदर्भात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात पोलीस उपअधीक्षक यांच्या कार्यालयातील पोलीस नाईक राहुल डोके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

19:31 (IST) 29 Oct 2024

शिवसेना शिंदे गटाचा अजित पवार गटाला धक्का, हेलिकॉप्टरमधून एबी अर्ज आणून देवळाली, दिंडोरीत बंडखोरी

नाशिक : विधानसभा निवडणुकीत अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) गटाने थेट हेलिकॉप्टरमधून एबी अर्ज पाठवून देवळाली आणि दिंडोरी मतदारसंघात राष्ट्रवादीला (अजित पवार) धक्का दिला.

सविस्तर वाचा…

19:04 (IST) 29 Oct 2024
सिंदखेड राजामध्ये ‘एबी फॉर्म’चे महानाट्य; शिवसेना-अजित पवार गट समोरासमोर

महायुतीमधील सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारीचा तिढा सोमवारी रात्री उशिरा सुटल्याचे चित्र समोर आले होते.  राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत झालेल्या कथित चर्चेअंती शिंदे गटाने माजी आमदार शशिकांत खेडेकर यांना ‘एबी फॉर्म’ दिला.

सविस्तर वाचा…

18:18 (IST) 29 Oct 2024
श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडी

अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सर्वात चर्चेत असणारा श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघांमध्ये अखेर महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली आहे. महाविकास आघाडीला या मतदारसंघात मोठा धक्का बसला. माजी आमदार राहुल जगताप यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज अपक्ष दाखल केला आहे.

श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी कडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे माजी आमदार राहुल जगताप यांनी उमेदवारी मागितली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटी नंतरही ते शरद पवार यांच्यासोबत राहिले. त्यामुळे त्यांनाच उमेदवारी मिळेल अशा पद्धतीचे संकेत मिळत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटामधून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केलेले अनुराधा नागवडे यांना महाविकास आघाडीची उमेदवारी देण्यात आली.

17:23 (IST) 29 Oct 2024
रत्नागिरीत ठाकरे गटाचे नाराज उदय बने यांची अखेर बंडखोरी, अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल; विधानसभेसाठी बसपासह पाच अपक्षांंचे उमेदवारी अर्ज

रत्नागिरी : रत्नागिरी विधानसभा निवडणुकीची रंगत वाढू लागली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नाराज उदय बने यांनी अखेर बंडाचे हत्यार उपसले आहे. त्यांनी बंडखोरी करत आपला अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज मंगळवारी दाखल केला. यावेळी रत्नागिरी विधानसभा निवडणुकीसाठी एकूण पाच उमेदवारांनी अपक्ष म्हणून तर एका उमेदवाराणे बसपा कडून उमेदवारी अर्ज दाखल करीत निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

रत्नागिरी विधानसभेसाठी मंगळवारी एकूण पाच उमेदवारांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरले आहेत. त्यामध्ये विधानसभेच्या २६६ रत्नागिरी मतदार संघासाठी कैस नूरमहंमद फणसोपकर- अपक्ष, भारत सीताराम पवार (बसप), उदय बने अपक्ष, कोमल किशोर तोडणकर अपक्ष, दिलीप काशिनाथ यादव अपक्ष तसेच पंकज प्रताप तोडणकर अपक्ष यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

17:02 (IST) 29 Oct 2024
माजी राज्यमंत्री डॉ. रमेशकुमार गजबे यांची ‘वंचित’ला सोडचिठ्ठी, भाजपमध्ये जाणार ?

वंचित बहुजन आघाडीमध्ये पूर्व विदर्भ संयोजन प्रमुख पदाची जबाबदारी सांभाळणारे  माजी राज्यमंत्री डॉ. रमेशकुमार गजबे यांनी संयोजन प्रमुख पदासह वंचितच्या प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्याकडे सुपूर्द केला आहे. सविस्तर वाचा…

15:19 (IST) 29 Oct 2024
ज्योती मेटेंचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

ज्योती मेटे यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून बीडमधून ज्योती मेटे यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा होती. मात्र, बीडमधून संदीप क्षीरसागर यांना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर आता ज्योती मेटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे.

14:12 (IST) 29 Oct 2024
अकोला : काँग्रेसने साजिद खान यांच्यावरच दाखवला विश्वास, नाराज नेत्याने धरली ‘वंचित’ची वाट

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने साजिद खान पठाण यांच्यावरच पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. अकोला पश्चिम मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. सविस्तर वाचा…

14:11 (IST) 29 Oct 2024
मोर्शीचा तिढा सुटला; काँग्रेसचे गिरीश कराळे राष्‍ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार

राष्‍ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने अधिकृत उमेदवारांची पाचवी यादी मंगळवारी जाहीर केली. यात मोर्शी मतदारसंघातून गिरीश कराळे यांना उमेदवारी घोषित करण्‍यात आली आहे. सविस्तर वाचा…

14:10 (IST) 29 Oct 2024
श्रीनिवास वनगा १७ तासांपासून नॉट रीचेबल… पुन्हा अज्ञातवासात गेल्याची चर्चा..

शिवसेना (शिंदे) पक्षाचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांना पालघर विधानसभेची उमेदवारी नाकारून भाजपमधून आयात उमेदवार राजेंद्र गावित यांना दिल्यानंतर श्रीनिवास वनगा आणि त्यांचे कुटुंबीय मानसिक दृष्ट्या प्रचंड व्यथित झाले आहे.  सविस्तर वाचा…

13:32 (IST) 29 Oct 2024
मीरा भाईंदरमधून भाजपाने नरेंद्र मेहताना दिली उमेदवारी

भाजपाने गीता जैन यांच्या विरोधात नरेंद्र मेहतांना उमेदवारी दिली आहे. नरेंद्र मेहता हे मीरा भाईंदरमदून भाजपाचे आमदार असणार आहेत. तर उमरेडमधून सुधीर पारवे निवडणुकीला सामोरे जाणार आहेत.

13:27 (IST) 29 Oct 2024
देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांची भेट काय आहे इनसाईड स्टोरी?

‘फोटो ऑफ द डे’ ची इनसाइड स्टोरी काय?

महाराष्ट्रातली विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने जोरदार प्रचार सुरू आहे. सरकारकडून विविध योजना, विकासकामं जनतेपर्यंत पोहचवली जात आहेत. तर विरोधक सरकार कुठल्या पातळ्यांवर कमी पडलं ते सांगत आहेत. एनडीटीव्ही मराठीच्या जाहीरनामा या कॉनक्लेव्हच्या दरम्यान खासदार संजय राऊत आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काही क्षणांसाठी भेट झाली. त्यावेळी देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी संजय राऊत यांच्याशी हस्तांदोलन केलं. देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) संजय राऊतांना म्हणाले, आजचा हा फोटो म्हणजे फोटो ऑफ द डे आहे. त्यावर संजय राऊत म्हणाले की तेवढा तर आलाच पाहिजे. यानंतर दोघंही मनमुरादपणे हसले आणि दोघांनी एकमेकांशी हस्तांदोलन करुन निरोप घेतला. महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय विरोधकांनाही हसतमुखाने भेटण्याची परंपरा आहे ही संस्कृती यशवंतराव चव्हाण यांच्यापासून चालत आली आहे. ती आपणही टिकवली आहे हेच जणू काही हा फोटो सांगतो आहे.

12:11 (IST) 29 Oct 2024
निवडणूक म्हणजे संगीत खुर्ची आहे का?’ भाजपा नेते अतुल शाह यांचा सवाल

भाजपाच्या प्रवक्त्या आणि नेत्या यांना मुंबादेवीतून शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवारी मिळण्याच्या आधी त्यांनी औपचारिकपणे शिंदे गटात प्रवेश केला. मात्र त्यांच्या उमेदवारीला आता आता भाजपामधूनच विरोध होताना दिसत आहे. भाजपाचे नगरसेवक आणि ज्येष्ठ नेते अतुल शाह यांनी बंडाचे निशाण फडकवले असून ते अपक्ष म्हणून अर्ज भरणार आहेत. सविस्तर वृत्त

11:44 (IST) 29 Oct 2024
पक्षातील बंडखोरीचे काँग्रेस समोर आव्हान!

पुणे : विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बंडखोरीचे हत्यार उपसले आहे. शिवाजीनगर, कसबा आणि पर्वती या तीन मतदारसंघांतून निवडणूक लढविण्याची तयारी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. या पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी पक्षाचे नेते नक्की काय प्रयत्न करणार याकडे लक्ष लागले आहे.

वाचा सविस्तर…

11:44 (IST) 29 Oct 2024
Zeeshan Siddique-Salman Khan threatened : झिशान सिद्दीकी व अभिनेता सलमान खानला धमकी

मुंबई : माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर आता त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकी व अभिनेता सलमान खान यांना धमकी देण्यात आली आहे. आमदार झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयात याबाबत दूरध्वनी आला असून निर्मल नगर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. धमकी देणाऱ्याने झिशान सिद्दीकी व सलमानला धमकी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

वाचा सविस्तर…

11:44 (IST) 29 Oct 2024
देखभाल, दुरुस्ती जमत नसेल, तर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा हट्ट का?

शहरातील मुख्य रस्त्यांवर, तसेच चौकाचौकांत वाहतुकीचा प्रश्न बिकट होत असून, रस्त्यावरील अपघात, तसेच सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला असताना त्यावर काही प्रमाणात नियंत्रण ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजाविणारी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची यंत्रणा कोलमडली आहे.

वाचा सविस्तर…

11:30 (IST) 29 Oct 2024
इचलकरंजीत हिंदुराव शेळके यांचा मदन कारंडे यांना पाठिंबा

कोल्हापूर : भाजपचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके यांनी निवडणूक लढवण्याचा विचार बदलून महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांना पाठिंबा जाहीर केला. यामुळे कारंडे यांचे बळ वाढण्यास मदत झाली आहे. या वेळी भाजपचे माजी नगरसेवक अजित जाधव यांच्यासह आघाडीच्या प्रमुख नेतेमंडळींची उपस्थिती होती.

भाजपने राहुल आवाडे यांना उमेदवारी दिल्याने शेळके यांनी बंड केले होते. आवाडेविरोधक म्हणून परिचित असलेले शेळके हे अपक्ष निवडणूक लढणार होते. त्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले असताना, त्यांनी कारंडे यांना पाठिंबा जाहीर केला.

10:34 (IST) 29 Oct 2024
शहरातील पूरस्थितीच्या अहवालाची प्रत देण्यास पालिकेचा नकार, काय आहे कारण..?

पुणे : शहरात जुलै महिन्यात आलेल्या पूरस्थितीचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या समितीच्या अहवालाची प्रत देण्यास महापालिका प्रशासनाने नकार दिला आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याचे कारण पुढे करून अहवालाची प्रत देता येणार नसल्याचा अजब दावा पालिकेने केला आहे.

वाचा सविस्तर…

10:34 (IST) 29 Oct 2024
मुख्यमंत्र्यांच्या मिरवणुकीत चोरट्यांचा सुळसुळाट

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यापूर्वी वागळे इस्टेट भागात मिरवणुक काढण्यात आली होती. या मिरवणुकीमध्ये चोरट्यांचा देखील सुळसुळाट असल्याचे स्पष्ट झाले आहे.

वाचा सविस्तर…

10:33 (IST) 29 Oct 2024
मराठी माणसासाठी घरे राखीव ठेवा! विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘पार्ले पंचम’ची भूमिका

मुंबई : विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर ‘पार्ले पंचम’ या संस्थेने मराठीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. मुंबईतील मराठी टक्का घसरत चालला असून मुंबईत घर घेणे मराठी माणसाला परवडेनासे झाले आहे. त्यामुळे भविष्यात अस्तित्वात येत असलेल्या धारावी प्रकल्पात मराठी माणसासाठी घरे राखीव ठेवण्यात यावी, अशी भूमिका ‘पार्ले पंचम’ने घेतली आहे.

वाचा सविस्तर…

10:33 (IST) 29 Oct 2024
कोल्हापुरात आघाडीत उमेदवारीवरून संघर्षाला निमंत्रण

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर होताच चार मतदारसंघांत बंडाचे झेंडे लागले आहेत. काही ठिकाणी नाराजी उफाळून आली आहे. कोल्हापूर उत्तरमधील उमेदवारीवरून तर जिल्हा काँग्रेस भवनावर दगडफेक करण्याचा प्रकार घडला.

वाचा सविस्तर…

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ ( फोटो – लोकसत्ता ग्राफीक्स टीम )

महाराष्ट्रात निवडणुकीचं घोडामैदान जवळ आलं आहे. अवघ्या २० दिवसांमध्ये निवडणूक पार पडणार आहे. त्यादृष्टीने कुणाची कशी तयारी सुरु आहे? दावे प्रतिदावे काय होत आहेत? जाणून घ्या.